Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

6 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात तसचं, आधुनिक जगात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती तसचं, निधन वार्ता या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 6 October Today Historical Events in Marathi

6 October History Information in Marathi
6 October History Information in Marathi

६ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 October Historical Event

  • सन १९२७ साली पहिला बोलता चित्रपट द जाझ सिंगर(The Jazz Singer) प्रदर्शित करण्यात आला होता.
  • सन १९४९ साली जगातील पहिली ट्राय सर्विस अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीची पायाभरणी केली गेली. परंतु, या अकादमीला आधिकारिक रित्या ७ डिसेंबर १९५४ साली मान्यता देण्यात आली.
  • सन १९७७ साली सोव्हियत संघाद्वारे निर्मित मिग २९ या लढाऊ विमानाचे देशांत पहिल्यांदा उड्डाण करण्यात आले.
  • सन १९८७ साली फिजी प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
  • सन १९८९ साली मीरा साहेब फातिमा बिबी यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लीम महिला होत्या.

६ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६७९ साली मुघल शासक मुहम्मद अकबर यांचे पुत्र व मुघल वंशाचे १२ वे शासक बादशाहा नेक सियर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७७९ साली स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन(Mountstuart Elphinstone) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९३ साली ताऱ्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांताचे स्पष्टीकरण करणारे सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ मेघनाद साहा(Meghnad Saha) यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी तसचं, मराठवाडा साहित्य संमेलनाचे व कवी संमेलनाचे माजी अध्यक्ष वामन रामराव उर्फ वा. रा. कांत यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता व राजकारणी विनोद खन्ना यांचा जन्मदिन.

६ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६६१ साली शीख धर्मियांचे सातवे गुरु गुरु हर राय यांचे निधन.
  • सन १९७४ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी भारतीय संरक्षणमंत्री व मुत्सद्दी व्ही. के. कृष्ण मेनन(V. K. Krishna Menon) यांचे निधन.
  • सन १९७९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी इतिहासकार, लेखक आणि वक्ता तसचं, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शुद्ध लेखन महामंडळाचे अध्यक्ष महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन.
  • सन १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राजस्थान येथील भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी नेता व समाजसेवक गोकुलभाई भट्ट यांचे निधन.
  • सन २००७ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन.
  • सन २००७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय न्यायशास्त्रज्ञ, संसद सदस्य, अभ्यासक, लेखक आणि मुत्सद्दी तसचं, भारताचे इंग्लंड मधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved