Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २६ जून रोजी येणारे दिनविशेष

26 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व त्यांचे महत्वपूर्ण कार्य याबद्दल थोड्क्यात माहिती जाणून घेणार आहोत.

आजचा दिवस हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून मानला जातो. जगातील अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी तसचं, अंमली पदार्थांचे गैरवर्तन आणि अवैध तस्करीविरूद्ध उपाय योजना म्हणून व अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध औषधांच्या व्यापार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने सन १९८९ पासून २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविलं आहे.

जाणून घ्या २६ जून रोजी येणारे दिनविशेष – 26 June Today Historical Events in Marathi

26 June History Information in Marathi
26 June History Information in Marathi

२६ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 June Historical Event

  • सन १९४९ साली बेल्जियम देशांतील महिलांना प्रथमच संसदीय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळाला.
  • सन १९६८ साली पुणे येथील बाल गंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
  • सन १९७४ साली नागपुर जवळील कोरडी येथील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती करण्यास प्रारंभ करण्यात आला.
  • सन १९७४ साली अमेरिकेतील एक सुपर मार्केटमध्ये वस्तूंवर प्रथमच बारकोड लावण्यास सुरुवात झाली.
  • सन १९९९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे पार पडला.
  • सन १९९९ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला.
  • सन २००० साली पी. बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कमांडोर बनल्या.

२६ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७३० साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर (Charles Messier) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८२४ साली आयरिश-स्कॉटिश वंशीय गणितीय भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता सर विलियम थॉमसन (William Thomson) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७३ साली प्रसिद्ध भारतीय गायिका आणि नर्तक गौहर जान यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७४ साली कोल्हापुर येथील मराठयांच्या भोसले घराण्यातील शासक तसचं, थोर समाजसुधारक व लोकशाहीवादी तसचं, संगीत, नाटक कलेचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८८ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायिका व रंगमंच कलाकार, बाल गंधर्व यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली पुलित्झर पुरस्कार विजेता प्रसिद्ध अमेरिकन लेखिका व कादंबरीकार पर्ल एस बक यांचा जन्मदिन.
  •  सन १९१६ साली मराठ्यांच्या ग्वाल्हेर राज्यातील सिंधिया घराण्याचे शेवटचे शासक महाराजा जिवाजीराव सिंधिया यांचा जन्मदिन.
  • सन १९१८ साली परमवीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्मदिन.
  • सन १९९२ साली अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह यांचा जन्मदिन.

२६ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४३ साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ञ तसचं, रक्त गटांचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करणारे महान संशोधक कार्ल लैंडस्टीनर (Karl Landsteiner) यांचे निधन.
  • सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार गोविंद शास्त्री दुगवेकर यांचे निधन.
  • सन १९९४ साली प्रसिद्ध बांगलादेशी राजकारणी व लेखिका जहनारा इमाम यांचे निधन.
  • सन २००१ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व कथा- कथाकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व. पु. काळे यांचे निधन.
  • सन २००४ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता व धर्मा प्रोडक्शन कंपनीचे संस्थापक यश जोहर यांचे निधन.
  • सन २००५ साली माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved