तापी नदीची माहिती

Tapi Nadi chi Mahiti

अजिंठा डोंगररांगा, उत्तरेकडील सातपुडा पर्वत, दक्षिणेकडील सातमाळा डोंगर यांच्या दरम्यानच्या विशाल प्रदेशात तापी नदीचे विस्तृत खोरे पसरलेले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यातून वाहत जाणारी तापी नदी पुढे अरबी समुद्रास जाऊन मिळते.

तापी नदीची माहिती – Tapi River Information in Marathi

Tapi River Information in Marathi
Tapi River Information in Marathi
नदीचे नाव तापी
उगमस्थान पर्वत रांगा, मुलताई, जि. बैतुल, मध्यप्रदेश
लांबी 724 कि.मी.
तापीच्या प्रमुख उपनद्या पूर्णा, पांझरा, गिरणा
तापी नदीवरील प्रकल्प हतनूर धरण, जि. जळगाव (खान्देश) महाराष्ट्र.
नदीकाठावरील शहरे भुसावळ

तापी नदीची माहिती –  Tapi River Information

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावणारी तापी नदी जनमानसांत लोकप्रिय आहे.

उगमाजवळ तिला ‘मूळतापी’ असे नाव आहे. उगमानंतर ती घनदाट जंगलातून वाहते. नंतर ती अमरावती जिल्ह्याच्या सरहद्दीजवळून वाहते. मध्य प्रदेशातील बुऱहानपूरहुन वाहत-वाहत ती जळगाव जिल्ह्यात रावेरनजीक महाराष्ट्रात प्रवेश करते.

या वेळी तिचा प्रवाह पूर्व-पश्चिम दिशेने वाहतो. महाराष्ट्रातील शहादा शहराजवळून वाहत जाऊन ती गुजरात राज्यात प्रवेश करते. तापी नदीच्या मुखाजवळच गुजरातमधील प्रसिद्ध असे सुरत शहर वसले आहे.

दक्षिण पठारावरून वाहणारी तापी नदी सुमारे सातशे किलोमीटर लांबीची आहे. तापी आणि नर्मदा या दोन्ही नद्या बरोबरीनेच वाहतात.

महाराष्ट्रातून वाहणारा तापीचा प्रवाह सुमारे दोनशे किलोमीटर लांबीचा आहे.

गावीलगड टेकड्यांच्या प्रदेशात उगम पावणारी ‘पूर्णा’ नावाची एक मोठी नदी जळगाव जिल्ह्यात तापी नदीस येऊन मिळते. पूर्णा ही तापीची उपनदी आहे. त्याचप्रमाणे पांझरा’ आणि ‘गिरणा’ या उपनद्याही सातमाळा डोंगरात उगम पावून उत्तरेकडे वाहत तापी नदीस येऊन मिळतात.

महाराष्ट्रामधून वाहणाऱ्या तापी नदीचे पात्र रुंद आणि विस्तृत असे आहे. तापी नदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्रे आहेत.

Tapi Nadi Information

संत चांगदेव-समाधी तापी-पूर्णा नद्यांच्या संगमाजवळ आहे; तर जवळच एदलाबाद येथे संत मुक्ताबाईंचे प्रसिद्ध देवालय आहे. त्याचप्रमाणे तापीच्या तीरावरच प्रकाशे हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.

तापी नदीच्या तीरावर प्राचीन मानवी संस्कृतीचे अनेक अवशेष उत्खनतात मिळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे तालुक्याचे गाव तापीच्या तीरावर वसले आहे. भुसावळ हे भारतातील मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी एक आहे. भुसावळ तालुक्यात हतनूर येथे तापी नदीवर मोठे धरण बांधले आहे.

41 दरवाजे असलेल्या हतनूर धरणाची पाणी साठवण क्षमता हि 388 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. खान्देशातील रावेर, मुक्ताई नगर, आणि इतर परिसर तापी नदीमुळे समृद्ध झाला आहे.

येथील बागायत क्षेत्र वाढलेले आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात भारतात अग्रेसर आहे.

तसेच फार पूर्वीपासून तापी नदीच्या खोऱ्यात आदिवासी लोकांची संस्कृती बहरली आहे.

तापी नदीच्या पाण्यावर आदिवासी बांधवांचे जीवन अवलंबून आहे.

अजिंठा डोंगररांगा, उत्तरेकडील सातपुडा पर्वत, दक्षिणेकडील सातमाळा डोंगर यांच्या दरम्यानच्या विशाल प्रदेशात तापी नदीचे विस्तृत खोरे पसरलेले आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यातून वाहत जाणारी तापी नदी पुढे अरबी समुद्रास जाऊन मिळते.

तापी नदीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Tapi River

प्रश्न. तापी नदीचा उगम कोठे झाला आहे?

उत्तर: मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये.

प्रश्न. तापी नदीवर जळगाव जिल्ह्यात कोणते धरण बांधले आहे?

उत्तर: ‘हतनूर’ धरण, ता. भुसावळ, जि. जळगाव.

प्रश्न. पूर्ण, पांझरा, गिरणा, वाघुर ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

उत्तर:  तापी नदी.

प्रश्न. तापी-पूर्णा नदी संगमावर कोणते तीर्थक्षेत्र आहे?

उत्तर: संत चांगदेव महाराज समाधीस्थळ.

प्रश्न. केळी पिकासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

उत्तर: जळगाव जिल्हा.

प्रश्न. तापी नदी किती राज्यांमधून वाहते?

उत्तर: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. अशा तीन राज्यांमधून तापी नदी वाहते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top