Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

1 August Dinvishes

मित्रांनो, ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकारकडून देशांतील नागरिकांवर होत असलेला अत्याचार पाहून महात्मा गांधी यांनी सन १ ऑगस्ट १९२० साली असहयोग आंदोलन सुरु केलं.

या आंदोलनाच्या वेळी भारतातील विद्यार्थांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण बंद केलं. तसचं, भारतीय वकिलांनी कोर्टात जाने बंद केलं. देशाच्या अनेक भागातील श्रमिक व कामगारांनी काम बंद करून संप पुकारले. सन १९२१ साली झालेल्या संपामुळे  खूप मोठ आर्थिक नुकसान झालं होत.

महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या असहयोग आंदोलनाने देशांत खूप मोठा वनवा पेटला होता. सन १८५७ साली झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आंदोलनानंतर देशांत झालेलं हे दुसर मोठ आंदोलन होय. देशांत जागोजागी या आंदोलनाला लोक समर्थन देऊ लागले. या आंदोलनामुळे इंग्रज सरकारचे कंबरडे मोडल्या गेले होते. परंतु, सन १९२२ साली झालेल्या गौराखापूर येथील चौराचोरी घटनेमुळे महात्मा गांधी यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

तसचं, मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी भूतकाळात जमा झालेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 1 August Today Historical Events in Marathi

1 August History Information in Marathi
1 August History Information in Marathi

१ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 August Historical Event

  • सन १९१४ साली जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारून पहिल्या महायुद्धाला सुरुवात केली.
  • सन १९२० साली महात्मा गांधींनी स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने असहकार चळवळ सुरू केली होती.
  • सन १९२० साली महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दु:खी होऊन इंग्रज सरकारने दिलेला ‘केसर ए हिंद’  हा किताब वापस केला.
  • सन १९३६ साली जर्मन हुकुमशहा शासक एडॉल्फ हिटलर(Adolf Hitler) यांनी बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांचे अध्यक्षस्थान भूषविले.
  • सन १९४७ साली भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर लॉर्ड माउंटबॅटन(Louis Mountbatten) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले.
  • सन १९५६ साली दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसचं भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या.
  • सन १९५७ साली भारतीय प्रकाशन गृह नॅशनल बुक ट्रस्ट ची स्थापना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली. ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालय, सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्य करते.
  • सन १९५८ साली आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • सन १९९४ साली भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू करण्यात आली.
  • सन १९९६ साली भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते व निर्माता डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००४ साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना 1 ऑगस्ट 2004 रोजी झाली आणि त्याचे उद्घाटन 3 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केले.

१ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६९ साली ब्रिटीश कालीन भारतातील आग्रा व अवध या संयुक्त प्रांतांचे पहिले गव्हर्नर सर स्पेन्सर हार्कोर्ट बटलर(Harcourt Butler) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान दादा यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९२० साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक, लोककवी, लेखक,  शाहीर, कथा व कादंबरीकार तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली वेस्ट इंडीज संघाचे माजी क्रिकेटपटू व कर्णधार सर फ्रँक मॉर्टिमर मॅग्लिन वॉरेल(Sir Frank Mortimer Maglinne Worrell) यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली ‘मीनाकुमारी’ या नावाने प्रसिद्ध असेलेल्या प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायक आणि कवी महजबीन बानो यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट विश्लेषक, भाष्यकार अरूणलाल यांचा जन्मदिन.
  • सन १९६९ साली माजी इंग्लिश कसोटी क्रिकेटपटू ग्रॅहम पॉल थॉर्पे(Graham Paul Thorpe) यांचा जन्मदिन.

१ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १५९१ साली मुघल शासक बादशाहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी उर्फी शीराजी यांचे निधन.
  • इ.स. १८६३ साली पंजाब प्रांताचे महाराज रणजीत सिंह यांची पाचवी पत्नी तथा महाराज दलीप सिंह यांची आई ज़िन्दाँ राणी यांचे निधन.
  • सन १९१३ साली भारतीय हिंदी भाषेतील लोकप्रिय कादंबरीकार व लेखक देवकी नंदन खत्री यांचे निधन.
  • सन १९२० साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचे निधन.
  • सन १९९९ साली प्रख्यात भारतीय इंग्रजी व बंगाली भाषेचे लेखक व विद्वान नीरद चंद्र चौधरी यांचे निधन.
  • सन २००० साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक, कवी व चित्रपट गीतकार अली सरदार जाफरी यांचे निधन.
  • सन २००८ साली पंजाबमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राजकारणी तसचं, पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य हरकिशनसिंग सुरजीत यांचे निधन.
  • सन २००८ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अशोक विनू माणकड यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved