वर्धा नदीची माहिती

Wardha Nadi

वर्धा नदीस ‘विदर्भाची वरदायिनी नदी’ असे म्हणतात. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिण उतारावर मुलताई या ठिकाणी वर्धा नदी उगम पावते.

वर्धा नदीची माहिती – Wardha River Information in Marathi

Wardha River Information in Marathi

नदीचे नाव वर्धा
उगमस्थान मुलता, सातपुडा पर्वत रांगा, जि. बैतुल (मध्य प्रदेश).
लांबी 528 कि.मी.
अप्पर वर्धा प्रकल्प ता. मोर्शी, जि. अमरावती (महाराष्ट्र)

वर्धा नदीची लांबी सुमारे पाचशे पंचावन्न किलोमीटर एवढी आहे. या प्रवासात ती अनेक प्रकारच्या प्रदेशांतून वाहत जाऊन शेवटी चंद्रपूर जिल्ह्यात शिवनी गावाजवळ ती वैनगंगा नदीस मिळते.

वर्धा नदीचे खरे नाव ‘वरदा’ असे आहे. प्राचीन काळापासून वाहणारी वर्धा नदी म्हणजे वर देणारी नदी होय. कौंडिण्यपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी वर्धा नदीच्या तीरावरच वसली होती. वर्धा नदीचा उगम महाराष्ट्राबाहेर असला, तरी महाराष्ट्रातून प्रवास करून तिने वैदर्भी जनतेला सुखी-समृद्ध करण्यास हातभार लावला आहे.

आपल्या प्रवासात ती अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहताना दक्षिणमुखी होते. येथे तिचा प्रवाह छोटासा आहे. वर्धा नदीला अमरावती जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या ‘बेल’, ‘मांड’ आणि ‘चुडामन’ या उपनद्या येऊन मिळतात. त्यानंतर ती दक्षिणवाहिनी होते. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अप्पर वर्धा हे धरण बांधले आहे.

अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण क्षमता 27800 दशलक्ष घनफूट इतकी आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांच्या यादीमध्ये या धरणाचा समावेश होतो. वर्धा नदीमुळेच वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा ठरली आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या ‘यशोदा’, ‘वेण्णा’, ‘बाकळी’ या नद्या वर्धा नदीला मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत.

अशा प्रकारे वर्धा नदीचा प्रवाह मोठा होत-होत चंद्रपूर जिल्ह्यात वाहत जातो. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला चपराळा येथे मिळते पुढे वैनगंगा – वर्धा नदीच्या संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता नदी या नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी हि महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळते.

वर्धा नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते, तेथील भाग अनेक प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध झाला आहे. वर्धेच्या तीरावर बांबू आणि सागाची वनसंपदा बहरली आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीचे खोरे महत्त्वाच्या खनिज संपत्तीने संपन्न झालेले पाहायला मिळते. दगडी कोळसा, चुनखडी आणि चिनी मातीच्या खाणी आहेत.

कागद-उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर वर्धेच्या खोऱ्यातच आहे.

वर्धा नदीने विदर्भातला प्रदेश संपन्न बनवून ती लोकांची वरदायिनी  बनली आहे.

वर्धा नदी बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

प्रश्न. वर्धा नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात मुलवाई या ठिकाणी वर्धा नदी उगम पावते.

प्रश्न. वर्धा नदीच्या तीरावर विदर्भाची कुठली राजधानी वसलेली होती.

उत्तर:  कौंडिण्यपूर.

प्रश्न. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या कोणत्या नद्या ह्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत?

उत्तर: वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या ‘यशोदा’, ‘वेण्णा’, ‘बाकळी’ या तिच्या उपनद्या आहेत.

प्रश्न. अमरावती जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या कोणत्या नद्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत?

उत्तर: अमरावती जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या बेल, मांड आणि चुडाम या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत.

प्रश्न. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या कोणत्या नदीस आणि कोठे वर्धा नदी मिळते?

उत्तर: वैनगंगा नदीला सेवनीजवळ.

प्रश्न. वर्धा-वैनगंगेच्या संगमानंतरच्या प्रवाहाला काय नावाने ओळखले जाते?

उत्तर: प्राणहिता या नावाने.

प्रश्न. वर्धा-वैनगंगा संगमातून तयार झालेली प्राणहिता नदी पुढे कोणत्या नदीला मिळते?

उत्तर: गोदावरीला नदीला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top