जाणून घ्या ९ मे रोजी येणारे दिनविशेष

9 May Dinvishes

मित्रांनो, आजच्या दिवशी जगातील सर्वात सुंदर वास्तू ताजमहल ची निर्मिती पूर्ण झाली होती. मुघल बादशाहा शहाजहान यांनी आपल्या पत्नी मुमताज महल यांच्या आठवणीत निर्माण केलेली ही वास्तू इतिहास काळातील सर्वात सुंदर आणि मुघल शैलीत बनविण्यात आलेली खूपच सुंदर आणि आकर्षक वास्तू आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत या वास्तूची नोंद करण्यात आली आहे. आग्रा येथील यमुना नदीच्या किनारी स्थित असलेली ही ऐतिहासिक इमारत लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. दरवर्षी लाखो लोक या वास्तूला भेट देतात.

याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्तीन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, त्यांनी केलेलं कार्य व त्यांचे निधन आदी संपूर्ण घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ९ मे रोजी येणारे दिनविशेष – 9 May Today Historical Events in Marathi

9 May History Information in Marathi

९ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 May  Historical Event

  • इ.स. १५७६ साली मेवाड शासक महाराणा प्रताप आणि मुघल शासक बादशाहा अकबर यांच्यात हल्दीघटीचे युद्ध झाले.
  • सन १६५३ साली विश्वविख्यात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंदल्या गेलेली ऐतिहासिक वास्तू ताजमहल ची निर्मिती जवळपास २२ वर्षानंतर पूर्ण झाली
  • इ.स. १८७४ साली ब्रिटीश कालीन भारतातील मुंबई प्रांतात प्रथम घोड्यांची ट्राम सेवा सुरु करण्यात आली.
  • सन १९५५ साली पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मध्ये समावेश करण्यात आला.
  • इ.स. १९७५ साली विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली
  • सन २००३ साली अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने इंटरनेट प्रोग्राम एड्सेंस सादर केला.
  • इ.स. २००९ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध लावण्यासाठी आपला टोही नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला.
  • सन २०१२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी समलैंगिक विवाह करण्यास आपली अनुमती दिली.

९ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १५४० साली तत्कालीन राजस्थान मधील मेवाड प्रांताचे शासक महाराजा महाराणा प्रताप उर्फ प्रतापसिंह प्रथम यांचा जन्मदिन.
  • सन १८१४ साली प्रसिद्ध इंग्रजी भाषिक मराठी व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८३६ साली फ्रेंच नेत्र रोग विशेषज्ञ फर्डिनेंड मोनॉयर यांचा जन्मदिन.
  • सन १८६६ साली भारतीय समाजसुधारक व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्य व नेता तसचं, भारतीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेता तसचं, भारत सेवक समाजाचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्मदिन
  • इ.स. १८९६ साली थोर स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेता व शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक केशवराव मारुतराव जेथे यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादी अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३५ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी कवयित्री स्नेहमयी चौधरी यांचा जन्मदिन.

मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9  May Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१९ साली ब्रिटीश भारतातील तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कोकण प्रदेशातील आणि कट्टर ख्रिश्चन धर्माचे प्रसिद्ध चित्पावन ब्राह्मण समाजातील एक मराठी कवी नारायण वामन टिळक यांचे निधन.
  • इ.स. १९५९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतातील महाराष्ट्रीयन सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक तसचं, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचे निधन.
  • सन १९५९ साली दक्षिण आफ्रिकेतील हिंदी विषयाचे प्राध्यापक व महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय तसचं, राष्ट्रवादी, हिंदी आणि आर्य सामाजीक भारतीय स्वामी भवानी द्याल संन्यासी यांचे निधन.
  • इ.स. १९८६ साली माउंट एवरेस्ट आणि हिमालय पर्वत या सारख्या उंच पर्वतांचे शिखर सर करणारे पहिले गीर्यरोहक व्यक्ती तेन्जिंग नॉरगे यांचे निधन.
  • सन १९९५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल मिश्र प्रभाकर यांचे निधन.
  • इ.स. १९९८ साली प्रसिद्ध भारतीय गझल पार्श्वगायक व अभिनेते तलत महमूद यांचे निधन.
  • सन २००४ साली चेचेन्या येथे झालेल्या विस्फोटात तेथील राष्ट्रपती अखमद कादरोव यांचे निधन.
  • इ.स. २००८ साली हिंदुस्थानी संगीतातील संगीत नाटक पुरस्कार सन्मानित भारतीय किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक फिरोज दस्तूर यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य व आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top