Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ४ मे रोजी येणारे दिनविशेष

4 May Dinvishes

मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची तसचं, काही आधुनिक काळात घडलेल्या घडामोडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा दिवस हा ब्रिटीश शासित काळात भारतातील बंगाल प्रांताच्या मैसूर जवळील श्रीरंगपट्टणम या ठिकाणी इंग्रजांन सोबत झालेल्या लढाईत मैसूरचे वाघ टिपू सुलतान यांचे निधन झालं होत. याप्रमाणे आपण काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ४ मे रोजी येणारे दिनविशेष – 4  May Today Historical Events in Marathi

4 May History Information in Marathi

४ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 May Historical Event

  • इ.स. १७७५ साली पेरीस देशांत उघडणाऱ्या आणि बंद होणाऱ्या छत्रीचा शोध लावण्यात आला.
  • सन १७८० साली अमेरिकन एकेडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १८५४ साली भारतात पहिले मुद्रांकित टपाल (पोस्ट) तिकिट अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले.
  • सन १९३० साली स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवले.
  • इ.स.१९८९ साली भारतातील सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील अशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
  • सन १९९२ साली संगीतकार भूपेन हजारिक यांना दादासाहेब पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • इ.स. १९९५ साली शिवसेना-भाजपा युतीच्या राज्य सरकारने बॉम्बे ऐवजी मुंबई हेच मुळ नाव अधिकृतपणे राहील असा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला.

४ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १००६ साली पर्शियन सुफि संत अबू इस्माल अब्दुल्लाह अल-हेरावी अल-अंसारी उर्फ अब्दुल्ला अन्सारी यांचा जन्मदिन.
  • सन १६४९ साली मध्ययुगीन भारतातील बुंदेलखंड प्रांताचे शासक महाराजा छत्रसाल यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७६७ साली भारतीय कर्नाटकी संगीताचे शास्त्रीय संगीतकार त्यागराज यांचा जन्मदिन.
  • सन १८२५ साली चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताचे समर्थक व इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ थॉमस हेनरी हक्सले  यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८४९ साली लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगाली भाषेत भाषांतर करणारे प्रसिद्ध बंगाली भाषिक भाषांतरकार, साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक तसचं, रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू ज्योतिंद्रिनाथ टागोर यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली भारतातील कर्नाटक राज्याचे पहिले मुख्यमंत्री क्यासमांबल्ली चेंगलुराया रेड्डी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०५ साली स्वातंत्र्य भारतातील पहिला महिला न्यायाधीश तसचं, उच्च न्यायालयाच्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश आणि स्वातंत्र्यपूर्व भारतातील एमिली मर्फी यांच्यानंतर न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला  अण्णा चंडी यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गुप्तहेर कथा लेखक व कादंबरीकार वीरसेन आनंदराव उर्फ ‘बाबा’ कदम यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३४ साली सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली भारतीय पत्रकार आणि कस्तुरी कुटुंबाचे सदस्य तसचं, ‘द हिंदू’ समुहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक व माजी मुख्य संपादक एन. राम यांचा जन्मदिन.

४ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4  May Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स १७९९ साली मैसूरचा वाघ म्हणून ओळखले जाणारे बंगाल प्रांतातील मैसूर राज्याचे शासक टिपू सुलतान इंग्रजांसोबत श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या लढाईत मारल्या गेले.
  • सन १९८० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी, लेखक, व पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचे निधन.
  • इ.स. १९८० साली क्रांतिकारक व योगास्लाव्हिया राष्ट्राचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन.
  • सन १९८९ साली भारतातील आधुनिक बंगाली साहित्याचे प्रख्यात लेखक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • इ.स. २००८ साली हिंदुस्थानी संगीत-वाद्य (तबला) कलेमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबला वादक पंडित किशन महाराज यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved