Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १४ जुलै रोजी येणारे दिनविशेष

14 July Dinvishes

मित्रांनो आज आपल्या देशाचे थोर समाजसुधारक व तत्वज्ञानी विचारवंत तसचं लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरक यांचा जन्मदिन. आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे अनेक हलापेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला येथे पूर्ण झाले. यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण पुणे इथे पूर्ण केलं. त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली.

शिक्षण घेत असल्यापासून त्यांची टिळकांप्रती खूप श्रद्धा होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाचा त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निर्माण केलेल्या जहाल विचारमत वादी राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांना जाऊन मिळाले. आगरकर यांनी आपल्या जीवनात अनेक सामाजिक सुधारणा केल्या. अश्या या महान समाजसुधारक महा मानवाची आज जयंती.

मित्रांनो, याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महान व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांची कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १४ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 14 July Today Historical Events in Marathi

14 July History Information in Marathi
14 July History Information in Marathi

१४ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 July Historical Event

  • इ.स. १८५६ साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक, लोकमान्य टिळकांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक तसचं, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, गोपाल गणेश आगरकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६२ साली ऑस्ट्रिया देशाचे प्रतीकात्मक चित्रकार आणि व्हिएन्ना सेसेशन चळवळीतील एक प्रमुख सदस्य गुस्ताव किल्म्ट(Gustav Klimt) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८४ साली ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्मदिन.
  • सन १९०१ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा जन्मदिन.
  • सन १९२० साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली मॉरीशस देशाचे भूतपूर्व पंतप्रधान नवीन रामगुलाम(Ramgulam Chaudhary) यांचा जन्मदिन.
  • सन १९६७ साली श्रीलंका देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार व राजकारणी हसन तिलकरत्ने(Hassan Tillakaratne)  यांचा जन्मदिन.

१४ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०४ साली दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी व दक्षिण आफ्रिकन रिपब्लिकचे माजी अध्यक्ष पॉल क्रूगर(Paul Krueger) यांचे निधन.
  • सन १९३६ साली न्यूबेरी पदक विजेता अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय अक्षरवीर धन गोपाल मुखर्जी यांचे निधन.
  • सन १९६३ साली भारतीय हिंदू अध्यात्मिक शिक्षक आणि योग आणि वेदांत यांचे समर्थक शिवानंद सरस्वती यांचे निधन.
  • सन १९७१ साली भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर फिल्ड हॉकी, सॉकर, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचे निधन.
  • सन १९७५ साली सत्तरच्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचे निधन.
  • सन २००३ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन.
  •  सन २००३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उर्फ रुजू भैय्या यांचे निधन.
  • सन २००८ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी (१६वे) सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन.

१४ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७८९ साली पॅरिस मधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्याया विरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतिक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली.
  • इ.स. १८६७ साली आल्फ्रेड नोबेल(Alfred Nobel) यांनी डायनामाईट या स्फोटकाची यशस्वी चाचणी घेतली.
  • सन १९७६ साली कॅनडा देशांत मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
  • सन १९७९ साली अमेरिकेने अणुचाचणी केली.
  • सन २००३ साली जागतिक बुद्धिबळ महासंघा द्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला.
  • सन २०१३ साली १६० वर्षांपासून सुरु असलेली डाकतार विभागाची सेवा बंद करण्यात आली.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved