Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

24 September Dinvishes 

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की, आजच्या दिवशी इतिहास काळात तसचं, आधुनिक जगात कोणकोणत्या घटना घडल्या होत्या. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं,  निधन पावणारे महत्वपूर्ण व्यक्ती यांच्या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या द्वारे जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 24 September Today Historical Events in Marathi

24 September History Information in Marathi
24 September History Information in Marathi

२४ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 September Historical Event

  • इ.स. १८७३ साली समाजातील शूद्र आणि अस्पृश्य लोकांवर होत असलेल्या अन्यायापासून त्यांची मुक्तता करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • सन १९३२ साली पुणे येथिल येरवडा तुरुंगात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. या करारानुसार दलित वर्गाला १३८ जागा देण्यात आल्या.
  • सन १९४६ साली हॉंगकॉंग देशांत ‘पॅसिफिक एअर वेज’ ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९४८ साली जपानी सार्वजनिक बहुराष्ट्रीय कंपनी होंडा मोटर कंपनी, लि. स्थापना करण्यात आली.
  • सन १९९० साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.
  • सन २००२ साली गुजरात येथील अक्षर धाम मंदिरात आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे ३३ लोक ठार तर ८० पेक्षा जास्त नागरिक जख्मी झाले होते.
  • सन २००७ साली भारतीय क्रिकेट संघाने महेंद्र सिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका येथे आयोजित पहिला टी २० वर्ल्ड कप जिंकला.
  • सन २००९ साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.
  • सन २०१४ साली भारतीय मंगळ यान यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापित झालं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला. याकरिता सरकारने ४५० करोड रुपये खर्च केले होते.

२४ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –24 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५६ साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६१ साली ब्रिटीश कालीन भारतात स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगा ध्वज फडकविणाऱ्या प्रख्यात भारतीय पारसी क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी कामा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८९ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमीवरील अभिनेते, व नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली प्राचीन भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचे अभ्यासक व इतिहासकार अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समीक्षक व संपादक सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्मदिन.
  • सन १९४० साली इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय तथा आशियाई महिला आरती साहा यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विद्यमान क्रिकेट विश्लेषक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्मदिन.
  • सन १९६३ साली भारतीय दूरदर्शन समालोचक आणि पत्रकार तसचं,  गो न्यूज चॅनेलचे संस्थापक आणि मुख्य संस्थापक पंकज पचौरी यांचा जन्मदिन.

२४ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९७५ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बहुभाषिक लेखक, व चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अलूरी चक्रपाणी यांचे निधन.
  • सन १९९२ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी तेरावे मुख्यन्यायाधीश एस. एम. सिकरी यांचे निधन.
  • सन १९९८ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक वासुदेव पाळंदे यांचे निधन.
  • सन २००२ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचे निधन.
  • सन २००२ साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ तसचं, भारतातील रिमोट सेन्सिंगचे जनक पी. आर. पिशरोटी यांचे निधन.
  • सन २०१२ साली केरळ राज्य पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट व रंगमंच अभिनेते के. सुरेंद्रनाथ थिलकन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved