Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १ मे रोजी येणारे दिनविशेष

१ May Dinvishes

मित्रानो, आजच्या दिवस हा अनेक महत्वपूर्ण  ऐतिहासिक घटनांची जाणीव करून देणारा दिन आहे. आजचा दिवस हा जगभरातील कामगारांच्या कामाचे कौतुक म्हणून जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसचं, आज भारतातील द्वैभाषिक राज्य मुंबई राज्याची विभागणी करून महाराष्ट्र व गुजरात या नवीन दोन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. म्हणून आज महाराष्ट्र राज्याचा व गुजरात राज्याचा स्थापना दिन देखील आहे.

याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी भूतकाळात करण्यात आलेले काही महत्वपूर्ण बदल व निर्मिती तसचं काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व शोध आदि घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १ मे रोजी येणारे दिनविशेष – १ May Today Historical Events in Marathi

1 May History Information in Marathi
1 May Today Historical Events in Marathi

 

१ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – १ May  Historical Event

  • इ.स. १७३९ मराठा साम्राज्याचे शासक पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र व पेशवा बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी आपल्या सैन्यासह पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
  • सन १८६२ साली स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ पार पडला.
  • इ.स. १८८६ साली अमेरिकेतील कामगारांनी एका दिवसाचे आपल्या कामाचे परिमाण हे किमान आठ तासाचे असयला पाहिजे याकरिता तेथिल कामगारांनी संप सुरु केला. परिणामी हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
  • सन १८९७ साली स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
  • इ.स. १९३० साली आपल्या सूर्यमालेतील नवव्या उपग्रहाचे नामकरण करून त्याचे नाव प्लुटो असे ठेवण्यात आले.
  • सन १९४० साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
  • इ.स. १९५६ साली जोनास सालक आणि अल्बर्ट ब्रुस सबिन यांनी पोलिओच्या विषाणूवर तयार केलेल्या लासिला मान्यता देण्यात आली.
  • सन १९६० साली द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्यात आली.
  • इ.स. १९६० साली गुजरात राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६२ साली महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९८१ साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी करून नवीन रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • सन १९७२ साली कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • इ.स. १९८३ साली महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९९८ साली महाराष्ट्र राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्प देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला अर्पण केला.
  • इ.स. १९९९ साली नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढविण्यासाठी सुधारणा करणारा नवीन अध्यादेश जारी करण्यात आला.

१ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – १  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९१० साली आय.सी.एस चे वरिष्ठ अधिकारी तसचं, भारतातील केरळ आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१३ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता बलराज साहनी यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली प्रख्यात भारतीय आधुनिक हिंदी कवी अंचल रामेश्वर शुक्ल यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१९ साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय गायक मन्ना डे यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली भारतीय समाजवादी निबंधकार, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी कार्यकर्ते मधु लिमये यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३२ साली प्रख्यात भारतीय राजकारणी कर्नाटक राज्याचे माजी (१६वे) मुख्यमंत्री तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी (१९वे) राज्यपाल सोमणाहल्ली मल्लैया कृष्णा यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली नृत्यकलेसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार – ओडिसी, पद्म विभूषण व  पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तिका आणि भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शैलीच्या गुरु सोनल मानसिंह यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९४४ साली भारतीय राजकारणी आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांचा जन्मदिन.
  • सन १९८८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या व हिंदी चित्रपट निर्माता अनुष्का शर्मा यांचा जन्मदिन.

१ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – १  May Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८८ साली ब्रिटीश कालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी प्रफुलचंद्र चाकी यांचे निधन.
  • सन १९५८ साली महाराष्ट्रीयन मराठी नाटककार गणेश शिवराम जोग उर्फ नाना जोग यांचे निधन.
  • इ.स. १९७२ साली भारतीय उद्योगपती व राजकारणी कमलनयन बजाज यांचे निधन.
  • सन १९९३ साली भारतीय महाराष्ट्रीयन समाजवादी नेते आणि मराठी लेखक नारायण गणेश गोरे यांचे निधन.
  • इ.स. १९९८ साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ञ व एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू गंगुताई पटवर्धन यांचे निधन.
  • सन २००२ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व लेखक पंडित आवळीकर यांचे निधन.
  • इ.स. २००४ साली भारतीय जनता पार्टी तसेच पूर्ववर्ती पक्ष भारतीय जनता संघाचे नेते तसचं, उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल यांचे निधन.
  • सन २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानी निर्मला देशपांडे यांचे निधन.
  • इ.स. २०१३ साली प्रख्यात भारतीय जनता पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पुत्र निखील एकनाथ खडसे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved