Saturday, June 14, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

या लेखाद्वारे जाणून घ्या, महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याजोगी काही पर्यटन स्थळ! 

Places to Visit in Maharashtra

बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा… असं आपण महाराष्ट्रीयन केवळ म्हणत नाही तर ही भावना प्रत्येकाच्या हृदयात घर करून आहे. आपला महाराष्ट्र विविधतेने नटलेला आणि परंपरांनी समृध्द आहे त्याप्रमाणेच निसर्गाचं देणं सुध्दा या महाराष्ट्राला भरभरून मिळालेलं आहे.

फिरायलां कुणाला आवडत नाही? सगळयांनाच आवडतं विशेषतः खास पावसाळयात फिरायला निघणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रात पावसाळयाच्या दिवसांत फिरण्याकरता कोणती ठिकाणं योग्य आहेत?

या ठिकाणी आपल्या राज्यातील पावसाळयात भेट द्यावी अशी काही पर्यटनस्थळं आम्ही आपल्याला सांगत आहोत…..

Contents show
1 महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळ – Tourist Places in Maharashtra
1.1 महाराष्ट्रातील ५ पर्यटन स्थळ – Best 5 Tourist Destinations In Maharashtra
1.1.1 माळशेज घाट – Malshej Ghat
1.1.2 माथेरान – Matheran
1.1.3 आंबोली – Amboli
1.1.4 इगतपुरी – Igatpuri
1.1.5 लोणावळा – Lonavla

महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळ – Tourist Places in Maharashtra

Tourist Places in Maharashtra

महाराष्ट्रातील ५ पर्यटन स्थळ – Best 5 Tourist Destinations In Maharashtra

  • माळशेज घाट – Malshej Ghat

जाणकारांच्या मते स्वित्झर्लंड पेक्षा देखील आपल्या महाराष्ट्रातील माळशेज घाट अप्रतीम निसर्गसौंदर्याचे प्रतिक आहे. पावसाळयाच्या दिवसात माळशेज घाटात ठिकठिकाणी दिसणारे धबधबे, हात वर केला तर हाताला ढग लागतील अशी अवस्था,डोळयाचे पारणे फेडणारा परीसर, अप्रतीम डोंगररांगा, दाट धुक्याने वेढलेला आसमंत, सतत कोसळणारा पाऊस, हे सर्व अनुभवण्याकरता माळशेज घाटाची सहल पावसाळयात अवश्य करायलाच हवी.

उंचच उंच कडयांवरून कोसळणारे धबधबे आपल्याला प्रेमात पाडतात, पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे, निसर्गाने धरतीवर अंथरलेला हिरवाकंच गालिचा पाहुन इथेच राहावे आणि पुन्हा त्या कृत्रीम जगाकडे फिरकुच नये असे प्रत्येक मनाला वाटायला लावणारा हा माळशेज घाट!

शनिवार रविवार पावसाळयाच्या दिवसात खास माळशेज घाट फिरण्याकरता मुंबई पुण्यातील असंख्य पर्यटक या ठिकाणी आवर्जुन भेटी देतात.

खुबी या छोटयाश्या गावाजवळ पिंपळगाव जोगा धरण आहे या ठिकाणी आपल्याला स्थलांतरीत पक्षी पहाण्याची संधी देखील या पावसाळयात मिळते.

राहाण्याची सोय – Accommodation Facilities

पर्यटकांच्या सोयीकरता या ठिकाणी एमटीडीसीचे रिसॉर्ट देखील आहे. घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गाव आहे येथे आता पर्यटकांकरता रिसॉर्ट झाले आहेत….

कसे जाल? – How Do Go?

ठाणे जिल्हयातील हे पर्यटन स्थळ नगर कल्याण रस्त्यावर कल्याण पासुन 86 कि.मी. अंतरावर आहे.

जर तुम्ही पुण्याहुन जाणार असाल तर नारायणगाव मार्गाने माळशेज घाटात पोहोचता येतं.

शहापुर येथुन किन्हवली सरळगाव मार्गाने सुध्दा माळशेज घाट पाहाण्याकरता जाता येतं.

आपल्या वाहनाने कल्याण वरून दिड दोन तासात येथे सहज पोहोचता येतं.

पावसाळयाचा मनमुराद आनंद घेण्याकरता वारंवार जावे असे ठिकाण माळशेज घाट एकदा अनुभवायलाच हवे…

  • माथेरान – Matheran

मुंबई पुण्यापासुन साधारण सारख्याच अंतरावर असलेले आल्हाददायक सौंदर्याने नटलेले आणखीन एक पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान!

रायगड जिल्हयातील हे पर्यटनस्थळ प्रदुषणापासुन आजही बरच दुर आहे त्यामुळे येथील हवा आरोग्याकरता हितकारक आहे.

पावसाळयात भरपुर पाऊस पडत असल्याने पुर्वी या ठिकाणी फारशी गर्दी केवळ हिवाळयात आणि उन्हाळयात पहायला मिळायची

परंतु आता हौशी पर्यटक खास पावसाचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी येतांना दिसतात.

या ठिकाणी वाहनाने फिरण्यास बंदी असल्यामुळे आणि फक्त पायीच फिरता येत असल्याने पर्यटक येथे येण्यास थोडे मागे पुढे जरी पहात असले तरी या नियमांमुळेच येथील हवा आजही प्रदुषण विरहीत अनुभवता येते.

घोडयावर आणि माणसाने ओढणारी दोन चाकी रीक्षा मात्र येथे आहे त्यामुळे त्याचा आनंद नक्कीच आपल्याला घेता येतो.

महाबळेश्वर नंतर थंड हवेच्या ठिकाणाकरता पर्यटक माथेरानची निवड करतात.

माथेरानचा परिसर गर्द हिरवाईने आणि दाट जंगलांनी वेढलेला आहे. भर पावसाळयात या ठिकाणी ट्रेकिंग ची आवड असणाऱ्या पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.

कसे जाल? – How Do Go?

पिंपरी चिंचवड पासुन १०० कि.मी. आणि मुंबई वरून माथेरान ११० कि.मी. अंतरावर आहे.

मुंबई वरून नेरळपर्यंत गेल्यास तेथुन मिनी ट्रेन तुम्हाला माथेरान पर्यंत घेउन जाते.

या ठिकाणी बरेच हॉटेल्स आणि घरगुती राहाण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

एमटीडीसी चे रिसॉर्ट सुध्दा उपलब्ध आहेत त्याची बुकींग मात्र मुंबई ला एमटीडीसी च्या कार्यालयातुन करावी लागते.

हवामान – Weather

माथेरान चे हवामान कधीच उष्ण नसते उन्हाळयाच्या दिवसांमधे २० ते ३० अंश तापमान अनुभवायला मिळतं. हिवाळयात हेच हवामान १५ ते २५ अंशापर्यंत खाली येतं. जुन ते ऑगस्ट या दरम्यान भरपुर पाऊस पडतो.पावसाच्या दिवसांमध्ये सगळया वातावरणाने धुक्याची शाल पांघरल्याचा भास होतो. पावसाळयात तर सुर्यदर्शन होतच नाही.

आज देखील शहरी प्रदुषणापासुन कोसो दुर असलेले हे माथेरान पावसाळयात फिरण्याकरता एक उत्तम पर्याय आहे.

  • आंबोली – Amboli

महाराष्ट्रातील चेरापुंजी कशाला म्हणतात असे जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला सांगता येईल?

अहो आपल्या राज्यातील चेरापुंजी म्हणवले जाणारे ठिकाण म्हणजे कोकणातील सावंतवाडी जवळचे आंबोली हे होय.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण आंबोली. येथे पावसाळयात ७५० सें.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. आंबोली घाटातील नागरतास हा धबधबा प्रचंड मोठा आहे तो पाहण्याकरता दरवर्षी खुप पर्यटक येतात.

हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिध्द आहे.

सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा, देवीचे मंदिर, नागरतास धबधबा, मनोहरगड, महादेवगड असे जुने किल्ले देखील या ठिकाणी पहाण्यासारखे आहेत.

सावंतवाडी आंबोली हे अंतर केवळ ३० कि.मी. आहे. अप्रतीम सृष्टीसौंदर्य, येथील देवराई, घनदाट जंगलाच्या परिसरात अनेक वनौषधी देखील मिळतात, शिवाय सहज न दिसणाऱ्या पक्ष्यांचे या ठिकाणी आपल्याला दर्शन होते.

बिबटया, रानमांजरे, ससे, हरिण, गवे, भेकरे, असे वन्यप्राणी या जंगलांमधे वास्तव्य करून आहेत.

कसे जाल? – How Do Go?

कोल्हापुर आणि सावंतवाडी ही ठिकाणं लोहमार्गाने जोडली गेली असल्याने या ठिकाणी जाणे सोईचे होते.

पावसाळयाच्या दिवसांमधे फेसाळणाऱ्या  पांढऱ्याशुभ्र धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटण्याकरता पर्यटक मोठया प्रमाणात या ठिकाणी येतात.

आपण कधी येताय आंबोली घाटात फिरायला?

  • इगतपुरी – Igatpuri

पावसाळयातील अप्रतीम सौंदर्य न्याहाळण्या करता एकदा इगतपुरीला भेट द्यायलाच हवी.  इगतपुरीच्या आसपास विपुल प्रमाणात मोठमोठे धबधबे आहेत जे पावसाळयात प्रचंड प्रमाणात वाहात कोसळत असतात.

महाराष्ट्रात भरपुर पाऊस पडणाऱ्या स्थळांमध्ये इगतपुरीचा समावेश होतो.

इगतपुरी हा नाशिक जिल्हयातील एक तालुका. या ठिकाणी मुक्काम करून आसपासचा परिसर आपल्याला पहाता येतो.

यात मुख्यतः भंडारदरा धबधबा, खोडाळा, अप्पर वैतरणा धरण, देवबांध, धनुष्यतिर्थ धबधबा सुंदरनारायण गणेश मंदिर, उंट दरी, पाच धबधबे, भातसा रिव्हर व्हॅली, अशी एकाहुन एक अप्रतीम निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणं या इगतपुरीच्या सौंदर्यात आणखीन भर घालतात.

पावसाळयाच्या दिवसांमध्ये कसारा घाट धुक्याने वेढलेला पाहाणे एक अनुपम अनुभव आहे.कसारा इगतपुरी रेल्वे स्थानका दरम्यान अत्यंत अप्रतीम सौंदर्य पहायला मिळते. ट्रेन अत्यंत धिम्या गतीने या दरम्यान जाते आणि आजुबाजुचा परिसर स्वर्गसुखाची अनुभुती देतो.

अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण या ठिकाणी होत असते.

निसर्गाची भरपुर लयलुट असलेल्या या ठिकाणी विपश्यना केंद्र असल्याने इगतपुरीचा मान आणखीनच वाढतो.

कसे जाल? – How Do Go?

नाशिक नजिकचे इगतपुरी हे मध्य रेल्वेचे एक महत्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे येणे सोयीचे आहे.

  • लोणावळा – Lonavla

पावसाळयाच्या दिवसांमधे जर तुम्हाला आल्हाददायक पावसाच्या सरी अंगावर झेलत विपुल हिरवाई आणि हिरवीगार निसर्गशोभा अनुभवायची असेल तर पुणे जिल्हयातील लोणावळा हे ठिकाण फिरण्याकरता अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतं.

येथील प्रसिध्द चिक्की खायची आणि मनसोक्त हुंदडायचं. घाटमाथ्यावरचं हे ठिकाण वनश्रीने अत्यंत संपन्न असुन पावसाच्या दिवसांत उंच उंच डोंगरावरून कडेलोट होणारे धबधबे पाहाण्यात वेळ कसा भुर्रकन उडुन जातो हे कळत देखील नाही.

काय पहाल? – What See?

लोणावळयाला आल्यानंतर अनेक ठिकाणं पाहाता येतात त्यात मुख्यतः भुशी डॅम, राजमाची पॉइंट, लोहगड, विसापुर, कार्ला भाजा येथील लेणी, वळवण डॅम, डयूक्स अँड डचेस नोज, टायगर्स लीप.

कसे जाल? – How Do Go?

लोणावळा हे ठिकाण पुणे शहरापासुन साधारण ६४ कि.मी. अंतरावर असुन मुंबई पासुन ९६ कि.मी. अंतरावर आहे. पुण्यातील उपनगरातुन लोणावळयाला येण्याकरता लोकल रेल्वे उपलब्ध आहेत. पुणे आणि मुंबई येथुन भरपुर बसेस उपलब्ध आहेत आणि खाजगी वाहनाने देखील येथे सहज पोहोचता येतं.

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved