जाणून घ्या १८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

18 April  Dinvishesh

मित्रानो, प्रतिवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक विश्व दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण विश्वातील मानवी सभ्यतेशी संलग्न ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या संरक्षणाप्रती लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संस्था युनेस्कोच्या अंतर्गत झालेल्या संधीनुसार सांस्कृतिक प्राकृतिक धरोहर च्या संरक्षणार्थ सन १९७२ पासून हा दिवस साजरा करण्यात येत असतो. तसचं आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 18 April Today Historical Events in Marathi

18 April History Information in Marathi
18 April History Information in Marathi

१८ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –18 April Historical Event

 • इ.स. १३३६ साली दक्षिण भारतातील डेक्कन पठारी प्रदेशांत हरिहर प्रथम व त्यांचे भाऊ बुक्का राय यांनी विजयनगर हिंदू साम्राज्याची स्थापना केली.
 • सन १७०३ साली मुघल सम्राट औरंगजेब यांनी स्वराज्यातील सिंहगड आपल्या ताब्यात घेतला.
 • इ.स. १८५३ सली मुंबई ते ठाणे शहरादरम्यान नियमित रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
 • सन १८९८ साली इंग्लिश जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे क्रांतिकारक दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आली.
 • इ.स. १९१२ साली जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज आर.एम.एस. टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्या जहाजातील प्रवाशांना बचावण्यासाठी गेलेले आर.एम.एस. कार्पेथिया हे जहाज दुर्घटनेत वाचलेल्या सुमारे ७०५ प्रवाशांना घेऊन सुखरूप न्यूयॉर्कला पोहचले.
 • सन १९३० साली क्रांतिकारक सूर्यसेन यांच्या ‘इंडियन रिपब्लिक आर्मी’ च्या कार्यकर्त्यांनी चितगाव येथील शास्त्रगार लुटले.
 • इ.स. १९५० साली अहिंसा आणि मानवी हक्कांचे भारतीय वकील तसचं,  भारतातील भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांनी आंध्रप्रदेश राज्यातील तेलंगाना शहरातील पोचमपल्ली या खेडेगावात आपल्या नावाची सुमारे ८० एकर जमीन दान करून भूदान चळवळीला प्रारंभ केला.
 • सन १९७१ साली एअर इंडिया कंपनीचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ‘सम्राट अशोक’ मोठ्या शाही दिमाखात सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी मुंबई येथील सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
 • इ.स. २००१ साली जिओ-सिंक्रोनस (भू संलग्न)उपग्रह प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-डी 1 चे प्रथम विकासात्मक उड्डाण रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वीपणे पार पडले.

१८ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७७४ साली भारतातील मराठा साम्राज्य शासक नारायणराव पेशवे यांचे पुत्र सवाई माधवराव उर्फ माधवराव नारायण पेशवे यांचा जन्मदिन.
 • सन १८५८ साली भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारत रत्न सन्मानित विधवा महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे सुप्रसिद्ध भारतीय समाजसुधारक महर्षि कर्वे उर्फ धोंडो केशव कर्वे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९०१ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी व प्रशासक चंदेश्वर नारायण प्रसाद सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९१० साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९१६ साली सुप्रसिद्ध हिंदी व मराठी चित्रपट अभिनेत्या ललिता पवार यांचा जन्मदिन.
 • सन १९५६ साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्मदिन.

१८ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –18 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८५९ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांनी इंग्रज सरकार विरुद्ध केलेल्या बंडखोरी मुळे त्यांना पकडून फाशी देण्यात आली.
 • सन १८९८ साली वीर भारतीय महाराष्ट्रीयन मराठी क्रांतीकार दामोदर हरि चापेकर यांचे निधन
 • इ.स. १९५५ साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व सापेक्षावादी सिद्धांताचे जनक अल्बर्ट आईनस्टाईन यांचे निधन.
 • सन १९५९ साली लोकप्रिय भारतीय क्रांतीकारक व पत्रकार बरिंद्र कुमार घोष  यांचे निधन.
 • इ.स. १९७२ साली भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सन्मानित संस्कृतज्ञ व विद्वान पंडित पांडुरंग वामन काणे यांचे निधन.
 • सन १९९९ साली ब्रिटेन देशाचे प्रमुख उपन्यासकार, जीवनकार आणि संपादक मैरी बुलिंस यांचे निधन.
 • इ.स. २००१ साली प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि भूगोल आदी विषयातील पार्श्वभूमी असलेले नार्वेशियान लेखक थोर हेयरडाल यांचे निधन.
 • सन २००३ साली भारतीय ‘हिंदी साहित्यिक व साहित्यकार’  सुधाकर पाण्डेय यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top