• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Thursday, August 18, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

पंकजा ताई मुंडे यांच्या विषयी  माहिती

Pankaja Munde Mahiti

भाजपाचे दिवंगत श्री गोपिनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे (पालवे). परळी विधानसभा मतदार संघाच्या त्या आमदार राहिल्या आहेत, राजकारणाचा वारसा वडिलांच्या पश्चात त्या समर्थपणे सांभाळतांना दिसता आहेत.

पंकजा ताई मुंडे यांच्या विषयी  माहिती  –  Pankaja Munde Biography in Marathi

Pankaja Munde

पंकजा ताई मुंडे यांच्या अल्पपरिचय – Pankaja Munde Information in Marathi

नाव: पंकजा मुंडे (पालवे)
जन्म:26 जुलै 1979
जन्मस्थान: परळी जि.बीड
शिक्षण: बी.एस.सी. एमबीए
वडील:दिवंगत श्री गोपिनाथ मुंडे
आई: प्रज्ञा मुंडे महाजन
बहिणी:   प्रीतम, यशश्री
पति:   चारूदत्त ऊर्फ अमित पालवे
मतदारसंघ:   परळी जि.बीड
आई: महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री

पंकजा मुंडे राजकीय करियर – Pankaja Munde Political Career

भारतीय जनता पक्ष मोठा करण्यात वडिलांचे प्रयत्न, कष्ट आणि संघर्ष पंकजा यांनी जवळुन पाहिला त्यामुळे संघर्षाशिवाय यशाची चव चाखता येत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. आज पंकजा देखील प्रयत्नपुर्वक यशाकडे वाटचाल करीत असतांना आपल्याला दिसतात. पंकजा मुंडे या गोपिनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांची ज्येष्ठ कन्या. २६ जुलै १९७९ ला त्यांचा जन्म परळी येथे मुंडेंच्या ज्येष्ठ कन्येच्या रूपात झाला. त्यांच्या मामांनीच म्हणजे प्रमोद महाजनांनी त्यांचे नाव ठरविले होते. मुलगा झाला तर पंकज आणि कन्या झाली तर पंकजा. त्याचे कारण देखील विशेष असेच होते. त्याच सुमारास भारतीय जनता पक्षाला कमळ हे निवडणुक चिन्ह म्हणुन मिळाले होते.

पंकजा मुंडे यांचे व्यक्तिगत जीवन – Pankaja Munde Family History in Marathi

डॉ.अमित पालवेंशी त्या १९९९ साली विवाहबध्द झाल्या. या उभयतांना एक मुलगा असुन त्याचे नाव आर्यमान आहे. पंकजा यांना दोन लहान बहिणी आहेत परंतु त्या राजकारणापासुन अलिप्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलतभाऊ आहेत. पंकजांच्या राजकिय कारकिर्दीला २००९ साली सुरूवात झाली. प्रथमतः त्यांना भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले आणि तेथुनच त्यांचा राजकारणातला प्रवेश निश्चित होत गेला. २००९ ला परळी मतदारसंघातुन त्या विधानसभेची निवडणुक लढल्या आणि आमदार म्हणुन निवडुन देखील आल्या.

पंकजा मुंडे यांचे सामाजिक योगदान – Pankaja Munde Social Work

  • लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान बीड येथे वडिलांच्या प्रचाराकरता त्यावेळी त्यांनी जवळजवळ ३०० गावांमधे सभा घेतल्या आणि एकुण ४०० गावांचा झंझावाती दौरा देखील केला. त्यांच्यातील कष्ट करण्याची तयारी त्यावेळी सर्वांनाच प्रकर्षानं जाणवली होती.
  • दुष्काळ असतांना बीड जिल्हयाचा दुष्काळी जिल्हयांमधे समावेश न केल्याने पंकजा यांनी आपल्या वडिलांसमवेत मोर्चात सहभाग घेतला होता.
  • ज्यावेळी पेट्रोल चे भाव प्रति लिटरमागे साडे सात रूपयांनी वाढले होते त्यावेळेस चक्क बैलगाडीत बसुन परळी शहरातुन मोर्चा काढत त्या तहसिल कार्यालयावर धडकल्या होत्या.
  • परभणी महानगरपालिकेत ज्यावेळी निवडणुका जाहिर झाल्या त्यावेळी तेथील प्रचाराची धुरा देखील पंकजा यांच्यावर देण्यात आली होती.
  • वेळोवेळी त्या विधान भवनात मराठवाडयाच्या आणि परळीच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात.
  • निवडुन आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी त्यांची ईच्छा होती आणि तसा दावा देखील त्यांनी केला होता.
  • ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणुन त्यांनी कामकाज पाहिले आहे. हा पदभार सांभाळत असतांना सुध्दा त्यांच्यावर बऱ्याच टिका आणि आरोप झाले आहेत. शाळांमधे वाटल्या जाणारी चिक्की मुलांच्या आरोग्याला घातक असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर बरेच आरोप देखील झालेत.
  • दुष्काळी भागाचा दौरा करतांना काढलेली सेल्फी देखील वादाच्या भवाऱ्यात सापडली होती.
  • जलयुक्त शिवार आणि शासनाने चालवलेल्या योजनांचे श्रेय पंकजा यांनी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजनेची खाती त्यांच्याकडुन काढुन घेतली होती,
  • महिला आणि बालकल्याण या खात्याची जवाबदारी त्यांच्यावर ठेवण्यात आली.
  • महिलांकरीता त्या सतत कार्य करत असतांना दिसतात त्यांच्या आर्थिक प्रगतीकरता बचतगट स्थापन करणे, महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
  • पंकजा यांनी मराठवाडयात अनेक शाळा, महाविद्यालयं, औद्योगिक शिक्षण संस्था, आणि अभियांत्रीकी महाविद्यालये सुरू केली आहेत.
  • उस तोड कामगारांचे बीड जिल्हयात जास्त प्रमाण असल्याने त्यांच्याकरता देखील त्या कायम प्रयत्न करत असतांना दिसतात.
  • आर्थिक दुर्बल आणि भटक्या विमुक्त व इतर मागास वर्गांना त्या कायम मदतिचा हात देत असतात.
  • स्त्रियांचे प्रमाण कमी होत असल्याने पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात लेक वाचवा राष्ट्र घडवा ही योजना सुरू केली शिवाय वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्थेच्या माध्यमातुन माझी कन्या भाग्यश्री ही योजना देखील त्यांनी सुरू केली होती.
  • स्त्रिभ्रूण हत्या थांबाव्यात याकरीता त्या प्रबोधन देखील करीत असतात.

आशा करतो कि पंकजा मुंडे यांच्याविषयी तुम्हाला असलेल्या माहितीत भर पडली असेल, आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved