Sunday, October 1, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

शहीद सुखदेव यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Sukhdev Information in Marathi

सुखदेव थापर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अग्रगण्य क्रांतिकारी. भारतमातेचे एक सुपुत्र ज्यांनी देशासाठी हसत-हसत मृत्यूला आलिंगन दिले.

शहीद सुखदेव यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Sukhdev Information in Marathi

Sukhdev Information in Marathi
Sukhdev Information in Marathi

सुखदेव यांच्या बद्दल थोडक्यात – Sukhdev History in Marathi

नाव (Name)सुखदेव रामलाल थापर (Sukhdev Ramlal Thapar)
जन्म (Birth)१५ मे १९०७ (15th May 1907)
जन्मस्थान (Birth Place)नौघरा, लुधियाणा (पंजाब)(Naughara, Ludhiyana
(Punjab))
आई (Mother)श्रीमती राल्ली देवी (Ralli Devi)
वडील (Father)श्री. रामलाल थापर (Ramlal Thapar)
संघटना (Organization)
नौजवान भारत सभा (Naujawan Bharat Sabha)
मृत्यु (Death)२३ मार्च १९३१ (23rd March 1931)

१५ मे १९०७ रोजी पंजाब मधील लुधियाणा येथील नौघरा या ठिकाणी सुखदेव यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल तर आईचे नाव राल्ली देवी होते. लहानपणापासून ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेले अन्याय व अत्याचार त्यांनी जवळून पहिले होते. तेव्हापासूनच स्वातंत्र्याचे स्वप्न उरी बागळून त्यांनी आपले जीवन सुरु केले.

सुखदेव यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान : Contribution of Martyr Sukhdev in the Indian Independence Movement

सुखदेव यांचा उल्लेख हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून होतो. या संघटनेखेरीच ते पंजाब प्रांतातील इतरही संघटनांचे कार्यकर्ता होते. भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून आझाद करणे हा त्यांचा एकमात्र हेतू.

कालांतराने काही क्रांतीकारकांनी मिळून ‘नौजवान भारत’ सभेची स्थापना केली. सुखदेव हे या संघटनेचे सदस्य होते. ते लाहोर येथील नॅशनल कॉलेज येथे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात होते. तिथे  भारताच्या समृद्ध इतिहासाबद्दल तेथील विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करत होते.

देशात महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर आंदोलने, उपोषणे व विविध चळवळी सुरु होत्या. भारताला अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान १९२८ मध्ये एका आंदोलनामध्ये इंग्रजांकडून लाठी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये जखमी होऊन लाला लजपत राय यांचा मृत्यु झाला होता.

या घटनेची चाहूल लागताच अहिंसेतून स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे असे देशवासीयांना वाटू लागले. यातूनच सशस्त्र क्रांतिकारी संघटनांचा जन्म झाला. यानंतर सुखदेव, भगतसिंह, राजगुरू, जय गोपाल आणि चंद्रशेखर आझाद यांनी मिळून देशाला स्वतंत्र करण्यासाठी योजना आखायला सुरुवात केली.

यामध्ये ब्रिटीश अधिकारी स्कॉट याला ठार करण्याची योजना सामील होती. परंतु स्कॉट समजून सौन्डर्स या अधिकाऱ्याची हत्त्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच दिल्लीतील सेन्ट्रल असेम्ब्ली येथे बॉम्ब स्फोट घडवून आणला गेला. या दोन्ही प्रकरणांत सुखदेव यांचा सहभाग होता.

यानंतर ब्रिटिशांनी देशात क्रांतीकारकांची धरपकड सुरु केली. सुखदेव यांना तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात कैद्यांना अमानवीय वागणूक देण्यात येत होती. ज्याविरोधात तुरुंगात उपोषण करण्यात आले होते. या उपोषणात देखील सुखदेव सहभागी झाले होते.

ब्रिटीश अधिकारी सौन्डर्सची हत्त्या, सेन्ट्रल असेम्ब्ली मधील बॉम्बस्फोट इ. प्रकरणांत दोषी ठरवून सुखदेव थापर, भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२३ मार्च १९३१, भारतीय इतिहासातील काळा दिवस. या दिवशी भारत मातेचे तीन सुपुत्र देशासाठी फासावर गेले. परंतु त्यांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. हे स्वतंत्र मिळवून देण्यात या शहीदांचा यांचा मोलाचा वाटा आहे.

शहीद दिवस (२३ मार्च) : Martyrs Day (23rd March)

संपूर्ण भारतभर २३ मार्च रोजी शहीद दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपण देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना अभिवादन करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते या हुतात्म्यांमुळे, हे नेहमी लक्षात असू द्यावे.

शहीद सुखदेव यांच्या जीवनचरीत्रावर काही सुविचार : Sukhdev Quotes

  1. “जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले”
  2. “त्याग करून आपल्या सुखांचा, फासावर गेले त्रिदेव, शत-शत नमन तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव”
  3. “मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व आपले विसरून गेले, नतमस्तक मी तयांच्या चरणी, जे देशासाठी शहीद झाले”

काही महत्वाची प्रश्न : (FAQs)

१. शहीद सुखदेव यांचे पूर्ण नाव काय होते ?

उत्तर : सुखदेव रामलाल थापर.

२. शहीद सुखदेव यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर : पंजाब मधील लुधियाणा येथील नौघरा या ठिकाणी सुखदेव यांचा जन्म झाला होता.

३. शहीद सुखदेव यांनी स्थापन केलेल्या क्रांतिकारी संघटनेचे नाव काय होते ?

उत्तर : नौजवान भारत सभा.

४. शहीद सुखदेव यांच्या सोबत आणखी कोणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ?

उत्तर : शहीद भगतसिंग आणि शिवराम हरी राजगुरू.

५. शहीद सुखदेव यांना कुठल्या खटल्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ?

उत्तर : ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन सौन्डर्सच्या हत्त्येमध्ये दोषी ठरवत शहीद सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Previous Post

जाणून घ्या 17 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
June 17, 2023
Next Post
Parshwanath Aarti Marathi

जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती

18 February History Information in Marathi

जाणून घ्या 18 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Rajguru Information in Marathi

शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

19 February History Information in Marathi

जाणून घ्या 19 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

Comments 1

  1. Sanjana says:
    6 months ago

    Name? Sukhdev Ramlal Thapar? Punjab? Ralli Davi Ramlal Thapar so nice very much

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved