Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ८ जून रोजी येणारे दिनविशेष

8 June Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक महासागर दिन. ८ जून या दिवशी हा दिन साजरा करण्यात येतो. कारण, दिवसंदिवस समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातील प्रस्ताव सन १९९२ साली कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत  मांडले होते.त्या प्रस्तावाला सयुक्त राष्ट्रसंघाने सन २००८ साली मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी ‘द ओशन प्रोजेक्ट’  या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

मित्रानो, आपण सुद्धा समुद्र दुषित होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. समुद्र ही निसर्गातील सर्वात सुंदर बाब आहे. त्यामुळे कधी पर्यटनाला समुद्र किनारी गेलात तर त्या ठिकाणी स्वच्छता राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. तसचं, आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिनाचे दिनविशेष पाहणार आहोत. जसे, महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ८ जून रोजी येणारे दिनविशेष – 8 June Today Historical Events in Marathi

8 June History Information in Marathi
8 June History Information in Marathi

८ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 June Historical Event

  • इ.स. १६५८ साली मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला
  • इ.स. १६७० साली पुरंदरच्या तहात गमाविलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मिळविला.
  • इ.स. १७०७ साली मुघल शासक औरंगजेब यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र मुअज्जम आणि आझम शाह यांच्यात दिल्लीच्या तख्तासाठी आपआपसात युद्ध झाले. या युद्धात मुअज्जम यांनी आझम शाह यांना ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
  • सन १९३६ साली भारत सरकारच्या रेडियो नेटवर्कचे नाव बदलून ऑल इंडिया रेडियो असे ठेवण्यात आले.
  • सन १९४८ साली भारत व इंग्लंड या दोन देशादरम्यान एअर इंडियाची हवाई सेवा सुरु करण्यात आली.
  • सन १९६८ साली बर्मोडा देशाने संविधान अंगिकारले.
  • सन १९६९ साली भारतीय लष्कर प्रमुख पदी सॅम माणेकशॉ यांची नियुक्ती करण्यात आली.
  • सन १९९२ साली पहिला जागतिक महासागर दिन साजरा करण्यात आला.

८ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९१० साली महाराष्ट्रीयन मराठी समिक्षक, लेखक, विचारवंत व साहित्यिक दिनकर केशव बेडेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक, संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली इंडोनेशिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो (Suharto) यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश ( George H. W. Bush) यांच्या पत्नी व बार्बरा बुश (Barbara Bush) फाउंडेशनच्या संस्थापिका बार्बरा बुश यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली माजी भारतीय क्रिकेटपटू सैयद नझीर अली यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली नोबल पारितोषिक सन्मानित अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनेथ जी विल्सन( Kenneth G. Wilson) यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली विश्व व्यापी वेब चे आविष्कारक तसचं, विश्व व्यापी वेब संघाचे विद्यमान निर्देशक व शोधकर्ता इंग्लिश अभियंता व संगणक संशोधक टिम बर्नर्स ली (Tim Berners-Lee) यांचा जन्मदिन.
  • सन १९५७ साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार शिल्पा शेट्टी यांचा जन्मदिन.

८ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 June Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स पूर्व ६३२ साली प्रख्यात अरब धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचे निधन.
  • इ.स. १८०९ साली प्रसिद्ध इंग्रज वंशीय अमेरिकन राजकीय कार्यकर्ते, तत्वज्ञ, राजकीय सिद्धांताकार आणि क्रांतिकारक थॉमस पेन (Thomas Paine) यांचे निधन.
  • इ.स. १८४५ साली अमेरिकेचे माजी सैनिक व राजकारणी तसचं, अमेरिकेचे माजी सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन(Andrew Jackson) यांचे निधन.
  •  सन १९६८ साली कर्नाटकी संगीत क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते कर्नाटक संगीत गायक मदुराई मणी अय्यर यांचे निधन.
  • सन २००९ साली लोकप्रिय भारतीय उर्दू-हिंदी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता हबीब तनवीर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved