Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १७ जून रोजी येणारे दिनविशेष

 17 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास 17 June Today Historical Events काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती, तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन आणि निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन आहे. गेल्या काही वर्षांपासून आपले हवामान हे सतत बदलत चालले आहे. तसचं, जैवविविधतेचा ऱ्हास यांच बरोबर वाळवंटी आणि अर्ध- दुष्काळी क्षेत्रांची वाढ ही देखील पृथ्वीच्या दृष्टीने चिंतेची बाब बनत चालली आहे. यावर काही उपाय योजना म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने योजना आखणे सुरु केल्या आहेत. यासंबंधी ठराव सन १९९२ साली ब्राझील देशांतील अर्थ समिट मध्ये घेण्यात आला होता.

जाणून घ्या १७ जून रोजी येणारे दिनविशेष – 17 June Today Historical Events in Marathi

17 June History Information in Marathi
17 June History Information in Marathi

17 जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 June Historical Event

  • इ.स. १७९९ साली फ्रांस सम्राट नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांनी इटली देश आपल्या साम्राज्यात सामावून घेतला.
  • सन १९१७ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी गुजरात मधील साबरमती आश्रमात राहत असतांना त्यांनी हृदय कुंज इथे आपले निवास स्थान तयार केले.
  • सन १९२९ साली सोवियत संघाने चीन बरोबर असणारे आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले.
  • सन १९६७ साली चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम चा स्फोट घडवून आणला.
  • सन १९९१ साली भारत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी व यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला.
  •  सन २००८ साली भारत देशांत निर्मित हलके लढाऊ विमान ‘तेजस’ चे बंगलोर शहरात यशस्वीपणे परीक्षण घेण्यात आले.
  • सन २०१२ साली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.

१७ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १२३९ साली इंग्लंडचे राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६७ साली लघुलेखक(शॉर्टहँड) पद्धतीचे जनक, शिक्षक, प्रकाशक, मानवतावादी ग्रीक नागरिक जॉन रॉबर्ट ग्रेग (John Robert Gregg) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८७ साली प्रख्यात भारतीय राजकारणी, मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री तसचं, पश्चिम बंगाल व ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल कैलाशनाथ काटजू यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी, साहित्यकार तथा चित्रपट निर्माता ज्योती प्रसाद आगरवाला यांचा जन्मदिन.
  • सन १९२० साली नोबल पारितोषिक विजेता फ्रांस जीवशास्त्रज्ञ फ्रॅन्कोइस जेकब(François Jacob)  यांचा जन्मदिन.
  • सन १९७३ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्मदिन.
  • सन १९८० साली महान अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू वीनस विलियम्स(Venus Williams) यांचा जन्मदिन.
  • सन १९८१ साली दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन(Shane Watson) यांचा जन्मदिन.

१७ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 June Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६३१ साली मुघल सम्राट शाहजहा यांच्या प्रिय पत्नी मुमताज महल यांचे निधन.
  • इ.स. १६७४ साली सिंदखेड प्रांताचे प्रधान लखुजीराव जाधव यांची कन्या व शहाजी राजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाबाई यांचे निधन. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या आई होत्या.
  • इ.स. १८३९ साली ब्रिटीश कालीन भारताचे १४ वे गव्हर्नर जनरल(राज्यपाल) लॉर्ड विलियम बेटिंक(Lord William Bentinck) यांचे निधन.
  • इ.स. १८६५ साली ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग (Lord Canning)यांचे निधन.
  • इ.स. १८९५ साली महाराष्ट्रीयन थोर  भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ तसचं, लोकमान्य टिळक यांच्या केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन.
  • सन १९२८ साली महान भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी, सामाजिक कार्यकर्ता व साहित्यकार गोपबंधू दास यांचे निधन.
  • सन १९६५ साली भारतीय अभिनेते राजवंश उर्फ मोतीलाल यांचे निधन.
  • सन १९९६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस यांचे निधन.
  • सन २००४ साली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. इंदुमती पारीख यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved