वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

V.S. Khandekar Mahiti

मराठी कथा, कादंबरीकार म्हणून सर्वांनाच परिचित असणारं नाव वि.स. खांडेकर.

भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. सगळ्यात आधी मराठी साहित्याला हा पुरस्कार प्राप्त झाला तो 1974 साली वि.स. खांडेकरांच्या ‘ययाती’ या कादंबरीच्या माध्यमातून.

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक – V S Khandekar Information in Marathi

पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर
जन्म 11 जानेवारी 1898. सांगली, महाराष्ट्र
मिळालेले पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (1960), पद्मभूषण पुरस्कार (1968), ज्ञानपीठ पुरस्कार (1974)
ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली कादंबरी ‘ययाती’
मृत्यू 2 सप्टेबर 1976, मिरज (महाराष्ट्र)

वि. स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 महाराष्ट्रातील सांगली येथे झाला.

वि.स. खांडेकर यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. शालेय जीवनात त्यांना वाचनाची आवड तर होतीच पण त्याचबरोबर नाटकात काम करणे, नाटकाचे दिग्दर्शन करण्याचीही त्यांना आवड होती.

पुढे पुणे येथे इंटर आर्ट्स पर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर 1920 मध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे येथे प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याधापक म्हणून नौकरी केली.

त्यांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यामध्ये कविता, विनोदी लेख इत्यादी साहित्य असे.

उत्तरोत्तर त्यांचे साहित्य आणखी बहरत गेले. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. गुजराती, तमिळ, हिंदी आदि भाषांमध्ये त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद झालेले आपल्याला दिसतात. त्यांच्या काही कथांची भाषांतरे तर हि इंग्रजी आणि रशियन भाषांतून झालेली आहेत.

जीवन व कला ह्यांना वाहिलेल्या ज्योत्स्ना या मासिकाचे ते संपादकही होते.1961 मध्ये महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येणाऱ्या कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक त्यांच्या ‘ययाती’ कादंबरीस देण्यात आले.

त्याच वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कारही ह्या कादंबरीस मिळाला.

वि.स. खांडेकर यांच्याबद्दल आणखी काही – About V S Khandekar

1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते राहिले आहेत.

1968 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

1974 साली मराठी साहित्यात मानाचा तुरा खोवला गेला. याच वर्षी वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिला सर्वोच्च सन्मान आहे.

ययातीच्या माध्यमातून भोगवादावर केलेले भेदक भाष्य तसेच जीवन जगण्याचे अंतिम तथ्य आणि शेवटी असणारे अंतिम सत्य याचे फार सुंदर आणि मार्मिक लिखाण आणि त्यातील आशय या कादंबरीमधून आपल्याला पाहायला मिळतो.

त्यातील संदर्भ आणि आशय आजच्या आधुनिक जगालाही तंतोतंत लागू पडतो. त्यांनी ययाती कादंबरीसह जवळपास 16 कादंबऱ्यांचे लिखाण केले.

त्यांचे अनेक कथासंग्रह, रूपककथा संग्रह, लघुकथासंग्रह इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये राहिली आहेत.

उत्तरार्ध आयुष्यात अंधत्व आल्यानंतरही त्यांनी साहित्याची कास सोडली नाही. पण एकाकी जीवन आणि अंधत्वामुळे आलेले परावलंबित्व याची सल त्यांच्या मनाला वाटत असे.
2 सप्टेबर 1976 ला मिरज येथे त्यांचे निधन झाले.

त्यांच्या साहित्यातून समाजाप्रती असलेली त्यांची जाणीव, कणव, अन्याय अत्याचारविरोधात त्यांनी उठवलेला आवाज आपल्याला दिसून येतो. त्यांच्या लेखनात माणुसकीचा गहिवर उमटून दिसतो. त्यांनी वृत्तपत्रीय लेखनात व ग्रंथ संपादनात आपला ठसा उमटवला.

वि. स. खांडेकर यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न  – FAQ About V.S. Khandekar

Q. वि.स. खांडेकर यांचा जन्म केव्हा झाला?

उ. 11 जानेवारी 1898. – सांगली (महाराष्ट्र)

Q. वि.स. खांडेकर यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती?

उ. ‘ययाती’

Q. वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आणि केव्हा?.

उ. ययाती या कादंबरीसाठी 1974 साली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top