Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

24 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असणारा दिवस आहे. आजच्या दिवशी भूतकाळात अनेक अश्या महत्वपूर्ण घटना घडून घेल्या आहेत ज्या आपणास कदाचित माहिती नसतील. मित्रांनो, आज आपण अश्याच काही महत्वपूर्ण घटनांची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज संयुक्त राष्ट्रीय दिन आहे. सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती नंतर अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता चर्चा करण्यात आली. त्या सभेतील सुमारे पन्नास देशांनी एकत्र येवून देशांत शांतता प्रस्तापित व्हावी याकरिता एक विधायक तयार केले व त्यावर हस्ताक्षर करून संयुक्त राष्ट्राची स्थापना केली.  त्या दिनाची स्मृती म्हणून दरवर्षी २४ ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसचं, मित्रांनो, आज जागतिक विकास माहिती दिन देखील आहे. सन १९७२ साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिनाच्या अनुषंगाने जागतिक विकास माहिती दिन स्थापित करण्याचा निर्णय घेतला.  म्हणून दरवर्षी २४ ऑक्टोबर या दिवशी हा दिवस देखील साजरा करण्यात येतो. शिवाय, आज जागतिक पोलिओ दिन देखील आहे. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ लसीचे जनक जोनस साल्क यांच्या स्मरणार्थ या दिनाची स्थापना केली.

जाणून घ्या २४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 24 October Today Historical Events in Marathi

24 October History Information in Marathi
24 October History Information in Marathi

२४ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 October Historical Event

  • इ.स. १६०५ साली मुघल बादशाहा जहांगीर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले.
  • सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर विश्वात शांती प्रस्तापित करण्यासठी अमेरिकेतील सेन्फ्रान्सिस्को या शहरात एक सभा घेण्यात आली त्यात पन्नास देशाच्या हस्ताक्षराणे सयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली.
  • सन १९४६ साली अमेरिकेने पाठवलेल्या रॉकेटच्या साह्याने अवकाशातून पुर्थ्वीचे छायाचित्र काढण्यात आले.
  • सन १९४९ साली न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली.
  • सन १९८४ साली भारतात सर्वप्रथम भूयारी रेल्वे कोलकाता येथे सुरु करण्यात आली.
  • सन २००० साली थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर‘ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२४ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७७५ साली भारतातील शेवटचे मुघल सम्राट व बादशाह अकबर यांचे दुसरे पुत्र बहादूर शाह जफर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६८ साली महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसचं, इंदौर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलांचे अध्यक्ष भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक व प्रमुख समाजवादी नेता, अशोक मेहता यांचा जन्मदिन.
  • सन १९१४ साली भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी तसचं, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन व व्यवहार मंत्री लक्ष्मी सहगल यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली पद्मभूषण, पद्मविभूषण आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार इत्यादी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली भारतीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व भारतीय राजकारणी तसचं, भारतीय राज्य गोवा आणि सिक्कीम राज्यांचे राज्यपाल किदार नाथ साहनी यांचा जन्मदिन.

२४ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९५४ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी राजकारणी रफी अहमद किदवई यांचे निधन.
  • सन १९९१ साली भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि चित्रपट निर्माता इस्मत चुगताई यांचे निधन.
  • सन २०१३ साली आंतरराष्ट्रीय स्थरावरील उत्कृष्ट भारतीय शास्त्रीय गायक, पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, आणि संगीतकार मन्ना डे यांचे निधन.
  •  सन २०१७ साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved