स्वातंत्र्य दिवसाविषयी माहिती आणि घोषवाक्ये

(Swatantrata Diwas) 15 August Information in Marathi

इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला सन 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. जवळजवळ १५० वर्षांपेक्षा जास्त काळा पर्यंत इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक क्रांतीकारणी मोठ्या शोर्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता इंग्रजांसोबत लढताना बलिदान दिलं आहे. खरच देशाला त्यांच्या बद्दल खूप अभिमान आहे. संपूर्ण भारतभर १५ ऑगस्ट या दिवसाला राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी देशातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच सर्व सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येते.

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रपतीच्या हस्ते झेंडावंदन होऊन देशाच्या तिनी दलाची मानवंदना स्वीकारली जाते. तसेच पंतप्रधान सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. राजपथावर वेगवेगळ्या झाकिंचे प्रदर्शन घडविले जाते. आपल्या देशाचे शक्ती प्रदर्शन करण्यात येते. विविधतेने नटलेला आपला भारत देश खूप महान आहे. संपूर्ण विश्वात भारत हा एकचं असा देश आहे जिथे विविधतेतून एकतेचे दर्शन होते. आपल्या देशात सर्वच जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्मांचे सणोत्सव   मोठ्या जोमाने साजरे केले जातात.

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात अनेक घडामोडी घडल्या आहेत. इंग्रजांच्या आधी भारतात पोर्तुगीज आले होते. तसेच त्यानंतर जर्मनी यासरखे देश आले येथे आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी आपली इस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. व्यापार करण्याच्या उदेशाने भारतात आल्यानंतर इंग्रजांनी काही प्रांतावर आपले अधिकार गाजवणे सुरु केलं. अस करत करत त्यांनी संपूर्ण भारवर आपला ताबा मिळविला.

स्वातंत्र्य दिवसाविषयी इतिहास  – Independence Day Information in Marathi

Independence Day Information in Marathi
Independence Day Information in Marathi

स्वातंत्र्य दिन विशेष माहिती – Swatantra Dinachi Mahiti

इंग्रजांकडून होत असेली लुटपाट पाहून तिला आळा घालण्यासाठी देशातील काही क्रांतिकारक समोर आले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले. सन १८५७ साली सर्वप्रथम देशातील क्रांतिकारक एकत्र आली आली त्यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याच्या विचाराने त्यांच्यावर हल्ला चढविला. परंतु त्यांनी केलेला बंड पूर्व नियोजित नसल्याने तो पूर्णपणे यशस्वी झाला. त्यात अनेक क्रांतीकारकांना पकडून फाशी देण्यात आली.

इंग्रजांनी आपल्या देशांत अनेक सुधारणा केल्या, सन १८५३ साली आपल्या देशात सर्व प्रथम रेल्वे सुरु केली. रेल्वे सुरु करण्यामागील त्यांचा उदेश हा व्यापाराला चालना मिळवणे होता. आपल्या देशातील लोकांमध्ये फुट निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं अस म्हणने चुकीच ठरणार नाही. कारण, त्यांनी सन १९०५ साली आपल्या देशातील मुस्लीम प्रांत बंगालची फाळणी केली. देशाच्या स्वातंत्र्या करीता सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन चळवळ करत असत त्यामुळे सर्वाना एकत्र सांभाळणे इंग्रज सरकारला शक्य नव्हते. परिणामी त्यांनी हिंदू मुस्लीम यांच्यात दरी निर्माण केली.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. मंगल पांडे पासून लोकमान्य टिळक, लाल लजपतराय, बिपिनचंद्र पाल, भगत  सिंग, चंद्रशेखर आझाद, यासारख्या क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य करिता आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या क्रांतीकारकांशिवाय, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्पिता महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याकरिता खूप चळवळी केल्या.

मुस्लीम लीगच्या मागणीप्रमाणे सन १४ ऑगस्ट १९४७ साली भारतातून पाकिस्तानची विभागणी करण्यात आली. तसेच, आपल्या देशाला सुद्धा सन १५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्तता मिळाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता क्रांतिकारकांनी दिलेलं बलिदान खूप महान त्याचं हे बलिदान भारत देश कधीच विसरणार नाही.

भारतीय ध्वजाची विशेषता – Indian Flag Specialty 

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात चार प्रकारचे रंग असून त्या प्रत्येक रंगाची आपली एक विशेषता आहे. राष्ट्रध्वजा संबंधी इतिहास आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधीच म्हणजे २२ जुलै 1947 साली राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली. तिरंग्याची रचना बंगालमधील मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या व्येंकय्या पिंगली यांनी केली आहे.

राष्ट्रध्वजात तीन आडवे पट्टे असून त्यांचा रंग केशरी, पांढरा व हिरवा स्वरुपात आहे. त्यांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे एक अशोक चक्र आहे. त्यावर २४ आर्य आहेत. ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण २:३ या स्वरुपात आहे. ध्वज हा केवळ खादी किंवा रेशीम कापडा पासून बनविला जावा असा सरकारी नियम आहे. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वजाचे सविस्तर वर्णन केलं आहे.

तीरांग्यावरील वरच्या भागात केशरी रंग आहे. केशरी रंग हा धैयाचे प्रतिक मानला जातो.

खालील भागात पांढरा रंग असून तो रंग शांततेच प्रतिक मानला जातो.या रंगातून शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.

ध्वजाच्या खालील भागात गर्द हिरवा रंग आहे. हा रंग निसर्गाशी व भूमीशी असलेलं आपलं नात दर्शवितो.

या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे २४ आर्य असलेलं आर्य चक्र आहे. हे चक्र गतीचे प्रतिक असून ते आपल्या देशाला गतीने पुढे जाण्याचा संदेश देते.

स्वातंत्र्य दिवसाविषयी घोष वाक्य – Independence Day Slogans in Marathi

 1. स्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.
 2. तिरंग्याचा रंगच न्यारा, त्यातच तर आहे देश सारा.
 3. जय जवान जय किसान.
 4.  बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
 5.  देऊन आपल्या प्राणाचे बलिदान, सैनिक राखती आपल्या देशाचा अभिमान.
 6. भारत माता की जय.
 7. आराम हराम आहे.
 8.  देश प्रेम फक्त एका दिवसाकरिता मर्यादित नसावं, ते कायम आपल्या मनात असाव.
 9.  ठेऊन आपल्या एकीचे भान राखूया आपल्या देशाची शान.
 10.  ना कोणी मोठा ना कोणी लहान,  आपला देश तर आहे विश्वात महान.
 11. आकाशी असती एक असा तारा,  जसा पृथ्वीवर असे देश आमचा प्यारा.
 12.  उंचच्या उंच तिरंगा लहरूया, देशाची शान वाढवूया.
 13. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरु जिंकू किंवा मरू.
 14.  देवून आपल्या प्राणाचे बलिदान राखती आपल्या देशाची शान असा आमचा वीर जवान.
 15. आपले स्वातंत्र्य आपले संविधान, भारतीय असल्याचा असावा अभिमान.
 16.  येथे नांदती सुख, शांती आणि समृद्धी, यातूनच मिळते देशाला गती.
 17.  सैनिक असती देशाची शान, ते तर राखती देशाची मान.
 18.  करा किंवा मरा.
 19. करूया वंदन तिरंग्याला जो देशाची शान आहे,  उंचच्या उंच लहरू याला जोपर्यंत देहात प्राण आहे.
 20. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे,
 21. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here