Thomas Edison Information in Marathi
अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, अलेक्झांडर ग्राहम बेल, मेरी क्युरी हे जगातील महान शास्त्रज्ञ आणि संशोधक. या सर्वांनी जगाला आधुनिक संसाधनांची ओळख करून दिली. मानवी जीवन आरामदायी बनविण्यासाठी या सर्वांनी नवनवीन शोध लावलेले आहेत. याच यादीतील एक महत्वाचे नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. ते अमेरिकेतील सर्वाधिक प्रसिद्ध आणि यशस्वी संशोधक तसेच व्यावसायीक होते. ८४ वर्षाच्या आपल्या जीवनात तब्बल १,०९३ शोध आपल्या नावे करून घेणारे आणि संशोधनाचे पिता म्हणून सुद्धा त्यांचे नाव समोर येते.
महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Thomas Edison Information in Marathi

थॉमस अल्वा एडिसन बायोग्राफी – Thomas Edison Biography in Marathi
नाव (Name) | थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) |
जन्म (Birthday) | ११ फेब्रुवारी १८४७ (11 February 1847) |
जन्मस्थान (Birth Place) | मिलान, ओहिओ (यु.एस.) (Milan, Ohio, U.S.) |
वडील (Father Name) | सॅम एडिसन (Sam Edison) |
आई (Mother Name) | नॅन्सी एडिसन (Nancy Edison) |
पत्नी (Wife Name) | १. मॅरी स्टीलवेल (Mary Stilwell), २. मिना मिल्लर (Mina Miller) |
एकूण मुले (Total Children) | ६ (6) |
मृत्यु (Death) | १८ ऑक्टोबर १९३१ (18 October 1931) |
थॉमस एडिसन यांचे बालपण आणि कुटुंब – Thomas Edison History in Marathi
थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी यु.एस. मधील मिलान, ओहिओ येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नॅन्सी तर वडिलांचे नाव सॅम असे होते. या जोडप्याचे सातवे आणि शेवटचे मुल म्हणजे थॉमस. लहानपणी लालसर ताप आणि ऐकण्याचा त्रास होत असल्याने आजीवन ते काही प्रमाणात बहिरे होते.
थॉमस यांचे शिक्षण – Thomas Edison Education
थॉमस एडिसन हे शाळेत फार काळ शिकले नाहीत. अभ्यासात फारसे हुशार नसल्याने त्यांना त्यांच्या आईने घरीच शिकविले. लहानपणापासूनच थॉमस यांचा कल नवीन शोध लावण्यात होता. दिवसातील कित्येक तास ते प्रयोग शाळेत व्यतीत करत होते.
थॉमस एडिसन यांचा विवाह आणि मुले – Thomas Edison Family
थॉमस यांचे दोन विवाह झाले होते. १८७१ साली मॅरी स्टीलवेल यांच्याशी तर १८८६ साली त्यांनी मिना मिल्लर यांच्याशी पुनर्विवाह केला. एडिसन यांना
- चार्ल्स एडिसन
- थॉमस अल्वा एडिसन जुनिअर
- थेओदोरे मिल्लर एडिसन
- मॅरीओन एस्तेले एडिसन
- विलियम लेस्लेई एडिसन
- मादेलेईने एडिसन अशी एकूण ६ मुले होती.
थॉमस एडिसन यांचे सुरुवातीचे जीवन : Thomas Edison Early Life
अगदी १२-१३ वर्षाचे असतांना त्यांनी रेल्वे मध्ये पेपर, भाजीपाला इ. विकायला सुरुवात केली. यांमधून जे पैसे मिळत होते त्यातील बरेच पैसे ते प्रयोगासाठी उपयोगी साहित्याची खरेदी करण्यातच खर्च करत होते. १९६२ साली एका तीन वर्षाच्या मुलीला रेल्वे अपघातापासून वाचविल्याने त्या मुलीच्या वडिलांनी थॉमस यांना टेलीग्राफी बद्दल शिकविले. त्यानंतर त्यांनी टेलीग्राफीचे काम सुरु केले. हे करत असतांना त्यांचे प्रयोगकार्य देखील सुरूच होते.
काहीच वर्षांनी त्यांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला आणि आपला पूर्ण वेळ शोधकामात लावला. जगाला नवीन तंत्रज्ञानाची भासणारी गरज त्यांनी ओळखली होती. जगाला असणारी टेलिग्राफीची गरज आणि त्या बद्दल अगोदरच असणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी टेलिग्राफीचा शोध लावला. जगातील पहिली व्यावसायिक प्रयोगशाळा त्यांनी वेस्ट ऑरेंज या ठिकाणी स्थापन केली. यामध्ये रासायनिक, धातू विषयक, यांत्रिक असे अनेक प्रयोग करण्याची सुविधा उपलब्ध होती.
थॉमस एडिसन यांचे शोध आणि कामगिरी – Thomas Edison Inventions and Achievements
- तार गरम होऊन पेटणारा विजेचा दिवा
- टेलीग्राफी
- फोनोग्राफ
- चलचित्र
- माईक्रोफोन
- अल्कली स्टोरेज बॅटरी
- कार्बन टेलिफोन ट्रान्समीटर
थॉमस एडिसन बद्दल थोडक्यात – About Thomas Edison
- थॉमस एडिसन यांचे छंद (Thomas Edison Hobbies) : वाचन, संशोधन आणि रासायनिक प्रयोग करून पाहणे.
- थॉमस एडिसन यांची एकूण संपत्ती (Thomas Edison Net Worth) : १२ दशलक्ष डॉलर. (इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)
- थॉमस एडिसन यांचे सर्वात प्रसिद्ध शोध (Famous Inventions of Thomas Edison) : फोनोग्राफ, विजेचा दिवा.
थॉमस एडिसन यांच्या बद्दल काही मनोरंजक तथ्य – Thomas Edison Facts
- थॉमस यांच्या दोन मुलांची टोपण नवे डॉट आणि डॅश अशी होती.
- ते काही प्रमाणात बहिरे होते.
- त्यांच्या नावे विश्वातील सर्वाधिक १०९३ शोधांच्या नोंदी आहेत.
- ते शाळेत जास्त काळ शिकलेले नाहीत.
- खडकांपासून धातू वेगळे करण्याची पद्धत शोधण्यासाठी एडिसन यांनी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना अपयश मिळाले.
थॉमस एडिसन यांची पुस्तके – Thomas Edison Books
- द एडिसन अँड फोर्ड कोट बुक
- डायरी अँड सॅन्ड्री ऑब्सर्वेशन ऑफ थोमास अल्वा एडिसन
- द विझार्ड ऑफ मेन्लो पार्क १८७८
- द मेकिंग ऑफ ऍन इन्वेंन्टर, फेब्रुवारी १८४७-जून १८७४
- फ्रॉम वर्कशॉप टू लेबोरेटरी, जून १८७३ – मार्च १८७६
थॉमस एडिसन यांच्याबद्दल काही महत्वाची प्रश्ने – Thomas Edison Questions and Answers
१. थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ चा शोध कधी लावला? (When did Thomas Edison Invent the Phonograph?)
उत्तर: १८७७ साली.
२. थॉमस एडिसन यांची एकूण संपत्ती किती आहे? (Thomas Edison Net Worth)
उत्तर: १२ दशलक्ष डॉलर. (इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)
३. थॉमस एडिसन यांचा मृत्यू कधी झाला? (Thomas Edison Death Date)
उत्तर: १८ ऑक्टोबर १९३१.
४. थॉमस एडिसन यांचे शिक्षण काय झाले होते? (Thomas Edison Education)
उत्तर: थॉमस एडिसन हे शाळेत फार काळ शिकलेले नाहीत. त्यांना त्यांच्या आईकडून शिक्षांचे धडे मिळाले होते.
५. थॉमस एडिसन यांची कामगिरी/शोधकार्य काय आहे? (Thomas Edison Inventions)
उत्तर: विजेचा दिवा, फोनोग्राफ, चलचित्र, टेलीग्राफी, अल्कली स्टोरेज बॅटरी इ.
६. संशोचानाचे पिता म्हणून कोणाला संबोधिल्या जाते? (Who is the Father of Invention?)
उत्तर: थॉमस अल्वा एडिसन.