Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २७ मे रोजी येणारे दिनविशेष

27 May Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपण सर्व भारतीय नागरिकांसाठी अति महत्वाचा दिवस आहे.  आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे. ब्रिटीश कालीन भारतात जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्या सोबत मिळून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोलाचं काम केलं. लहान मुले त्यांना खूप आवडायचे त्यामुळे त्यांना लहान मुले प्रेमाने चाचा नेहरू म्हणून देखील संबोधत असत.

याव्यतिरिक्त, आज आपण या लेखाच्या माध्यामतून काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन, निधन, व त्यांचे कार्य तसचं, काही ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २७ मे रोजी येणारे दिनविशेष – 27 May Today Historical Events in Marathi

27 May History Information in Marathi
27 May History Information in Marathi

२७ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 May  Historical Event

  • सन १९०६ साली महाराष्ट्रात महाराष्ट्र सहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली.
  •  सन १९४१ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान अमिरीकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी देशांत आणीबाणी जाहीर केली.
  • सन १९५१ साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथे तारापोरवाला नावाचे मत्स्यालय सुरु करण्यात आले.
  • सन १९६४ साली भारतीय राजकारणी गुलजारी लाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला.
  • सन १९९४ साली नोबेल साहित्य पुरस्कार विजेते रशियन लेखक अलेक्झांडर सॉल्केनिटसेन पाश्चिमात्य देशातील वीस वर्षांचा आपला वनवास संपवून आपल्या देशांत परतले.
  • सन २००२ साली नेपाल चे तत्कालीन पंतप्रधान देऊबा यांना तीन वर्षाकरिता पक्षातून बाहेर काढण्यात आलं.
  • सन २००८ साली भारत सरकारने सिमेंटच्या निर्यातीवर लावलेला प्रतिबंध मागे घेतला.
  • सन २०१० साली भारतातील ओडिसा राज्याच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर या ठिकाणी अणु तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या धनुष आणि पृथ्वी २ क्षेपणास्त्रांची भारतीय लष्करी दलाने यशस्वी चाचणी केली.

२७ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९३१ साली पद्मश्री, पद्मविभूषण तसचं, संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय लेखक, कवी, नाटककार, अनुवादक, आणि गीतकार डॉ. ओट्टाप्लाक्कल नीलकंदन वेलु कुरुप यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली भारतीय धावपटू आणि पत्रकार रणजीत भाटीया यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तसचं, पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मराठी भाषिक लेखक, कादंबरीकार, कवी, समालोचक आणि शिक्षणतज्ञ भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिन.
  • सन १९५७ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व उद्योजक, तसचं, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भारत सरकारमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिन.
  • सन १९६२ साली प्रख्यात माजी भारतीय क्रिकेटपटू, माजी क्रिकेट खेळ समालोचक आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रविशंकर शास्त्री यांचा जन्मदिन.
  • सन १९६३ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अमेरिकन व्यवसायिक तसचं, अ‍ॅडोब इंक चे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक, समालोचक आणि माजी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्मदिन.

२७ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९१९ साली ब्रिटिश कालीन भारतातील मद्रास प्रेसीडेंसीचे समाजसुधारक आणि लेखक तसचं, तेलगु भाषिक नवजागरण चळवळीचे जनक राव बहादुर कंदुकुरी वीरेसलिंगम पंतुलू यांचे निधन.
  • सन १९३५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
  • सन १९६४ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य व स्वातंत्र्य कार्यकर्ते तसचं, ब्रिटीश कालीन भारतातील व स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन.
  • सन १९८३ साली भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसचं, राजस्थान राज्याचे माजी राज्यपाल सरदार हुकम सिंह यांचे निधन.
  • सन १९९४ साली महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन.
  • सन २००८ साली ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता सिडनी इर्विन पोलॅक यांचे निधन.
  • सन २०१६ साली अशोक चक्र पुरस्कार सन्मानित धाडसी भारतीय लष्कर सैन्याच्या आसाम रेजिमेंटचे शिपाई हवालदार हंगपन दादा यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved