मुस्लीम राष्ट्रात नोटेवर चक्क गणपती बाप्पांचा फोटो, हा आहे तो देश

Lord Ganesha on Indonesian Currency

आपला देश हा एक सांस्कृतिक वारसा लाभलेला देश आहे. सोबतच देशात अनेक प्रकारच्या धर्म आणि पंथाची लोक सलोख्याने नांदतात. प्रत्येक जाती धर्माचे सन आणि उत्सव सुद्धा आपल्या देशात जल्लोषात साजरे केले जातात.

या सर्व उत्सवांपैकी एक म्हणजे गणेश चतुर्थी. जेव्हा लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होते. या दिवसापासून तर पुढील १० दिवस संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण असते. सगळीकडे मनाला उत्साह निर्माण करणारे वातावरण निर्माण झालेले असते.

कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते. आणि त्यानंतर कार्याला सुरुवात केली जाते. बाकी देवाधीकांपैकी आधीचा मान हा गणपती बाप्पाला आहे.

आजच्या लेखात आपण बाप्पाविषयी अशी माहिती पाहणार आहोत जी खूपच कमी लोकांना माहिती असेल तर चला पाहूया बाप्पाविषयी एक अनोखी गोष्ट.

मुस्लीम राष्ट्रात नोटेवर चक्क गणपती बाप्पांचा फोटो, हा आहे तो देश – Lord Ganesha on a Currency

हा देश जगातील मोठ्या मुस्लीम देशांपैकी एक आहे. या देशात सुद्धा हिंदू आणि मुस्लीम बांधव सलोख्याने राहतात. २०१० ला जेव्हा लालकृष्ण अडवाणी जकार्ता येथे गेले होते तेव्हा तेथील हिंदू आणि मुस्लीम बांधवांचे एकमेकांशी असलेले प्रेम पाहून थक्क झाले होते.

देशाच्या संपूर्ण लोकसंखेच्या ८७-८८ टक्के मुस्लीम बांधव या देशाचे रहिवासी आहेत आणि फक्त ३ टक्के रहिवासी हे भारतीय आहेत.

इंडोनेशिया च्या नोटेवर गणपती बाप्प्पा – Indonesia Currency Ganesh

आपल्या देशाच्या नोटांवर ज्या प्रमाणे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीचा फोटो आहे आणि आपण गांधीजींचा फोटो असणाऱ्या नोटांवर व्यवहार करत असतो. त्याच प्रमाणे आपल्याला जाणून आश्चर्य होईल कि इंडोनेशियाच्या एका नोटेवर गणपती बाप्पांचा फोटो आहे. इंडोनेशिया हे एक मुस्लीम राष्ट्र आहे, तरी सुद्धा त्या देशाच्या नोटेवर गणपती बाप्पांचा फोटो कसा काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल.

या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. त्या अश्या कि ज्याप्रमाणे आपल्या देशात गणपती बाप्पाला बुद्धीची आणि कलांची आराध्य दैवत मानल्या जातं त्याचप्रमाणे इंडोनेशियात सुद्धा गणपती बाप्पाला शास्त्र, कला आणि बुद्धीचे दैवत मानल्या जात.

आपल्याला इंडोनेशियाच्या जुन्या २० हजाराच्या नोटेवर बाप्पा पाहायला मिळतात. या देशात बाप्पाला कला विज्ञान यांच आराध्य मानल्या जातं. या नोटेवर शिक्षणासाठी धडपडणारे तेव्हाचे इंडोनेशियाचे शिक्षामंत्री हजर देवंतर यांचा फोटो सुद्धा पाहायला मिळतो. सोबतच या नोटेच्या मागील बाजूला आपल्याला एक क्लास आणि त्यामध्ये काही विधार्थी दिसतात.

नोटेवर बाप्पा कसे आले ? – Why is Lord Ganesha On Indonesian Currency

हा सुद्धा एक प्रश्नच आहे कि नोटेवर बाप्पा कसे आले. यामागे एक कारण आहे. खूप वर्षापूर्वी इंडोनेशिया ची अर्थव्यवस्था खूप कठीण काळातून जात होती. आणि तेव्हाच गणपती बाप्पाचा फोटो असणारी एक २० हजाराची नोट जारी केल्या गेली. आणि त्यानंतर काही दिवसांनी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था पुन्हा पहिल्यासारखी झाली असे काही आर्थिक तज्ञांच मत होत. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था पुन्हा पहिल्यासारखी होण्याच्या मागे काही लोक नोटेचा पुरावा देतात.

आता चलनात नाहीत बाप्पा असलेल्या नोट

इंडोनेशिया सरकार ने सन १९९८ साली बाप्पाचा फोटो असणारे २०००० चे नोट चलनात आणले होते. हे नोट १० वर्ष तेथील चलनात राहिले त्यानंतर २००८ च्या शेवटी या नोटा बंद झाल्या. त्यामुळे आता तेथील चलनात बाप्पा असलेल्या नोट नाहीत पण सुरुवातीला बाप्पा असलेल्या नोट खूप प्रचलित होऊन चलनात आल्या होत्या.

आशा करतो आपल्याला बाप्पा विषयी लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करून हि माहिती द्यायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top