कराटे खेळाची संपूर्ण माहिती आणि नियम

Karate Information in Marathi

जगात अनेक खेळ खेळले जातात. आपल्या जीवनातील खेळाचे महत्व प्रत्येकाला माहित आहे. यांपैकी काही खेळ मैदानी तर काही घरात बसून खेळले जातात. कबड्डी, खो-खो, बेसबॉल हे खेळ आपणा सर्वांना माहित आहेत. परंतु काही खेळ असे आहेत जे फक्त खेळ नसून आपल्याला लढायला शिकवतात. किंबहुना आपला बचाव करतात.

असाच एक खेळ ज्याचे प्रशिक्षण स्वयं रक्षणाकरिता घेतल्या जाते आणि ज्याच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, तो म्हणजे कराटे. चला तर मग या विशिष्ट खेळाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कराटे खेळाची संपूर्ण माहिती आणि नियम – Karate Information in Marathi

Karate Information in Marathi
Karate Information in Marathi

कराटे बद्दल थोडक्यात – About Karate Game

कराटे हा मूळ जपानी शब्द असून त्याचा विग्रह, ‘करा’ म्हणजे ‘रिकाम्या’ आणि ‘टे’ म्हणजे ‘हातानी’ असा होतो. या खेळात खेळाडू रिकाम्या हातानी खेळतात. खेळतांना प्रशिक्षणा दरम्यान ज्या गोष्टी आणि कौशल्य त्यांनी ग्रहण केले, त्यांचे प्रदर्शन ते करतात.

फक्त खेळ म्हणून न पाहता, कराटेचा उपयोग स्वयं रक्षणासाठी देखील केला जातो. हल्लीच्या काळात महिलांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कराटेचा इतिहास – Karate History in Marathi

कराटेचा उगम ओकिनावा येथे १७ व्या शतकात झाला असे मानले जाते. परंतु जपान मध्ये हा खेळ १९२० मध्ये उदयास आला. इंटरनेट वर उपलब्ध माहिती नुसार फुनकोशी गीचीन यांनी १९२२ साली जपानमध्ये कराटेला सुरुवात केली. त्यांना आधुनिक कराटेचे पितामह मानले जाते.

कराटेचे नियम – Karate Rules

या खेळाच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये विविध वयोगातील आणि वजन गटातील स्पर्धक सामील होतात. त्यानुसार त्यांच्या लढती घेतल्या जातात. खेळादरम्यान जो खेळाडू सर्वाधिक गुणसंख्या घेणार तो विजयी ठरतो. गुणांचे मूल्यमापन खेळाडूंच्या गती, कौशल्य, तत्परता आणि डावांवर आधारित असते.

कराटेसाठी लागणारे साहित्य – Karate Equipment

या खेळासाठी विशेष असे काही लागत नाही. खेळाडूंच्या रक्षणासाठी केवळ काही विशिष्ट गार्ड्स आणि कराटेचा पोशाख लागतो. पोशाख म्हणजे पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि शर्ट आणि त्यावर एक पत्ता.

कराटे खेळाडूंची वर्गवारी – Karate Rankings

Karate Rankings
Karate Rankings

कराटेमधील खेळाडूंची वर्गवारी पट्ट्याच्या रंगावरून केली जाते. या रंगांचे काही अर्थ आहेत ते खालीलप्रमाणे :

 • पांढरा : नुकतेच प्रशिक्षणाला सुरुवात करणारे
 • पिवळा : थोडेफार प्रशिक्षण घेतलेला
 • केसरी : काही प्रमाणात प्रशिक्षित
 • हिरवा : नवीन तंत्र आणि कौशल्य शिकलेला
 • निळा : कराटेबद्दल विशिष्ट्य कौशल्य शिकलेला
 • लाल : प्राविण्य प्राप्त खेळाडू
 • काळा : विशेष प्राविण्यप्राप्त खेळाडू

भारतीय कराटे खेळाडू – Indian Karate Players

 • सेन्सेई यशपाल सिंह कालसी
 • अनामिका सिंह कालसी
 • अनिकेत गुप्ता
 • अमित दंद

मित्रांनो आशा करतो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल.

कराटे खेळाबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Karate Quiz

१. कराटे खेळाचा उगम कुठे झाला?

उत्तर: जपान मध्ये.

२. कराटेचा अर्थ काय आहे?

उत्तर: कराटे हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ रिकाम्या हाताने असा होतो.

३. कराटेचे पितामह म्हुणुन कुणाला ओळखले जाते?

उत्तर: फुनकोशी गीचीन.

४. कराटे हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का?

उत्तर: नाही.

५. करातेची जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा कुठली आहे?

उत्तर: दि कराटे वर्ल्ड चॅम्पिअनशिप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here