कुस्ती खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Kushti Information in Marathi

महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले कि कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती.

होय, कुस्ती खेळ फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खेळल्या जातो. कुस्तीला हिंदी मध्ये ‘दंगल’ आणि इंग्रजी मध्ये ‘रेसलिंग (wrestling)‘ म्हटल्या जाते.

कुस्ती खेळाबद्दल संपूर्ण माहिती – Kushti Information in Marathi

Kushti Information in Marathi
Kushti Information in Marathi

कुस्ती खेळाचा इतिहास – Kushti History in Marathi

कुस्ती हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ आहे. राजे महाराज्यांपासून ते मुघल साम्राज्य आणि आज पर्यंत कुस्ती हा खेळ खेळला जातो. पूर्वीकाळी याला ‘मल्ल युद्ध’ म्हणून ओळखल्या जायचे. या खेळासाठी दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि तेज बुद्धिमत्तेची गरज असते.

महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ हि कुस्तीची राज्य स्तरावरील स्पर्धा भरवण्यात येते. इतकेच नव्हे तर गावा गावात जत्रा आणि काही विशेष प्रसंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते.

कुस्ती खेळाचे मैदान – Wrestling Ground Measurement

खेळाचे मैदान चौरस किंवा वर्तुळाकार असू शकते. मैदानात लाल माती किंवा रबरी चटई टाकून कुस्ती खेळली जाते.

हल्ली या खेळासाठी वर्तुळाकार रबरी चटईच्या मैदानाचा उपयोग केल्या जातो. यामध्ये एक मध्य वर्तुळ असते. या वर्तुळाचा व्यास १ मी. असतो. त्याबाहेर आणखी एक वर्तुळ असते ज्याचा व्यास ७ मी असतो. त्यानंतर रेड झोन असतो. रेड झोन चा व्यास १ मी असतो. या पासून १.५ मी अंतरावर १२ मी लांबी व रुंदी असलेला चौरस असतो.

कुस्तीचे प्रशिक्षण : Kushti Training

ज्या ठिकाणी कुस्ती खेळाचे प्रशिक्षण दिले जाते त्या जागेला आखाडा म्हटल्या जाते. कुस्ती शिकविणाऱ्या प्रशिक्षकांना गुरु किंवा उस्ताद असे म्हणतात. आखाड्यातील लाल मातीला तेल, दुध, तूप आणि ताक टाकून मऊ केल्या जाते. या मातीवर रोज हलके पाणी शिंपडल्या जाते. यामुळे माती निर्जंतुक तर होतेच सोबतच खेळाडूंना दुखापत देखील होत नाही.

खेळासाठी उपयुक्त असलेले व्यायाम येथे शिकविल्या जातो. तसेच विविध डाव-पेच आणि पकड सुद्धा शिकविल्या जाते. मल्लांना विशिष्ट खुराक बद्दल सांगितल्या जाते. तसेच कुस्तीताला एक पूरक व्यायाम प्रकार मल्लखांब बद्दल देखील प्रशिक्षण दिल्या जाते.

कुस्तीचे नियम : Kushti Rules

या खेळाचे नियम साधे आणि सोपे आहेत. हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो. प्रत्येक खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर लोळवण्याचा प्रयत्न करत असतो. विजयी होण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचा खांदा आणि कंबर जमिनीवर टेकवावी लागते. कुस्तीचा सामना सारख्या वजन गटातील खेळाडूंमध्ये खेळला जातो.

मुक्त कुस्ती स्पर्धा ही १२ मिनिटांची असते. या वेळेत जो खेळाडू जास्तीत जास्त गुण मिळवतो, त्याला विजयी घोषित केल्या जाते. विजयी खेळाडूच्या खेळात दोष आढळल्यास कमी गुण असलेला खेळाडू विजयी ठरतो.

खेळा दरम्यान नियमांचे पालन होत आहे कि नाही हे बघण्यासाठी पंच उपस्थित असतात. खेळाडूचा डाव आणि पकड यावर पंच गुण देतात.

YouTube video

कुस्तीतील डाव : Kushti Techniques

या खेळात अनेक डाव-पेच असतात जसे कि, धोबीपछाड, उभा कलाजंग, आतील टांग, निकाल इ. खेळाडू कुठला डाव वापरून समोरील खेळाडूला चित करतो हे पाहण्यासारखे असते. यातील काही डावांना अधिक गुण दिले जातात.

भारतातील कुस्ती खेळाडू : Indian Kushti Players

कुस्ती खेळाडू म्हटलं कि आपल्याला खाशाबा जाधव यांचे नाव आठवतं. होय खाशाबा म्हणजे १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविणारे पहिले भारतीय कुस्ती मल्ल दारा सिंह हे देखील कुस्तीतील एक नामांकित पैलवान.

भारतातील काही कुस्ती मल्ल :

 1. बजरंग पुनिया
 2. सुशील कुमार
 3. योगेश्वर दत्त
 4. सुमित मलिक
 5. राहुल आवारे
 6. रवी कुमार इ.

या खेळात महिला देखील मागे नाहीत. भारतातील काही महिला कुस्ती खेळाडू :

 1. साक्षी मलिक
 2. बबिता फोगाट
 3. विनेश फोगाट
 4. दिव्या काकरण
 5. ललिता सेहरावत इ.

कुस्ती खेळाबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Wrestling Quiz and Answers

१. कुस्ती खेळाचा उगम कुठल्या देशात झाला आहे?

उत्तर: कुस्ती खेळाचा उगम भारतीय उपखंडात झाला असल्याचे समजते.

२. कुस्ती खेळातील ऑलिम्पिक पदक मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर: खाशाबा जाधव.

३. कुस्ती खेळातील खेळाडूंना काय म्हणतात?

उत्तर: मल्ल किंवा पैलवान.

४. कुस्तीला इंग्रजीत काय म्हणतात?

उत्तर: रेसलिंग.

५. कुस्ती या खेळात ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?

उत्तर: साक्षी मलिक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here