जाणून घ्या २७ जुलै रोजी येणारे दिनविशेष

27 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घड्लेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २७ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 27 July Today Historical Events in Marathi

27 July History Information in Marathi
27 July History Information in Marathi

२७ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 July Historical Event

 • इ.स. १७६१ साली थोरले माधवराव पेशवे उर्फ माधवराव बल्लाळ भट्ट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवा बनले.
 • इ.स. १८९७ साली बाळ गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं.
 • सन १९८७ साली पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक जहाजाचा मलबा सापडला.
 • सन १९९७ साली तामिळनाडुचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 • सन २००१ साली महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक कामकाजाच्या ठिकाणी, शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणी,सार्वजनिक वाहने आदी ठिकाणी धूम्रपान,तंबाखू, गुटखा सेवन करण्यावर व थुंकण्यावर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
 •  सन २०१२ साली लंडन देशांत ३० व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली.

२७ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – २७ July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७२४ साली राजस्थान मधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रतापसिंह द्वितीय यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५८ साली राधा स्वामी सत्संग ब्यास येथील दुसरे गुरु सावनसिंग जी महाराज यांचा जन्मदिन.
 • सन १९११ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्मदिन.
 • सन १९४० साली भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका व कादंबरीकार भारती मुखर्जी (Bharati Mukherjee) यांचा जन्मदिन.
 • सन १९५० साली ग्रामी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणा वादक व्ही. एम. भट्ट यांचा जन्मदिन.
 • सन १९५५ साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक ॲलन बॉर्डर(Allan Border) यांचा जन्मदिन.
 • सन १९६९ साली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन संघाचे प्रशिक्षक जोंटी रोड्स यांचा जन्मदिन.
 • सन १९९० साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सॅनॉन यांचा जन्मदिन.

२७ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – २७ July Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८४४ साली अणूंच्या सिद्धांताचे परिचय देणारे महान ब्रिटीश रसायन, भौतिक व हवामानशास्त्रज्ञ जॉन डाल्टन(John Dalton) यांचे निधन.
 • सन १९३५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
 • सन १९८० साली इराण देशाचे शेवटचे शासक व शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन.
 • सन १९९२ साली खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमजद खान यांचे निधन.
 • सन १९९७ साली हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
 • सन २००२ साली भारताचे अकरावे उपराष्ट्रपती व आंध्र प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल कृष्णकांत यांचे निधन.
 • सन २००७ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अणु रसायनशास्त्रज्ञ, संरक्षण शास्त्रज्ञ आणि स्फोटक अभियांत्रिकी शास्त्रातील तज्ञ तसचं,  भारतीय विस्फोटक संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संस्थापक संचालकवामन दत्तात्रेय पटवर्धन यांचे निधन.
 • सन २०१५ साली भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, तसचं, पद्मभूषण व पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित “मिसाईल मॅन” म्हणून प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व माजी भारतीय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top