जाणून घ्या ९ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

9 April Dinvishesh

मित्रानो आजचा दिवस हा अनशन आणि आंदोलन या सारख्या सामाजिक घटनांनी गाजलेला आहे. भारतीय समाजसेवक अण्णाहजारे यांनी भ्रष्टाचार विरुद्ध दिल्ली येथील रामलीला मैदानावर आमरण उपोषण सुरु केलं होत. सरकारने त्यांची मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण बंद केले.

तसचं, प्रख्यात कोकणी कार्यकर्ते शेनोई गोंबेब यांच्या स्मरणार्थ गोवा राज्यात आजचा दिवस कोकणी भाषादिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी कोकणी भाषेतील लेखकांचा सन्मान करण्यात येतो. याव्यतिरिक्त ऐतिहासिक घटना, शोध आणि महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन व निधन यांची संपूर्ण माहिती (9 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ९ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 9 April Today Historical Events in Marathi

9 April History Information in Marathi

९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 April Historical Event

 • इ.स. १६६९ साली मुघल शासक औरंगजेब यांनी आपल्या सैनिकांना हिंदुची सर्व धार्मिक स्थळे, मंदिर, शाळा उध्वस्त करण्यास सांगितले.
 • सन १८६० साली फ्रेंच देशातील प्रकाशक, पुस्तक विक्रेता आणि शोधक एडुअर्ड-लिओन स्कॉट डी मार्टिनविले यांनी सर्वप्रथम मानवी आवाजाचे ध्वनीमुद्रण केलं.
 • इ.स. २००३ साली इराक देशातील लोकांना सद्दाम हुसेन यांच्या तानशाही पासून मुक्ती मिळाली.
 • सन २००५ साली ब्रिटन देशाचे युवराज चार्ल्स यांचा विवाह कैमिला यांच्याशी झाला.
 • इ.स. २०११ साली प्रख्यात भारतीय समाजसेवक अण्णा हजारे दिल्ली येथे लोकपाल बील कायदा पास करण्यासठी करीत असलेले आमरण उपोषण सरकारने आपली मागणी मान्य केल्यानंतर बंद केले.

९ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १३३६ साली मंगोल शासक तैमूरलंग यांचा जन्मदिन.
 • सन १८२८ साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित असलेल्या सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य, वकील, समाजसुधारक व राजकीय कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९३ साली भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रवास प्रवासी साहित्याचे जनक राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स पुस्तकाच्या विक्रेता व अमेरिकन ज्योतिषी आणि कवी लिंडा गुडमन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२९ साली भारतीय पद्मभूषण, पद्मश्री, संगीत-नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित शरण राणी यांचा जन्मदिन.
 • सन १९४८ साली प्रख्यात भारतीय चित्रपट अभिनेत्री जया बच्चन उर्फ जया भादुरी यांचा जन्मदिन.

९ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९८१ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई देशमुख यांचे निधन.
 • इ.स. १९०१ साली भारतीय रहस्यवादी, तत्वज्ञ, विद्वान, सुधारक व जैन कवी श्रीमद श्रीरामचंद्र यांनी समाधी घेतली.
 • सन १९५२ साली प्रख्यात काश्मीर खोऱ्यातील कवी महजूर यांचे निधन.
 • इ.स. १९९४ साली भारतीय क्रांतिकारक व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे माजी सरचिटणीस चंद्र राजेश्वरा राव यांचे निधन.
 • सन १९९८ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व जुन्या मराठी साहित्याचे संशोधक तसचं, नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विष्णू भिकाजी कोलते यांचे निधन.
 • इ.स. २००१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय, दलित साहित्यिक, लेखक व औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top