Ganoji shirke Information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास गेल्याचे दिसले. केवळ स्वतःचा विचार न करता रयतेचा आणि तमाम हिंदू धर्मियांचा विचार करून महाराजांनी त्याकाळी त्याग बलिदान आणि पराक्रमाचे उदाहरण समाजापुढे ठेवले ते अतुलनीय असेच आहे.
शिवाजी महाराजांसमवेत त्यांचे तमाम मावळे आणि सहकारी देखील तेवढेच पराक्रमी आणि शूर होते. महाराजांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देऊन त्यांनी आपले इमान सिद्ध केले.या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये गणोजी शिर्के हे महाराजांचे सोबती सुद्धा आज त्यांच्या ईमान आणि शौर्यामुळे आठवणीत राहिले आहेत. या लेखात गणोजी शिर्के यांच्याविषयी काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.
स्वराज्य निष्ठ गणोजी शिर्के – Ganoji shirke Information in Marathi

गणोजी शिर्के यांच्या विषयी माहिती – Ganoji shirke yanchya vishyi Mahiti
गणोजी शिर्के यांचे वडील पिलाजी राजे शिर्के याचं नाव देखील इतिहासाच्या पानांमध्ये मोठ्या अदबीनं घेतलं जातं. गणोजी शिर्के हे मराठा साम्राज्यातील पराक्रमी आणि धडाडीचे राजे म्हणून प्रसिद्ध आहेत. शिरकाण, महाड-रायगड आणि पुढे दक्षिणेला सावंतवाडी पर्यंत गणोजी शिर्के याचं राज्य असल्याचे सांगितले जाते. शिवरायांनी त्यांना आपले जावई करून घेतले आणि पुढे त्यांच्या बहिणीला म्हणजे येसूबाईंना आपली सून आणि संभाजीराजांची पत्नी म्हणून घरात आणले. येसूबाईंमधील नेतृत्व गुण पाहून त्यांना स्वराज्यात महत्वाचं पद बहाल केलं.
संभाजी महाराजांना औरंगजेबाने आपल्या ताब्यात घेऊन फार हाल-हाल करून त्यांची हत्या केली हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले याला गणोजी शिर्के जवाबदार असल्याचे इतिहासात काही ठिकाणी नमूद असल्याचे आपल्याला दिसते परंतु याविषयी बरेच वाद आणि निरनिराळी मत-मतांतर आहेत आणि शिवाय या विषयाला अनुसरून इतिहास-तज्ञांमध्ये मतभेद असल्याचे देखील आपल्याला दिसते.
1697 साली डिसेंबर महिन्यात ज्या सुमारास राजाराम महाराज औरंगजेबाने टाकलेल्या जिंजी च्या वेढ्यात अडकले त्यावेळी गणोजी शिर्के यांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने राजाराम महाराजांना त्या वेढ्यातून सोडवले होते आणि दुसऱ्या दिवशी काही अंतरावर असलेल्या धनाजीच्या सैन्यामध्ये त्यांना सुखरूप पोहोचवले.
हे करत असतांना औरंगजेबाशी आपण कायमचे वैरत्व पत्करतो आहोत याचा गणोजी शिर्के यांनी जरा देखील विचार केला नाही कारण महाराजांच्या कुटुंबाशी आणि स्वराज्याशी इमान राखणे त्यांना जास्त महत्वाचे वाटले.ई.स. 540 पासून शिर्के घराण्याविषयी माहिती उपलब्ध आहे आणि त्यामुळे हे घराणे फार पुरातन असल्याचे लक्षात येते. राजेशिर्के घराण्याचा उल्लेख अगदी रामराज्या पासून आढळतो.
प्रभू राम यांच्या नंतर काही काळ लोटला आणि पुढे राजेशिर्के घराण्याचे प्रथम साम्राज्य हस्तिनापुर येथे स्थापित झाल्याचे पुरावे आहेत. दिल्लीवर देखील शिर्के घराण्याने राज्य केले होते. त्या सुमारास कुटर बादशाह अशी त्यांना ओळख होती.
1100-1400 या काळात राजे शिर्के घराण्याकडे रायगड हा भाग देखील होता. शिरकाई देवीचे येथे असलेले मंदिर आज देखील त्याची साक्ष देत आहे. गणोजी शिर्के हे शिवाजी महाराजांचे जावई आणि संभाजी महाराजांच्या पत्नीचे भाऊ असल्याने महाराजांच्या विश्वासातील होते. अनेक मोहिमांवर त्यांनी महाराजांना प्रामाणिक साथसोबत केली.
राजाराम महाराजांना जिंजी च्या वेढ्यातून सही-सलामत सोडविल्याने राजाराम महाराजांनी मोठ्या आनंदाने गणोजी शिर्के यांना दाभोळ प्रांत बक्षीस म्हणून दिला परंतु जमीन हस्तांतरण घाईघाईत झाल्याने पुढे यात समस्या निर्माण झाल्याचे कळते ज्यावेळी दाभोळ शिर्के यांना दिले गेले त्यावेळी ते खंडो बल्लाळ यांच्या ताब्यात होते आणि ते त्या प्रांताचे चिटणीस होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळत राहिले.
गणोजी शिर्के आणि औरंगजेब यांच्यातील जवळीक त्याकाळी सगळ्यांना अवगत होती परंतु तो गनिमी काव्याचा भाग होता असे मानले गेले कारण स्वराज्य टिकवायचे तर त्या सुमारास अशी मुत्सद्देगिरी देखील आवश्यक असायची. परंतु ज्यावेळी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अटक केली आणि क्रूरपणे त्यांचा वध केला त्यावेळी गणोजी शिर्के यांचा संभाजी महाराजांना पकडून देण्यात सहभाग नाही हे त्यावेळी कुणाला देखील सिद्ध करता आले नाही.
परंतु कुणी भाऊ आपल्या बहिणीचे कुंकू पुसेल का ? शिवाय गणोजी शिर्के यांनी असे केले असते तर त्यानंतर मराठ्यांनी त्यांना जिवंत ठेवले असते का ? आणि जर त्यांच्यात बेईमानी असती तर जिंजी ला झुल्फिखानाचा वेढा पडला असतांना गणोजी शिर्के यांनी राजाराम महाराजांना इतक्या पराक्रमाने सहीसलामत वाचवले असते का ? हे प्रश्न देखील पडल्या शिवाय रहात नाहीत.
गणोजी शिर्के यांचा मृत्यु – Ganoji Shirke Death
गणोजी शिर्के यांचा अंत कसा झाला याविषयी इतिहासात निश्चित अशी नोंद आढळत नाही परंतु आपल्या अखेर पर्यंत ते मोगलांच्या चाकरीत राहिले.
Information about Ganoji Shirke is not properly submitted here. Ganoji was the only responsible for the arrest of Chatrapati Sambhaji Maharaj and Ganoji was brother of Sambhaji Maharaj’s wife.
Ganoji was the biggest traitor and Gaddar
इतिहास रंजक जाती असेल असेल तरी त्यात किती अडकून पडायचे हे समजतील प्रत्येकाला कळले पाहिजे. स्वराज्य द्रोह गणोजी शिर्के यांनी केला होता का इतर कुणी यावर जर ठोस पूर्व नसेल तर विनाकारण समाजात कलह निर्माण होईल असे लिखाण सोशल मीडिया मधून कशाला टाकले जात आहे? आणि कोणी द्रोह केला या पेक्षा पुढे महाराजांचे काय हाल झाले आणि ते कोणी केले हे नाहीत असताना त्या बद्दल लिहिले जात नाही, दाखवले जात नाही.
आज ज्या गोष्टी बद्दल शंका आहे त्या काळात त्या लोकांना त्या गोष्टी माहीत नसतील का? मग त्या काळी खरच ज्या लोकांनी फितुरी केली त्या लोकांना संताजी धनाजी यांनी सोडले असते का? सगळ्यांना सोडून ते फक्त औरंगजेब चां पिच्छा सोडत नव्हते म्हणजे या घटनेला सर्वस्वी जवाबदारी हा औरंगजेब च होता .