Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

25 September Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवसाला त्या दिवशी घडलेल्या विशेष अश्या घटनेमुळे महत्व प्राप्त होत असते. आपल्या भूतकाळात २५ सप्टेंबर या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत, ज्यांचा आपल्याला विसर पडलेला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण अश्याच काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती, तसचं, निधन वार्ता या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 25 September Today Historical Events in Marathi

25 September History Information in Marathi
25 September History Information in Marathi

२५ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 September Historical Event

  • सन १९१९ साली महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे आशियामधील अग्रगण्य असणारी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
  • सन १९२६ साली फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांनी कंपनीत काम करणाऱ्या मजुरांसाठी सप्ताहात पाच दिवस आणि रोज आठ तास काम करण्याची महत्वपूर्ण योजना लागू केली.
  • सन १९५० साली सयुक्त राष्ट्राने दक्षिण कोरियाची राजधानी सियोल ला आपल्या नियंत्रणात आणल.
  • सन १९५५ साली  जॉर्डन देशातील रॉयल जॉर्डनियन एअर फोर्स या वायुदलाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९५६ साली अमेरिका आणि युरोप या राष्ट्रांमध्ये पहिली अंडर वाटर टेलिफोन सेवा सुरु झाली होती.
  • सन १९९२ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाचे पृष्ठभाग, वातावरण, हवामान आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मार्स ऑब्जर्व्हर स्पेसक्राफ्ट, म्हणजेच मार्स जिओसायन्स / क्लायमेटोलॉजी ऑर्बिटर नावाचा रोबोट स्पेस प्रोब अवकाशात पाठवला.
  • सन २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजेच ‘सौभाग्य’  योजनेची सुरुवात केली.
  • सन २०१७ साली पश्चिम बंगाल येथील तृणमूल कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता मुकुल रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

२५ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९१४ साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी सहावे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली भारतीय राजकारणी आणि भारतीय जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन.
  • सन १९२० साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आणि एरोस्पेस अभियंता तसचं, भारतीय अंतराळ संस्था इस्रो चे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सेनानी, बॅरिस्टर आणि प्रजा सोशलिस्ट पक्षाचे प्रमुख नेते बॅ. नाथ पै यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली महाराष्ट्रीयन मराठी नाटककार, कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक बाळकृष्ण हरी उर्फ बाळ कोल्हटकर यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय महाराष्ट्रीयन पत्रकार व लोकसत्ता या मराठी दैनिकांचे संपादक माधव यशवंत गडकरी यांचा जन्मदिन.

२५ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९५५ साली भारतातील पहिल्या प्रैक्टिसिंग महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचे निधन.
  • सन १९८९ साली भारतीय स्वातंत्रता सेनानी व साहित्यकार सुदर्शन सिंह चक्र यांचे निधन.
  • सन १९९० साली भारतीय बंगाली राजकारणी व स्वातंत्रता सेनानी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल चंद्र सेन यांचे निधन.
  • सन १९९८ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक लालन सारंग यांचे निधन.
  • सन २००४ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी व इंग्रजी भाषिक कवी, अरुण बाळकृष्ण कोल्हटकर यांचे निधन.
  • सन २०१० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय वरिष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यकार, कवी व गीतकार तसचं,  नवभारत टाइम्सचे भूतपूर्व वैशिष्ट्य संपादक कन्हैया लाल नंदन यांचे निधन
  • सन २०१३ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved