जाणून घ्या ६ मे रोजी येणारे दिनविशेष

6 May Dinvishes

मित्रानो, ६ मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक विध्वंसक घटनेचा साक्षीदार आहे. मुंबई येथे सन २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या आतंकवादी हमल्यातील पकडण्यात आलेला जिवंत आतंकवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसचं, आज मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शाहूमहाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या सामाजिक सुधारणा आज सुधा लोकांच्या मनात जागृत आहेत.

याप्रमाणे आपण आज या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन व त्यांनी केलेल्या कार्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ६ मे रोजी येणारे दिनविशेष – 6  May Today Historical Events in Marathi

6 May History Information in Marathi

 

६ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6  May  Historical Event

  • इ.स. १५२९ साली घाघरा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी बंगाल आणि बिहारच्या शासकांचा पराभव केला.
  • सन १५३६ साली इंग्लंडचे राजा हेनरी अष्टम यांनी प्रत्येक गीरीजाघरात बाईबल हे धार्मिक पुस्तक ठेवण्यास सांगितले.
  • इ.स. १६३२ साली मुघल बादशाहा शहाजहान आणि आदिलशाह यांच्यात शहाजी राजांना पराभूत करण्याचा तह झाला.
  • सन १८३५ साली अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क हेरॉल्ड चे प्रकाशण करण्यास सुरुवात झाली.
  • इ.स. १८४० साली एक पेनी किमतीचे ‘पेनी ब्लॅक’  नावाचे टपाल तिकिट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकिट इ.स. १ मे १८४० साली जरी करण्यात आले होते.
  • इ.स. १९१० साली ब्रिटीश शासक एडवर्ड सप्तम यांच्या निधनानंतर त्यांची गाद्दी त्यांचे पुत्र जॉर्ज पंचम यांनी सांभाळली.
  • सन १९४४ साली पुणे येथील आगा खान पॅलेस मधून महात्मा गांधी यांची सुटका झाली.
  • इ.स. १९९९ साली महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांना तीस टक्के आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अश्या प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशांतील पहिले राज्य ठरले.
  • सन २००२ साली भूपिंद्र्नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला.

६ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५६ साली ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट(मानसशास्त्रज्ञ) आणि मनोविश्लेषणाचे संस्थापक तसचं, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रायड यांचा जन्मदिन.
  • सन १८६१ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य व थोर कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२० साली प्रख्यात भारतीय संगीत दिग्दर्शक व लोकप्रिय हिंदी चित्रपट सांगीत दिग्दर्शक बुलो सी राणी यांचा जन्मदिन.
  • सन १९४० साली प्रसिद्ध भारतीय महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्मदिन
  • इ.स. १९४३ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखिका वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्मदिन.
  • सन १९५१ साली भारतीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय भरतनाट्यम नर्तिका, वेशभूषाकार, प्रशिक्षक व लेखिका लीला सॅमसन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५३ साली ब्रिटीश राजकारणी व कामगार नेता तसचं, इंग्लंड देशाचे पंतप्रधान अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर यांचा जन्मदिन.
  • सन १९६४ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय जलतरणपटू खजान सिंह यांचा जन्मदिन.

६ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6  May Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८६२ साली अमेरिकन निबंधकार, कवी आणि तत्त्वज्ञ हेनरी डेविड थोरेयू यांचे निधन.
  • सन १९२२ साली महाराष्ट्रातील मराठा साम्राज्यातील भोसले घराण्याचे शासक व कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक सुधारणा केल्या, तसचं, कला, नाटक, आणि सांगितला प्रोत्साहन दिले.
  • इ.स. १९४६ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि प्रशंसित वकील भुलाभाई देसाई यांचे निधन.
  • सन १९५२ साली इटालियन फिजीशियन(डॉक्टर) आणि शिक्षिका मारिया टेक्ला आर्टेमेसिया मॉन्टेसरी  यांचे निधन.
  • इ.स. १९६६ साली भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री व भारताचे ऑस्ट्रेलियातील माजी उच्‍चायुक्त रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन.
  • सन १९९५ साली महाराष्ट्रीयन संत वाड्मयाचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार तसचं, हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांचे निधन.
  • इ.स. १९९९ साली पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे यांचे निधन.
  • सन २००६ साली जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज टायटनिक च्या दुर्घटनेचे साक्षीदार अमेरिकन नागरिक लिलियन एस्प्लंट यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top