जाणून घ्या १८ मे रोजी येणारे दिनविशेष 

18  May Dinvishes 

मित्रांनो, आजचा दिवस हा आपण सर्व भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सन १९७४ साली आपल्या देशाच्या लष्करी दलाने राजस्थान मधील पोखरण या लष्करी प्रशिक्षण स्थळी आण्विक शस्त्रांची यशस्वी चाचणी केली. या चाचणी नंतर आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. जगात काहीच देश असे आहेत की ज्यांच्याकडे आण्विक शस्त्रे आहेत. या आण्विक चाचणीला ‘स्माईलिंग बुद्धा’ असे नाव देण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी राष्ट्रांव्यतिरिक्त अन्य कुठल्या राष्ट्राने आण्विक चाचणी घेण्याचे धाडस पहिल्यादांच केले होते.

तसचं, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन सुद्धा आहे. आपल्या ऐतिहासिक ग्रंथ संपदा, इतिहास कालीन कादंबरी आणि काही पौराणिक लेख या सारख्या गोष्टीं जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. जेणेकरून लोकांना याची जाणीव होईल. पुस्तके, ग्रंथ, कादंबऱ्या आपल्याला खूप सारे ज्ञान देत असतात. त्यांचा हा बहुमूल्य ठेवा आपण  जपून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याची जाणीव व्हावी याकरिता दरवर्षी १८ मे या दिवशी जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच, आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १८ मे रोजी येणारे दिनविशेष – 18 May Today Historical Events in Marathi

18 May History Information in Marathi
18 May History Information in Marathi

१८ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 May  Historical Event

 • सन १९१२ साली संपूर्णपणे भारतात बनविलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित करण्यात आला.
 • सन १९३८ साली भारतीय चित्रपट निर्मित कंपनी प्रभात ने आपला पहिला चित्रपट ‘गोपालकृष्ण’ हा मुंबईच्या सेन्ट्रल चित्रपट गृहात प्रदर्शित केला.
 • सन १९४० साली भारतीय चित्रपट निर्मित कंपनी प्रभातने संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच वेळी पुणे आणि मुंबई येथील सिनेमा गृहात प्रदर्शित केला.
 • सन १९७२ साली कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९७४ साली भारतीय लष्करी दलाने राजस्थान मधील भारतीय लष्करी दलाचे प्रशिक्षण स्थळ पोखरण इथे आण्विक शस्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.
 • सन १९९८ साली पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहक सुरेंद चव्हाण यांनी माउंट एवरेस्ट पर्वत यशस्वीपणे सर केला.
 • सन २००८ साली भारतीय पार्श्वगायक नितीन मुकेश यांना मध्यप्रदेश सरकारने भारतीय राष्ट्रीय पुरस्कार लता मंगेशकर देऊन त्यांचा सन्मान केला.

१८ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६८२ साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र संभाजी महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे पुत्र व मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराज भोसले यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५३ साली ब्रिटीश कालीन भारतातील भारतीय कवी, साहित्यकार, लेखक आणि समाजसुधारक तसचं, महिलांच्या हक्काचे रक्षणकर्ते व बालविवाहविरोधक उत्कृष वकील बहरामजी मेरवानजी मलबारी यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली भारतीय राज्य गोवा मुक्ती संग्रामातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी आणि समाजसेवक तसचं, लोकसभा व राज्यसभेचे सदस्य पुरुषोत्तम केसावा काकोडकर यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली भारतीय रिजर्व बँकेच्या दहाव्या गव्हर्नर एस. जगन्नाथ यांचा जन्मदिन.
 • सन १९२२ साली नार्वे देशातील मानसोपचारतज्ञ जर्डा बोयेसन यांचा जन्मदिन.
 • सन १९३३ साली भारतातील माजी राजकारणी व देशाचे १३ वे पंतप्रधान तसचं, कर्नाटक राज्याचे १४ वे मुख्यमंत्री हरदानाहल्ली डोडेगौडा देवगौडा यांचा जन्मदिन.
 •  सन १९७७ साली भारतीय इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व भारतीय उद्योग व्यवस्थापक अनंत बजाज यांचा जन्मदिन.

१८ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18  May Death / Punyatithi /Smrutidin

 • इ. स. १८४६ साली भारतीय महाराष्ट्रीयन पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ चे अद्यसंपादक, पत्रकार व मराठी वृत्तपत्राचे जनक आणि विद्वान पंडित बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन.
 • सन १९६६ साली प्रख्यात भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ पंचनन महेश्वरी यांचे निधन.
 • सन १९८६ साली प्रख्यात स्थापत अभियंता कानरू लक्ष्मण राव यांचे निधन.
 • सन १९९७ साली  भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रींपैकी एक कमलाबाई कामथ उर्फ कमलाबाई रघुनाथराव गोखले यांचे निधन.
 • सन १९९९ साली भारतीय बुद्धिबळपटू आणि भारतीय बुद्धीबळ स्पर्धेचे पहिले विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
 • सन २०१२ साली विश्व विख्यात जय गुरुदेव धर्मप्रचारक संस्था मथुरा चे संस्थापक व धार्मिक गुरु संत यांचे निधन.
 • सन २०१७ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top