रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल या शब्दांचे काय अर्थ होतात, माहिती करून घ्या या लेखातून

Difference Between Terminus Central and Junction

भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर येते, संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते, अमेरिका,चीन, रशिया नंतर जगात चौथ्या क्रमांकावर भारताच्या रेल्वेला पाहिलं जातं. संपूर्ण भारतात उत्तरे पासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत सर्वदूर रेल्वेचे वेगवेगळे स्टेशन आपल्याला पाहायला मिळतात, याच स्टेशन पैकी बरेचशे नावे आपल्याला माहिती असतील पण त्या स्टेशन सोबत काही नावे जुळलेले राहतात जसे जंक्शन, टर्मिनस, आणि सेंट्रल या प्रकारे तर या शब्दांचे अर्थ रेल्वेच्या भाषेत काय होतात? हा प्रश्न आपल्याला बरेचदा पडला असेल, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की रेल्वेच्या स्टेशन वर असणाऱ्या ह्या शब्दांचा अर्थ काय होतो. आशा करतो आपल्याला हा लिहिलेला लेख आवडणार तर चला पाहूया..

टर्मिनस, जंक्शन आणि सेंट्रल यामध्ये काय फरक आहे – Difference Between Terminus, Junction and Central in Marathi 

Difference Between Terminus Central and Junction
Difference Between Terminus Central and Junction

आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की स्टेशन च्या नावाच्या नंतर जंक्शन, टर्मिनल किंवा टर्मिनस, सेंट्रल असे लिहिलेले असते तर खाली काही आपण एक एक करून यांच्या मधील फरक काय आहे ते समजून घेऊया. संपूर्ण भारतात मुख्यता चार प्रकारचे रेल्वे स्टेशन आहेत.

१) सेंट्रल – Central

आपणही सेंट्रल नावाच्या स्टेशन चा कुठेतरी उल्लेख ऐकलेला असेलच, हे स्टेशन त्या शहरातील सर्वात जुने स्टेशन असते, सोबतच त्या शहरातील सर्वात महत्वाचे स्टेशन या स्टेशन ला मानल्या जात असते. या स्टेशन वरून बऱ्याच रेल्वे गाड्यांची आवाजावी नेहमी सुरूच असते.

तेही बाकी स्टेशन पेक्षा जास्त. आणि जरुरी नाही कि ज्या शहरात एकापेक्षा जास्त स्टेशन आहे तिथे सेंट्रल स्टेशन असलेच पाहिजे. भारतातील दिल्ली शहरात बरेच स्टेशन आहेत पण दिल्ली मध्ये कोणतेही सेंट्रल स्टेशन नाही.

आपल्या देशात एकूण ५ सेंट्रल स्टेशन आहेत.

  •  मुंबई सेंट्रल – Mumbai Central
  •  चेन्नई सेंट्रल – Chennai Central
  •  त्रिवेंदम सेंट्रल – Trivandrum Central
  •  मैंगलोर सेंट्रल – Mangalore Central
  •  कानपूर सेंट्रल – Kanpur Central

२) टर्मिनस/टर्मिनल – Terminus / Terminal

आपण मुंबईत राहत असाल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विषयी माहितीच असेलच. टर्मिनल किंवा टर्मिनस म्हणजे शेवटचे स्टेशन या स्टेशन च्या नंतर कोणतेही स्टेशन किंवा कोणताही रेल्वे स्टॉप नसतो. म्हणजेच रेल्वे ट्रॅक चा द एंड. या ठिकाणावरून रेल्वे फक्त एकाच दिशेला जाऊ शकते, ज्या ठिकाणावरून आली त्या ठिकाणावर परत.

आपल्या संपूर्ण देशात एकूण २७ टर्मिनस स्टेशन आहेत पण सर्वात जास्त गाड्यांची आवाजावी आणि रेलचेल असणारे दोन टर्मिनल स्टेशन आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि लोकमान्य टिळक टर्मिनस. आपल्याला टर्मिनस म्हणजे काय चांगल्या प्रकारे कळले असेल, त्याचा सरळ आणि साधा अर्थ असा की यापूढे कोणताही रस्ता नाही.

खाली काही देशातील मुख्य टर्मिनस ची नावे.

  •  बांद्रा टर्मिनस – Bandra Terminus
  •  हावड़ा टर्मिनस – Howrah Terminus
  •  भावनगर टर्मिनल – Bhavnagar Terminal
  •  कोचीन हार्बर टर्मिनस – Cochin Harbor Terminus

३) जंक्शन – Junction

आपण रेल्वेचा प्रवास करताना एखाद्या स्टेशन ला उतरून आपल्याला त्या स्टेशन वरून दुसरी रेल्वे पकडायचे काम पडले आहे का? उदा. आपण मुंबई वरून कधी पुण्याला गेले आहे का? आपण जर मुंबई वरून पुण्याचा प्रवास रेल्वेने केला असेल तर आपल्याला मधात कल्याण नावाचे जंक्शन लागले असेल, मग हे जंक्शन काय असते. याचा अर्थ काय होतो. तर रेल्वेच्या बाबतीतच नाही तर विज्ञानात सुध्दा एखाद्या ठिकाणावरून एकापेक्षा जास्त ठिकाणी जाण्यास रस्ता असला तर त्या ठिकाणाला जंक्शन असे म्हणतात. सोप्या भाषेत जर समजायचे झाले तर एखाद्या स्टेशन वर तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून रेल्वे येते आणि तीन वेगळ्या ठिकाणी रेल्वे जाऊ शकते.

ज्या स्टेशन वर तीन पेक्षा जास्त ट्रॅक एकमेकांना जुळतात त्या स्टेशन ला जंक्शन म्हटल्या जात. भारतामध्ये ३०० पेक्षा जास्त जंक्शन आहेत. आणि सर्वात मोठे जंक्शन हे मथुरा ला मानल्या जाते. कारण येथे सगळ्यात जास्त रुट्स आहेत. येथून सात वेगवेगळे रुट्स निघतात. सेलम जंक्शन वरून सहा रुट्स तर विजयवाडा वरून पाच रुट्स निघतात. आणि हे सर्वात मोठ्या जंक्शन मधून एक येतात.

) स्टेशन – Station

आपल्याला स्टेशन विषयी तर माहिती असेलच, वरील एकाही कॅटेगरी मध्ये न बसलेले त्याला स्टेशन म्हटल्या जात. तसेच जेथे रेल्वेचा थांबा असतो त्या जागेला स्टेशन म्हटल्या जात. भारतात ८००० पेक्षा जास्त स्टेशन आहेत. तर वरील लेखात आपण पाहिले की स्टेशन,टर्मिनस, जंक्शन, या शब्दांचा अर्थ काय होतो.

तर आशा करतो या लेखातून आपल्याला थोडीशी तरी माहिती मिळाली असेल, आणि आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here