Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

विविध फुलांची मराठी नावे

Flowers Name in Marathi

तुम्हाला अनेक फुलांची इंग्रजी नावे माहित असतील. परंतु काही वेळा आपल्याला त्यांच्या मराठी नावांची गरज पडते. अशावेळी आपल्याला या बद्दल माहिती असणे आवश्यक ठरते.

अनेकवेळा मुलांना शाळेच्या प्रकल्पामध्ये हा विषय बघायला मिळतो. कधी कधी तर परीक्षेमध्ये चित्र दिल्या जाते व त्यावरून फुलांची मराठी नावे लिहावी लागतात. अशावेळी आपल्याला या माहितीचा उपयोग होऊ शकतो. आजचा आपला लेख या विषयाला अनुसरूनच आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच विविध फुलांची मराठी नावे. सोबतच बघणार आहोत त्यांचे उपयोग, व फुलांच्या लागवडी विषयी महत्वाची माहिती. चला तर मग बघुयात यापैकी तुम्हाला किती नावे माहित आहेत.

विविध फुलांची मराठी नावे – Flowers Name in Marathi

फुलांची माहिती आणि नावे – Fulanchi Mahiti Marathi Madhe

इंग्रजी नावमराठी नावे
Pride of Indiaताम्हण
crossandraअबोली
Passion Flower / Sweet Granadillaकृष्ण कमळ
Daturaधोतरा
Common Jasmineजुई
Oleanderकण्हेर
Lotusकमळ
Sunflowerसूर्यफूल
Roseगुलाब
Cypress Vineगणेशवेल
Peacock Flower / Royal Poincianaगुलमोहर / शंकासूर
Lantana Cameraघाणेरी
Night Cestrumरातरानी
Yellow Gingerसोनटक्का
Chrysanthemumsशेवंती
Rangoon Creeperमधुमालती
Merigoldझेंडू
Indian Shot or Canna Indicaकर्दळ
Periwinkleसदाफुली
Frangiapani or Michelia Champaसोनचाफा
Butterfly PeaGokarna
Umbrella Tree or Screw Pineकेवडा
Crepe Jasmineतगर
Spanish Jasmineचमेली
Purslaneघोळ / घोल
Mimusops Elengi / Bullet Woodबकुळ
Tuberoseनिशिगंध
Coral Jasmineपारिजातक
Aak Flowerमंदार रुई
Jasmine Sambacमोगरा
Magnoliaचंपा
Hibiscusजास्वंद
jasmineकुंदा
Morning Gloryनिळवेल
Annona Hexapetalaचाफा
Calotropis Gingantea / Giant Milkweedरूई
Pansyपानसडी
Daffodilनर्गिस

वरीलपैकी बरीच फुले तुम्ही पाहिलेली असतील. परंतु फक्त इतकीच नव्हे तर आणखीही काही फुले आहेत जी आपल्या देशात पाहायला मिळत नाहीत. टूलिप, डेझी, ऑर्चीड, कार्नेशन, बोगनविला, देहलिया हि काही फुले आहेत. ही फुले भारतातील विशिष्ट ठिकाणीच उगवतात व त्यांना त्यांच्या इंग्रजी नावानीच ओळखल्या जाते.

फुलांचे इतर उपयोग : Other Uses Of Flowers

फुले हि फक्त सजावटीसाठीच न वापरता त्यांचा औषधी तयार करण्यासाठी तसेच खायला सुद्धा उपयोग केला जातो. सुगंधित फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी करतात.याशिवाय व्यावसायिक दृष्टीकोनातून सुद्धा त्यांचा वापर करण्यात येतो. अगरबत्ती, साबण, अत्तर इ. करिता फुलांचा वापर केला जातो.

तर मित्रांनो हि होती काही फुलांची मराठी नावे. आशा आहे कि तुम्हाला हा लेख आवडला असेल. अशाच नवनवीन प्रकारच्या माहिती साठी आमच्यासोबत जुळून राहा.

फुलांची शेती : Cultivation of Flowers

आजकाल आपण बघतो कि बाजारात फुलांची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी हे आपल्या शेतात फुलांची लागवड करून भक्कम पैसा कमावत आहेत. पारंपारिक शेती पेक्षा वेगळा पर्याय म्हणून याकडे पहिल्या जात आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेण्याचा सोपा उपाय म्हणजे फुलाची लागवड. यासोबतच वर्षातून वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळी फुले आपण घेऊ शकतो.

वारंवार विचारल्या जाणारी प्रश्ने :

१. भारताचे राष्ट्रीय पुष्प कोणते ?

उत्तर : कमळ.

२. फुलांचा राजा किंवा राणी म्हणून कोणते फुल ओळखल्या जाते ?

उत्तर : गुलाब.

३. भारतातील सर्वात मोठे फुल कोणते ?

उत्तर : टायटन अरम हे भारतातील सर्वात मोठे व सर्वात उंच फुल आहे.

४. असे कोणते फुल आहे कि जे आपण खाऊ शकतो ?

उत्तर : गुलाबाच्या फुलापासून बनविलेले गुलकंद आपण खाऊ शकतो.

५. जगातील सर्वात मोठे फुल कोणते ?

उत्तर : इंडोनेशिया देशात सापडणारे रॅफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठे फुल आहे. ते जवळपास ३ फुट लांब व १५ किलो वजनाचे असू शकते.

६. कमळाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

उत्तर : नेलुम्बो नुचीफेरा.

७. सर्वात सुगंधी फुल कोणते ?

उत्तर : लव्हेंडर.

८. जगातील सर्वात महाग फुल कोणते ?

उत्तर : जुलीयेट गुलाब.

९. भारतातील सर्वात दुर्मिळ फुल कोणते ?

उत्तर : रेबे हे भारतातील सर्वात दुर्मिळ फुल आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved