महान शिक्षाविद आणि समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील

Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi

Karmaveer Bhaurao Patil

महान शिक्षाविद आणि समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील – Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi

नाव (Name): कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म (Birthday): 22 सप्टेंबर 1887
जन्मस्थान (Birthplace): ‘कुंभोज’ जिल्हा कोल्हापुर
मुळगांव: ‘ऐतवडे’ जिल्हा सांगली
वडिल (Father Name): पायगोंडा पाटील
आईचे नाव (Mother Name): गंगाबाई
पत्नीचे नाव (Wife Name): लक्ष्मीबाई (वयाच्या 18 व्या वर्षी लक्ष्मीबाईंसोबत विवाह)
संस्था (organization): रयत शिक्षण संस्था
पुरस्कार (Award): ‘पद्मभुषण’
मृत्यु (Death):  9 मे 1959

बालपणापासुन भाऊराव बंडखोर स्वभावाचे होते. अन्याय त्यांना कदापीही सहन होत नसे. जातीभेद, स्पृश्यअस्पृश्य हा भेदभाव पाहुन त्यांच्या मनात प्रचंड चिड निर्माण व्हायची. एकदा अस्पृश्यांना विहीरीतुन पाणी भरू दिले जात नाही हे पाहुन त्यांनी त्या विहीरीचा रहाटच तोडुन टाकला. एवढी चीड जातीभेदाला पाहुन त्यांच्या मनात उत्पन्न व्हायची.

सुरूवातीचे शिक्षण कुंभोज त्यानंतर दहिवडी आणि विटे येथे पार पडले. राजाराम हायस्कुलला माध्यमिक शिक्षणाकरता प्रवेश घेतला (1902-1909 ) भाऊरावांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला होता. शिक्षणाकरता ते जैन वसतीगृहात राहात असतांना एकदा एका अस्पृश्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर वसतीगृहात परतल्यावर त्यांना स्नान करण्याचा आग्रह धरण्यात आला त्यांनी तो नियम मोडला आणि त्यामुळे त्या वसतीगृहातुन त्यांना हाकलुन देण्यात आले.

भाऊराव तेथुन शाहु महाराजांकडे राजवाडयात आले. शाहु महाराजांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा भाऊरावांवर चांगलाच प्रभाव पडला. पुढे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीशी त्यांची नाळ बांधल्या गेली आपसुकच फुलेंच्या आणि विðल रामजी शिंदेंच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला.

ईस्लामपुर या गावी भाऊरावांनी एका अस्पृश्य विद्याथ्र्याला वर्गाच्या बाहेर बसुन शिकत असल्याचे पाहिले. त्याक्षणी त्यांच्या मनाला फार वेदना झाल्या. ज्ञानदेव घोलप नावाच्या त्या विद्याथ्र्याला त्यांनी सोबत घेतले, आपल्या घरी नेउन त्याला आपल्याबरोबर जेवावयास बसविले कोल्हापुर येथील एका वसतीगृहात त्याला प्रवेश मिळवुन दिला.

हे सगळ केल्याने भाऊरावांना घरच्या मंडळींच्या रागाला सामोरे जावे लागले त्यांना भरपुर मार मिळाला. भाऊरावांनी ज्या विदयाथ्र्याकरता हे सर्व केलं तो ज्ञानदेव घोलप पुढे रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी झाला. याशिवाय विधानसभेचा प्रथम मागास सदस्य प्रतिनीधी देखील बनला.

सहाव्या वर्गात असतांना भाऊरावांनी इंग्रजी शाळेला रामराम ठोकला आणि सातारा या गावी खाजगी शिकवणी सुरू केली. या ठिकाणी “पाटील गुरूजी” म्हणुन त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली. भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर, मदवानगुरूजी यांच्या संपर्कात ते आले आणि 1909 ला दुधगावी ’दुधगाव विद्यार्थी आश्रमा’ची त्यांनी स्थापना केली. सगळया जातीधर्माच्या मुलांकरता या संस्थेने एका वसतीगृहाची सोय केली.

खरंतर रयत शिक्षण संस्थेची बीज यातुनच पेरल्या गेली होती. पुढे या सर्व मंडळींनी मिळुन ’दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची ’ सुरूवात केली. भाऊरावांचा भारताच्या स्वातंत्र्य लढयात देखील सहभाग होता. एकदा कोल्हापुर ला किंग एडवर्ड या ब्रिटीशाच्या पुतळयाला 1914 साली डांबर फासण्यात आले.

हे काम लट्टे नावाच्या व्यक्तीचे (स्वातंत्र्य सैनिक) असल्याचा ब्रिटीश अधिका.यांना संशय होता आणि त्याविरोधात भाऊरावांनी साक्ष द्यावी म्हणुन त्यांचा अतिशय छळ केला गेला. हा छळ एवढा अमानविय होता की भाऊरावांनी त्या दरम्यान दोन वेळेला आत्महत्येचा देखील विचार केला पण त्यात सुदैवाने ते वाचले आणि अखेरीस या प्रकरणातुन ते सुटले.

भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या जिल्हयात स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भुमिगत असलेल्या पुढा.यांना मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना “कर्मवीर” ही पदवी बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. पुढे 1924 च्या दरम्यान भाऊराव व्यवसायामधुन आणि त्रासातुन मोकळे झाले पुढे शैक्षणिक कामाकरता त्यांनी स्वतःला वाहुन घेतलं.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची महत्वाची कार्ये – Karmaveer Bhaurao Patil Social Work

  • 1919 साली बहुजन समाजाला शिक्षण मिळावे या उदात्त हेतुने शैक्षणिक संस्था सुरू करण्याकरीता प्रस्ताव मंजुर करून घेतला.
  • 1919 साली 4 ऑक्टोबर ला विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊरावांनी ’’रयत शिक्षण संस्था’’ स्थापन केली.
  • या संस्थेची स्थापना काले (सातारा जिल्हा) या गावी करण्यात आली होती
  • काले या गावीच या संस्थेच्या वतीनं वसतिगृह, प्राथमिक शाळा, आणि एका रात्रशाळेची त्यांनी सुरूवात करून शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा केला.
  • भाऊरावांनी विद्याथ्र्यांमधे समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जाणीव यांची बीजं रोवली
  • रयत शिक्षण संस्थेची चतुःसुत्री म्हणजे स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय.
  • शिक्षणाच्या दृष्टीकोनातुन जो वर्ग मागासलेला आहे त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना निशुल्क शिक्षण मिळावं, वेगवेगळया धर्मातील, पंथातील विदयाथ्र्यांना एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण व्हावी, जुन्या चालिरीतींना मुठमाती देउन विद्याथ्र्यांमधे विकासाचे संस्कार घडवावे, एकजुटीचे महत्व पटवुन देणे, विदयार्थी काटकसरी, स्वावलंबी, उत्साही आणि चारित्र्यवान घडविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता प्रसंगी संस्थेचा क्षे़त्रीय दृष्टया विस्तार करणे ही या रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टं होती.
  • 1921 साली भाऊराव पाटील महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले. गांधीजींच्या विचारांचा भाऊरावांवर खोल परिणाम झाला. त्यांनी गांधीजींप्रमाणेच खादीचा स्विकार केला. आणि आपल्या आयुष्यात महात्मा गांधीजींच्या तत्वांना पुर्णतः अंगिकारले.
  • भारत सरकारनं कर्मवीर भाऊराव पाटलांना ‘पद्मभुषण’ या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
  • पुणे विद्यापीठाने 1959 साली ’डॉक्टर ऑफ लिटरेचर’ या पदवीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

Read More:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ भाऊराव पाटीलबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top