जाणून घ्या ३ जुलै रोजी येणारे दिनविशेष

3 July Dinvishes

मित्रानो, आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याकरिता आजच्या दिनी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटना, तसचं, आधुनिक शोध, विशेष व्यति जन्मदिन आणि मृत्युदिन आदी घटनांची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा आहे. तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

जाणून घ्या ३ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 3 July Today Historical Events in Marathi

3 July History Information in Marathi
3 July History Information in Marathi

जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 July Historical Event

 • इ.स. १६६१ साली पोर्तुगीजांनी इंग्लंडचे राजा चार्ल्स(Charles) द्वितीय यांना मुंबई व तंजौर बेट भेट दिले.
 • इ.स. १७६० साली मराठा सेनेने दिल्लीवर ताबा मिळविला.
 • इ.स. १८५० साली भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्लंड देशातील इस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केलं. भारतावर राज्य करीत असतांना त्यांनी आपल्या देशांतील बहुमोल्य हिरा कोहिनूर आपल्या सोबत घेऊन गेले.
 • इ.स. १८५२ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.
 • इ.स. १८५५ साली ब्रिटीश कालीन भारतात कायद्याचे शिक्षण घेण्यास प्रारंभ झाला.
 • सन १९०८ साली इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली.
 • सन १९७२ साली भारत आणि पाकिस्तान देशांत काश्मीर संबंधी नि:शस्त्र करार झाला.
 • सन १९९८ साली प्रसिद्ध भारतीय गीतकार व कवी तसचं, ऐ मेरे वतन के लोगों या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००० साली भारतीय विमान वाहू युद्धनौका विक्रांतचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतरण करण्यात आलं.
 • सन २०१७ साली अचल कुमार ज्योती यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली.

जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८३८ साली महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार व लेखक, तसचं, नामवंत कायदेपंडित व प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८६ साली कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचे अभ्यासक तत्ववेत्ता संत तसचं, फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली समाज प्रबोधनाचे थोर शिल्पकार,  भारतीय वकील, नागरी हक्क कार्यकर्ते आणि मानवतावादी नेते तसचं, “नागरी स्वतंत्रता चळवळीचे जनक” म्हणून प्रसिद्ध माजी भारतीय न्यायाधीश विठ्ठल महादेव तारकुंडे यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इतिहासकार, नाटककार, कला समीक्षक, कला दिग्दर्शक, नाट्यगृह आणि वेशभूषाकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखिका सुनिता पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्मदिन.
 • सन १९७७ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन माराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९८० साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह यांचा जन्मदिन.

जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 July Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १३५० साली हिंदू धर्मीय बांधवाच्या वारकरी संप्रदायाचे जनक संत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली.
 • सन १९९६ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता व मुंबई येथील माजी पोलिस उपनिरीक्षक कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार यांचा यांचे निधन.
 • सन १९६९ साली प्रसिद्ध ‘द रोलिंग स्टोन्स’ चे संस्थापक व इंग्लंड देशांतील महान गिटार वादक तसचं, हार्मोनियम व पियानो वादक संगीतकार ब्रायन जोन्स (Brian Jones) यांचे निधन.
 • सन १९७१ साली अमेरिकन गायक, गीतकार आणि कवी जिम मॉरिसन (Jim Morrison) यांचे निधन.
 • सन १९९९ साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित गोरखा रायफल्सचे भारतीय सैन्य अधिकारी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे निधन.
 • सन २०१५ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी (३६वे) सरन्यायाधीश योगेश कुमार सभरवाल यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here