Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

नटसम्राट- डॉ. श्रीराम लागु यांची संपूर्ण माहिती

Shriram Lagoo Mahiti

नटसम्राट नाटकातील आप्पासाहेब बेलवलकरांची भुमीका शतकानुशतकांकरता अजरामर करणारा रंगभुमीवरचा कलावंत श्रीराम लागु! मराठी चित्रपटसृश्टी, मराठी रंगभुमी, तव्दतच हिंदी सिनेसृष्टी देखील आपल्या जिवंत अभिनयाने समृध्द करणारे जेष्ठ अभिनेते श्रीराम लागूंना अभिनयाचे चालते फिरते विद्यापिठ म्हंटले जाते.

आपल्या आवाजाचा आणि देहबोलीचा ईतका उत्तम वापर अभिनयाकरता करणारा असा अभिनेता दुसरा होणे नाही. आपण कित्येकांचा अभिनय पहातो आणि त्याक्षणी वाहवा देखील करतो परंतु नैसर्गिक अभिनयाची बातच वेगळी असते. त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने मराठी रंगभुमीवर अक्षरशः गारूड केलं होतं.

आज देखील कित्येक नवोदित अभिनेते त्यांच्या भुमिकांना वारंवार पाहुन त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतांना आपल्याला पहायला मिळतात पण अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य! वास्तविक वैद्यकिय क्षेत्रातील पदवी मिळाल्यानंतर त्यांनी वैद्यकिय सेवेला वाहुन घेणं क्रमप्राप्त होतं पण नियतीला ते मान्य नव्हतं.

वैद्यकिय अभ्यासक्रम विदेशात करून आणि 6 वर्ष वैद्यकिय सेवेला दिल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे वाटचाल सुरू केली आणि इतिहास घडवला. कदाचित नियतीलाच तो घडवायचा होता अन्यथा रसिक मायबाप प्रेक्षक त्यांच्या नितांत सुंदर अभिनयावाचुन वंचित राहीले असते.

नटसम्राट नाटकातील आप्पासाहेब बेलवलकरांची भुमिका असो, इथे ओशाळला मृत्यु मधील संभाजीची भुमिका असो, मिळालेल्या प्रत्येक भुमिकेचं डॉ. लागुंनी शब्दशः सोनं केलं. त्यांच्यानंतर कित्येकांनी नटसम्राट मधील भुमिका निभावली परंतु ‘त्या सम तोच’ असं म्हणतात नं, अगदी तसच झालं. पुन्हा असा नट होणे नाही.

महेश मांजरेकरांनी कुसुमाग्रज यांनी लिहीलेल्या ‘नटसम्राट’या नाटकावर आधारीत त्याच नावाचा मराठी चित्रपट बनविण्याचं धाडस केलं त्यात डॉ.श्रीराम लागुंनी साकारलेली भुमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे.

नटसम्राट- डॉ. श्रीराम लागु यांची संपूर्ण माहिती – Shriram Lagoo

Shriram Lagoo

डॉ. श्रीराम लागु यांच्याविशयी थोडक्यात महत्वाची माहिती – Shriram Lagoo Information In Marathi

नाव (Name)श्रीराम बाळकृष्ण लागु
जन्म (Birthday)16 नोव्हेंबर 1927 सातारा, महाराष्ट्र
वडिल (Father Name)डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागु
आई (Mother Name)सत्यभामा लागु
पत्नी (Wife Name)दिपा लागु, ख्यातनाम नाटय आणि सिने अभिनेत्री
मुलं (Childrens Name)तनवीर लागु, आनंद लागु, शुभांगी कानेटकर, 
मृत्यु  (Death) 17 डिसेंबर 2019
शिक्षण (Education) डाॅक्टर
कार्यक्षेत्र (Occupation) अभिनय आणि दिग्दर्शन
पुरस्कार (Awards)1978 चा फिल्मफेअर पुरस्कार, 2010 ला संगीत नाटक अकादमी फेलाशिप

डॉ. श्रीराम लागु यांच्या अभिनयाने सजलेली काही प्रमुख नाटकं – Shriram Lagoo Natak

  • नटसम्राट
  • सुर्य पाहिलेला माणुस
  • मित्र
  • इथे ओशाळला मृत्यु
  • आंधळयांची शाळा
  • दुरचे दिवे
  • प्रेमाची गोश्ट
  • अग्निपंख
  • आकाश पेलतांना
  • प्रतिमा
  • एकच प्याला
  • लग्नाची बेडी
  • कन्यादान
  • किरवंत
  • काचेचा चंद्र
  • शतखंड
  • हिमालयाची सावली

डॉ. श्रीराम लागु अभिनीत मराठी चित्रपट – Shriram Lagoo Marathi Movies List

  • सामना
  • पिंजरा
  • सिंहासन
  • आपली माणसं
  • चिमणरांव गुंडयाभाऊ
  • सुगंधी कट्टा
  • स्वयंवर
  • ध्यासपर्व
  • मुक्ता

डॉ. श्रीराम लागु अभिनित प्रसिध्द हिंदी चित्रपट – Shriram Lagoo Hindi Movie List

  • मुकद्दर का सिकंदर
  • सौतन
  • सरगम
  • सम्राट
  • थोडीसी बेवफाई
  • ज्योती बने ज्वाला
  • तराना
  • जीवा
  • ज्वालामुखी
  • देस परदेस
  • नामुमकीन
  • दो और दो पाॅंच

तन्वीर सन्मान – Tanvir Award

जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागु यांचा ‘तन्वीर’ नावाचा मुलगा लोकल मधुन जात असतांना झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ रूपवेध प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी 2004 सालापासुन जेष्ठ रंगकर्मींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

डॉ. श्रीराम लागु यांचे निधन – Shriram Lagoo Death

नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर अवघी रंगभुमी ज्यांच्या तेजस्वी अभिनयाने उजळुन निघाली असे ज्येश्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागु वयाच्या 92 व्या वर्शी अखेरची एक्झीट घेते झाले. जवळजवळ 4 दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृश्टीवर तसच रसिक मनावर अधिराज्य गाजवलेल्या या चतुरस्त्र अभिनेत्याला ‘‘माझी मराठी’’ ची विनम्र श्रध्दांजली…

हे पण नक्की वाचा: 

  • रमेश भाटकर यांची जीवनी

लक्ष्य दया : तुमच्या जवळ डॉ. श्रीराम लागु बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved