लांडगा प्राणी माहिती

Landga in Marathi

जंगली प्राण्यांचे आपले वेगवेगळे गुण असतात. त्या गुणांनुसार प्रत्येक प्राणी प्रसिद्ध असतो. जसे रुबाबदार सिंह, बलवान हत्ती, भित्रा ससा, धूर्त कोल्हा आणि क्रूर लांडगा होय.

लांडगा प्राणी माहिती – Wolf Information in Marathi

Wolf Information in Marathi
Wolf Information in Marathi
हिंदी नाव : भेडीया
इंग्रजी नाव : Wolf

लांडगा हा दिसायला कुत्र्यासारखा असतो. लांडग्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान आणि एक झुपकेदार शेपटी असते. त्याच्या तोंडाचा आकार निमुळता असतो.

लांडगा चे खाद्य – Wolf Food

हा प्राणी पूर्णत: मांसाहारी आहे. शेळी, घोडा, बैल, हरिण, बकरी तसेच सशाचे मऊ, कोवळे मांस तो आवडीने खातो.

लांडगा कळपाने राहतो व रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो. शेळी, मेंढी यांचा कळप दिसला की त्यात घुसायचे आणि शेळ्या, मेंढ्या ओढून जंगलात न्यायच्या व त्यांच्यावर यथेच्छ ताव मारायचा, ही त्याची शिकारीची पद्धत असते.

लांडगा हा चपळ आणि खादाड प्राणी आहे. लोकवस्तीत जाऊन लहान मुलेसुद्धा तो पळवून नेतो. कधीकधी भूकेपोटी लांडगे एकमेकांचा प्राणही घेतात.

लांडग्याची मान गलेलठ्ठ असते. त्याच्या अंगावर भुरकट रंगाचे राठ केस असतात.

लांडग्याची नजर सतत काहीतरी शिकार शोधत असते. लांडगा हा प्राणी क्रूर व धाडसी आहे.

लांडगा घाबरतो ते कुत्र्याला. लांडगा हा प्राणी आपल्यापेक्षा कमी ताकदीच्या प्राण्यांवरच हल्ला करतो. खेडेगावात लांडगे सतत येत असतात. तेथेच त्यांना शेळीमेंढीसारखे प्राणी मिळतात. म्हणून धनगर लोक मेंढीच्या कळपात एक-दोन कुत्री पाळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here