Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती

Nandurbar Jilha Mahiti

खान्देशामधले फार प्राचीन शहर म्हणुन नंदुरबार या शहराची ओळख आपल्याला सांगता येईल पुर्वीचे नंदीगृह! अर्थात यादवांच्या काळात नंदीगृह म्हणुन ओळखले जाणारे आजचे नंदुरबार होय! प्राचीन आख्यायिकेनुसार नंद नावाच्या गवळयांच्या राजाने हे शहर वसविले होते..

फार अगोदरच्या काळात अहिर (अभीर) राजे या खान्देश भागावर राज्य करायचे या अहिर राजांच्या नावामुळेच येथे बोलल्या जाणाऱ्या भाषेला अहिराणी हे नाव पडले. १ जुलै १९९८ पासुन धुळे जिल्हयातुन विभाजीत होऊन नंदुरबार ‘जिल्हा’ म्हणुन अस्तित्वात आला. पुर्वी तो धुळे जिल्हयाचाच भाग होता.

नंदुरबार जिल्हयाचे वर्णन करतांना तो महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा असं देखील त्याचं वर्णन केलं जातं. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेनजीक नंदुरबार हे शहर वसले असुन ते खान्देशामधले महत्वाचे जिल्हा मुख्यालयाचे शहर म्हणुन ओळख मिळवुन आहे.

जळगांव धुळे नाशिक आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातल्या भागाला खान्देश असं म्हंटल्या जातं. गुजरात आणि महाराष्ट्र या महत्वाच्या राज्यांना जोडणारा लोहमार्ग याच जिल्हयातुन जातो शिवाय मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांकडे जाणारे रस्ते या जिल्हयातुन जातात.

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती – Nandurbar District Information in Marathi

Nandurbar District Information in Marathi
Nandurbar District

नंदुरबार जिल्हयातील तालुके – Nandurbar District Taluka List

या जिल्हयात एकुण ६ तालुके आहेत.

  1.  नंदुरबार
  2.  अक्कलकुवा
  3.  अक्राणी
  4.  तळोदा
  5.  नवापुर
  6.  शहादा

नंदुरबार जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nandurbar Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या :- १६,४८,२९५
  • क्षेत्रफळ :- ५,९५५ वर्ग कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण :- ६४.३८%
  • एकुण तालुके :- ६
  • १००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९७५
  • तापी आणि नर्मदा या दोन नद्या या जिल्हयातुन वाहातात. एकमेव अशी या जिल्हयातील उद्योग वसाहत तळोदे या ठिकाणी आहे. जिनिंग प्रेसिंगचे उद्योग नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी आहेत.
  • तळोदे गावातील सागवान लाकडाची मोठी बाजारपेठ प्रसिध्द आहे.
  • जिल्हयातील महत्वाची रेल्वेस्थानकं म्हणजे नंदुरबार, नवापुर आणि चिंचपाडा रनाळे ही होय.
  • आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात असल्यामुळे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणुन देखील ओळखला जातो.
  • तांदुळ, भुईमुग, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहु ही येथील मुख्य पिकं, येथील सर्वच तालुक्यांमधे आणि दोनही हंगामामधे घेतले जाणारे पिक म्हणजे ज्वारी होय. येथील दादर ज्वारी प्रसिध्द असुन ते पीक रब्बी हंगामात या ठिकाणी घेतले जाते.
  • नंदुरबार जिल्हयात येणाया सातपुडा पर्वतरांगांमधे आदिवासी लोक मोठया संख्येने राहातात.  गोमित, पारधी आणि भिल्ल हे लोक जास्त संख्येने असुन त्यांच्याखालोखाल कोकणा, पावरे, गावीत आणि धनका या जमातीचे लोक देखील येथे आहेत आणि ते आपल्या परंपरा, लोककला, लोकसंस्कृती, राहणीमान आजही टिकवुन आहेत.
  • आदिवासी जमातीचे पावरा नृत्य फार प्रसिध्द आहे.
  • नंदुरबार येथील प्रकाशे हे स्थळ खान्देशची काशी म्हणुन सुपरीचीत आहे. येथे तापी आणि गोमाई या दोन नदयांचा संगम झाल्याने हे पवित्र तिर्थक्षेत्र म्हणुन पुजनीय आहे शिवाय येथे संगमेश्वर आणि केदारेश्वर ही भगवान महादेवाची मंदिर आहेत.
  • रेल्वे मार्ग आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सेवा सुरळीत सुरू असल्याने नंदुरबार शहर इतर शहरांशी चांगल्या तऱ्हेने जोडल्या गेले आहे.
  • तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्हयात लोकप्रिय असुन ते पाहाण्याकरता लांब लांबुन पर्यटक फिरण्याकरता या ठिकाणी येत असतात.
  • या व्यतिरीक्त प्रकाशा, दत्तात्रयाचे मंदिर, हिडिंबा जंगल, मच्छिंद्रनाथाची गुफा, पुष्पदंतेश्वराचे मंदिर, साखर कारखाने, सातपुडा पर्वत रांगा हे पाहाण्याकरता पर्यटक नेहमीच गर्दी करतात.

नंदुरबार जिल्हयातील पर्यटन आणि धार्मिक स्थळं – Tourist Places in Nandurbar District

तोरणमाळ – Toranmal

  • नंदुरबार पासुन साधारण ७५ कि.मी. अंतरावर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण निवांत वेळ घालवण्यास इच्छुक असणायांकरता उत्तम पर्यटनस्थळ आहे.
  • सातपुडा डोंगरांमधे असलेले तोरणमाळ जिल्हयातील एक सुंदर हिल स्टेशन आहे.
  • समुद्र सपाटीपासुन ४७९३ फुट उंचीवर असलेले हे ठिकाण शांत आणि निसर्गसौंदर्याने सजलेले असुन पर्यटकांना फार आवडणारे आहे.
  • या तोरणमाळला दक्षिणेकडुन उत्तरेकडे एक नदी वाहाते नदीच्या उत्तरेला कमळाच्या फुलांनी भरलेला परिसर दृष्टीस पडतो.
  • संपुर्ण वर्षभर १२ ही महीने येथे थंड आणि हवेहवेसे हवामान असते. अनेक प्राणी देखील या ठिकाणी वास्तव्याला असुन विविध वनस्पती देखील आहेत.
  • या ठिकाणच्या यशवंत तलावावर नौका विहाराचा आनंद आपल्याला घेता येऊ  शकतो, सीता खाई चा धबधबा पावसाळयात धो-धो कोसळतो.
  • खडकी पॉईंट हे उंचावरचे स्थान ट्रेकिंग करता उत्तम ठिकाण असुन येथुन कमळांनी भरलेला तलाव आणि सुर्यास्त फार मनोहारी भासतो.
  • येथे आपण खाजगी वाहनाने किंवा महामंडळाच्या बसने देखील येऊ  शकता.

प्रकाशा – Prakasha

  • दक्षीण काशी म्हणुन ओळखले जाणारे प्रकाशा हे ठिकाण आध्यात्मिक दृष्टया फार पवीत्र आणि भाविकांचे श्रध्दास्थान म्हणुन सर्वदुर परीचीत आहे.
  • तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झाल्यामुळे याचे पावित्र्य आणखीनच वाढले आहे.
  • केदारेश्वर महात्म्य या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आढळतो.
  • केदारेश्वर आणि संगमेश्वर अशी शिवाची मंदिर या ठिकाणी असुन १२ ही महिने येथे दर्शनाकरता भाविकांची गर्दी असते.
  • पावसाळयात येथील नदया दोन्ही थळी तुडूंब भरून वाहातात तरी देखील महादेवाला आणि मंदिराला आजतागायत कुठलीही हानी पोहोचलेली नाही.
  • महाशिवरात्रीला आणि श्रावणात या ठिकाणी बरीच गर्दी पहायला मिळते.
  • शहादा तळोदा रस्त्यावर हे ठिकाण आहे आणि नंदुरबार जिल्हयातील लोकांचे हे अतिप्रीय ठिकाण आहे.

उनपदेव – Unapdev

  • या जिल्हयातील उनपदेव हे ठिकाण धार्मीक आणि आध्यात्मिक महत्व राखुन असले तरी देखील सहलीकरता सुध्दा हे तेवढेच प्रसीध्द ठिकाण आहे.
  • उनपदेव येथे गरम पाण्याचा झरा सतत वाहात असुन येथे कुंडात त्याची संतत धार पडत असते या गरम पाण्यामुळे बयाचश्या व्याधी देखील बया होत असल्याचे भाविक मानतात.
  • दगडांमधुन खळखळणारे पाण्याचे प्रवाह तरूणांसोबत लहानग्यांना देखील आकर्षीत करत असतात.
  • एक दिवसाच्या सहलीकरता हे ठिकाण एक उत्तम पर्याय होऊ  शकतो.

अस्थंबा – Astamba

  • नंदुरबार जिल्हयातील अक्राणी तालुक्यातील अस्थंबा या उंच डोंगरावर स्थित असलेल्या धार्मीक स्थळाला फार महत्व आहे.
  • दिवाळीच्या सुमारास येथे १० ते १५ दिवसांची जत्रा आयोजित केली जाते.
  • येथे आयोजित मेला दक्षिण गुजरात आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांकरता महत्वाचा उत्सव मानल्या जातो.
  • अस्थम्बा ला हिंदु महाकाव्य महाभारतातील एक पौराणिक पात्र मानल्या जाते, आदिवासींच्या मान्यतेनुसार तो अश्वत्थामा असुन गुरू द्रोणाचार्याचा पुत्र आहे.

तर हि होती महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार ची माहिती आशा करतो आपल्याला आवडली असेल आवडल्यास या माहितीला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. अश्याच लेखासाठी आमच्या majhimarathi.comसोबत जुळून रहा.

धन्यवाद!

 

Previous Post

हिमाचली सब्जी रेसिपी

Next Post

जाणून घ्या १९ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

Mumbai Suburban District
City Information

मुंबई उपनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Mumbai Upnagar Mahiti क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर!मुंबई हे शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर...

by Editorial team
June 1, 2020
लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
City Information

लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Latur Jilha Mahiti महाराष्ट्राच्या आग्नेय आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ वसलेला लातुर जिल्हा! महाराष्ट्रातील सर्वात मोठया जिल्हयातील १६ व्या क्रमांकाचा जिल्हा...

by Editorial team
March 21, 2022
Next Post
19 March Today Historical Events in Marathi

जाणून घ्या १९ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Prabodhankar Thackeray in Marathi

प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र

Malai Paneer Tikka Recipe

स्वादिष्ट पनीर मलाई टिक्का बनवण्याची रेसिपी - Tasty Malai Paneer Tikka recipe in Marathi

20 March Today Historical Events in Marathi

जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष

Hot and Sour Soup Recipe in Marathi

वेज हॉट एण्ड सॉर सूप रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved