Ganga River Information in Marathi

गंगा नदीबद्दल संपूर्ण माहिती – Ganga River Information in Marathi
भारत देशातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही नद्यांपैकी एक नदी म्हणजे गंगा नदी. ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिचा उगम उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री येथे आहे व ती पूर्व वाहिनी नदी आहे.गंगा नदी भारतात उगम पावून समोर बांग्लादेश मध्ये सुद्धा वाहत जाते जिथे तिला पद्मा नावाने संबोधल्या जाते.| नाव | गंगा |
| देश | भारत |
| उगमस्थान | गंगोत्री |
| राज्य | उत्तराखंड |
| लांबी | २५१० किमी |
| प्रवाह | पूर्व वाहिनी |
| किनाऱ्या वरील राज्ये | उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, बांगलादेश |
| उपनद्या | यमुना, दामोदर, गंडकी, गोमती, महानंदा, कोसी, ब्रम्हपुत्रा, पुनपुन |
गंगा नदीचे ऐतिहासिक महत्व – Importance of Ganga River
गंगा हि हिंदू धर्मातील एक पवित्र नदी मानली जाते. गंगा नदीला केवळ नदीच नव्हे तर देवी म्हणून पूजले जाते. असे म्हटल्या जाते कि भगीरथ राजाने अथक प्रयत्न करून गंगेला स्वर्गातून पृथ्वी वर आणले.रामायण आणि महाभारतात देखील गंगा नदी बद्दल लिहल्या गेले आहे. वेद आणि पुराणांमध्ये सुद्धा गंगेचा उल्लेख पाहायला मिळतो. आजही कितीतरी ऋषी-मुनींची आश्रम या नदी किनारी पाहायला मिळतात.पण सरळ पृथ्वी वर न येता ती महादेवाच्या जटांंमध्ये विराजमान झाली व तिथून पृथ्वी वर वाहत आहे. गंगेत अंघोळ केल्याने सर्व पाप नाहीसे होतात अशी सुद्धा लोकांची मान्यता आहे.भौगोलिक महत्व – Ganga River History
गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमुळे ११ राज्यामध्ये नदीचे खोरे निर्माण झाले आहे. या खोऱ्यांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. तसेच नदी प्रवाहात स्थानिक लोक मासेमारी करतात, सिंचनासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो.स्थानिक लोकांच्या रोजच्या गरजा सुद्धा नदिमुळे भागविल्या जातात. दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार लाभला आहे.गंगेचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग :नदीवर ५ मोठे जल विद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. जसे कि
- यमुना जल विद्युत प्रकल्प (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड)
- चंबळ जल विद्युत प्रकल्प (मध्य प्रदेश आणि राजस्थान)
- राजघाट जल विद्युत प्रकल्प
- मातातीला जल विद्युत प्रकल्प
- रीहंद जल विद्युत प्रकल्प
गंगा नदीच्या उपनद्या – Tributaries of Ganges
गंगेला उजव्या आणि डाव्या अशा दोन प्रकारच्या उपनद्या आहेत.१. उजव्या उपनद्या :- यमुना
- तमसा (किवा टोन)
- सोन
- पुनपून
- चंदन
- दामोदर
- कर्मनाशा इ.
- गंडकी
- गोमती
- कोसी
- ब्रम्हपुत्रा
- रामगंगा
- घाघरा
- महानंदा इ.
गंगा नदीचे वैशिष्ट्य : About Ganga River
भारताची ओळख असलेला कुंभ मेळा हा गंगेच्या काठावर भरतो. त्यामुळे नदीला एक वेगळेच महत्व प्राप्त होते. हा मेळा बारा वर्षातून एकदा भरतो. प्रयागराज (अलाहाबाद) आणि हरिद्वार या ठिकाणी हा ‘महाकुंभ’ मेळा भरत असतो. या वेळी गंगा तीरावर भव्य आयोजन केले जाते.यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर साधू संत जमा होतात. पवित्र गंगा स्नान करतात ज्याला शाही स्नान म्हणून संबोधल्या जाते.विशेष म्हणजे अभ्यासातून असे दिसून आले आहे कि इतर नद्यांच्या तुलनेत गंगेतील कचरा हा लवकर विघटीत होतो. इतिहास काळातील बहुतेक राजधान्या गंगा किनारीच वसलेल्या होत्या.


