Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २३ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 23 July Today Historical Events in Marathi

 23 July Dinvishes

मित्रंनो, आज आपल्या देशांतील थोर जहालमतवादी क्रांतिकारक, समाजसुधारक व राजकारणी, तसचं, भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या चिखलगावी झाला. बाळ गंगाधर टिळकांनी पत्रकारितेत खूप मोठ योगदान दिल आहे. त्यांनी ब्रिटीश सरकारला सरळ जाब विचारले. विनंती करून सरकार आपल्यला स्वातंत्र्य देणार नाही अशी त्यांची विचारधारणा होती. त्याकरिता जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे अशे त्यांच मत होत.

मंडालेच्या तुरुंगात असतांना त्यांनी भगवद्गीता ग्रंथाचे भाष्यांतर केल. टिळकांनी लोकांना देशाच्या स्वातंत्र्याप्रती जागृत करण्यासाठी त्यांनी देशांत अनेक प्रकल्प सुरु केले. त्यांनी शिवाजी महाराज जयंती व गणपती उत्सव देशांत साजरे करण्यास सुरवात केली. लोकांना एकीचे बाळ समजून सांगण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

तसचं, आज हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन. ब्रिटीश सरकारला हैराण करून टाकणारे महान भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक होते. त्यांनी भगतसिंह यांच्या सोबत मिळून इंग्रज सरकार विरुद्ध अनेक कट रचले परंतु, शेवट पर्यंत ते इंग्रजांच्या तावडीत सापडले नाहीत. इंग्रज सरकारने फितुरीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्वत: ला गोळी मारली परंतु ते इंग्रजाच्या तावडीत सापडले नाहीत अश्या या महान क्रांतिकारकाचा आज जन्मदिन.

जाणून घ्या २३ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 23 July Today Historical Events in Marathi

23 July History Information in Marathi
23 July History Information in Marathi

 

२३ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 July Historical Event

  • सन १९२७ साली मुंबई आकाशवाणी केंद्रावरून दररोज प्रसारण करण्यास सुरुवात करण्यात आली.
  • सन १९०३ साली फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली गाडी विकली.
  • सन १९२९ साली इटलीमधील फॅसिस्ट सरकारने परदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
  • सन १९८२ साली ‘आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
  • सन १९८६ साली जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ‘हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
  • सन २००१ साली इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मेघावती सुकर्णोपुत्री (Megawati Sukarnoputri) यांची नियुक्ती करण्यत आली.

२३ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५६ साली प्रसिद्ध भारतीय जहाल मतवादी नेता भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार व स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते केशव गंगाधर टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८५ साली अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रॅंट(Ulysses S. Grant) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८६ साली इलेक्ट्रॉन आणि आयन उत्सर्जन घटनेचा सिद्धांत विकसित करणारे महान जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर हंस शॉटकी (Walter Hans Schottky) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत भिडे उर्फ ताई भिडे यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली राजस्थान राज्यातील जयपुर च्या अत्रोली घराण्यातील गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित पसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व मनोचिकित्सक डॉ. मोहन अगाशे यांचा जन्मदिन.
  • सन १९७६ साली हंगेरी देशातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ज्युडिथ पोल्गर यांचा जन्मदिन.

२३ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८५ साली अमेरिकेचे माजी अठरावे राष्ट्राध्यक्ष युलीसेस सिंपसन ग्रांट(Ulysses S. Grant) यांचे निधन.
  • सन १९९३ साली छत्तीसगड राज्यातील भारतीय स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचे निधन.
  • सन १९९९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी व आंबेडकर चळवळीचे नेता दामोदर तात्याबा उर्फ दादासाहेब रुपवते यांचे निधन.
  • सन २००४ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्करा अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.
  • सन २०१६ साली पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved