• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

भारतीय हिंदी चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद

Sonu Sood Biography

आपल्या देशांतील चित्रपट क्षेत्र हे एकमेव अस क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपल्या देशांतील बरेचसे युवक आपलं नशीब आजमावत असतात. आजच्या युवा पिढीला चित्रपट क्षेत्रांत अभिनय करण्याची खूप ओढ लागलेली आहे. आपल्याला एखाद्या चित्रपटात छोटस काम मिळेल या आशेने दररोज कित्येक युवक चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिस भोवती चकरा मारीत असतात. त्यापैकी काहीच युवक अशे असतात ज्यांना चित्रपट क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते. त्यापैकी एक आहेत सोनू सूद

सोनू सूद हे युवा अभिनेता आहेत, खुप कमी वयात त्यांनी यशाचे शिखर गाठले.  त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरच्या स्वरुपात केली परंतु त्यांना चित्रपट क्षेत्राची गोडी असल्यामुळे ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. आज ते एक सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत.

मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपण सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते,  चित्रपट निर्माता, व  मॉडेल सोनू सूद यांच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कश्या प्रकारे सोनू सूद यांनी चित्रपट क्षेत्रांत मेहनत करून स्वत:ला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. आज ते ज्या स्थानी आहेत त्या स्थानापर्यंत ते कश्या प्रकारे पोहचले. कश्या प्रकारे ते देशातील युवकांचे आवडते अभिनेते बनले. या सर्व घटनांची माहिती आपण या ठिकाणी पाहू.

भारतीय हिंदी चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद बायोग्राफी – Actor Sonu Sood Biography in Marathi

Sonu Sood Biography Marathi
Sonu Sood Biography Marathi

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांची माहिती – Sonu Sood Information in Marathi

सोनू सूद यांचा जन्म सन ३० मे १९७३ साली पंजाब राज्यातील मोगा या छोट्याशा शहरात झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव शक्ती सूद असून पेशाने ते एक व्यावसायिक आहेत तसचं, त्यांच्या आईचे नाव सरोज सूद असून त्या व्यवसायाने एक शिक्षिका आहेत. शिवाय, सोनू सूद यांना दोन बहिणी असून, मोठी बहिण नाव मोनिका सूद ह्या वैज्ञानिक आहेत.

तर, लहान बहिणीचे नाव मालविका सूद आहे. मित्रांनो सोनू सूद यांचे शिक्षण हे नागपुर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केलं आहे. यानंतर मात्र त्यांना अभिनय क्षेत्रांची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रांत आपले नशीब आजमावून पहले.

सोनू सूद यांची कारकीर्द – Sonu Sood Career

सुरुवातीला त्यांनी मुंबई ला चित्रपट इंडस्ट्रीजमध्ये काम मिळविण्यासाठी खूप परिश्रम केले परंतु त्यांना यश आलं नाही. सोनू सूद यांनी  त्यांच्या जीवनात केलेला पहिला चित्रपट हा तमिळ भाषिक होता. सुरुवातीला त्यांना हिंदी चित्रपट क्षेत्रांत काम मिळालं नाही. सोनू सूद यांनी तमिळ, तेलगु, कन्नड आणि हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यावेळी दक्षिण भारतीय चित्रपट क्षेत्रांत सोनू सूद एक सुपरस्टार म्हणून ओळखले जावू लागले तेव्हा त्यांना सर्वप्रथम हिंदी चित्रपट क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली.

सोनू सूद यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रांत केलेला पहिला हिंदी चित्रपट होता शहीद भगतसिंग यानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळाले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ते आज एक प्रसिद्ध अभिनेते बनले आहेत. सोनू सूद यांना मार्शल आर्ट मध्ये विशेष रुची आहे. त्यांच्या शारीरिक प्रकृतीवरून आपल्या लक्षात येते.

खऱ्या आयुष्यातील हिरो सोनू सूद – Real life Hero Sonu Sood 

मित्रांनो, सोनू सूद यांनी भारतीय लोकांची मने आपल्या अभिनयातून तर जिंकलीच आहे. शिवाय, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी कोविड १९ या महामारी प्रसंगी देशांतील मजूर वर्गाला त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची तसचं, त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.

त्यांनी केलेली कामगिरी खरच खूप मोठी आहे. संपूर्ण जग महामारीचा सामना करीत असतांना गरिबांच्या सेवेसाठी धावून येणारे एक देवदूतच म्हणवे लागतील. तसचं, देशातील युवकांसाठी ते एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व बनले आहेत.

Devanand Ingle

Devanand Ingle

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved