Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

सिंधुदुर्ग जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Sindhudurg Jilha Mahiti

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग!

कोकणातल्या फणसासारखा गोड आणि रसाळ असा जिल्हा सिंधुदुर्ग!

शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अश्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जन्माला घालणारा जिल्हा!

विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभलेला हा जिल्हा.

नेरूर या ठिकाणी काही शिलालेख आढळुन आले त्या शिलालेखावरून येथे कधीकाळी चालुक्यांची सत्ता होती असे उल्लेख आढळतात.

मराठयांच्या अगोदर येथे आदिलशाही राजवट होती.

सिंधुदुर्ग जिल्हा पुर्वी रत्नागिरी जिल्हयाचाच एक भाग होता 1 मे 1981 ला तो स्वतंत्र जिल्हा म्हणुन उदयाला आला.

ऐतिहासीक अश्या किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले.

Sindhudurg District Information in Marathi

सिंधुदुर्ग जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Sindhudurg District Information in Marathi

25 नोव्हेंबर 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीकोनातुन या किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि 3 वर्षांमधे सिंधुदुर्ग किल्ला संपुर्ण बांधुन तयार झाला.

समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि त्याला नामशेष करण्याकरता या किल्ल्याची निर्मीती झाली, या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे हा किल्ला शत्रुला सहजासहजी दिसत नसे अश्या प्रकारे हा बांधण्यात आला आहे.

हा एकमात्र असा किल्ला आहे ज्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे आणि त्यांच्या पंजाची छाप या ठिकाणी पहावयास मिळते.

या जिल्हयात सुमारे 37 किल्ले असुन किल्ल्याचे सर्व प्रकार येथे बघायला मिळतात जसे सागरी जलदुर्ग, भुमीवरचा भुईकोट किल्ला, आणि उंच डोंगरावरचा गिरीदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्हयातील तालुके – Sindhudurg District Taluka List

सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत

  1. सावंतवाडी
  2. कणकवली
  3. कुडाळ
  4. देवगड
  5. दोडामार्ग
  6. मालवण
  7. वेंगुर्ला
  8. वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Satara Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या 8,68,825
  • क्षेत्रफळ 5207 वर्ग कि.मी.
  • एकुण तालुके 8
  • एकुण गावं 752
  • साक्षरतेचे प्रमाण 30%
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 1036
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या जिल्हयातुन गेला आहे.
  • सिंधुदुर्ग च्या पुर्वेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे कर्नाटक राज्यातील बेळगांव आणि गोवा आणि उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्हा 1999 ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा घोषीत करण्यात आला.
  • 121 कि.मी. चा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा या जिल्हयाला लाभलाय…
  • या जिल्हयात अनेक त.हेची रानफुलं आढळतात अभ्यासकांकरता हा अमुल्य असा ठेवा आहे.
  • पर्यटन, मासेमारी, येथील मुख्य व्यवसाय.
  • या ठिकाणी विशेषतः हापुस आंबा, फणस, काजु यांचे विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.
  • सिंधुदुर्ग किल्ल्याला 21 जुन 2010 ला भारत सरकारनं महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन जाहीर केले आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासीक असा किल्ला जणु काही समुद्रात पाय रोवुन उभा असल्यासारखा भासतो.
  • कोकणचे गांधी म्हणुन ज्यांना गौरवलं जातं असे अप्पासाहेब पटवर्धन! सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवलीजवळ गोपुरी या ठिकाणी यांचा आश्रम आहे.
  • रत्नागिरी, बेळगांव आणि गोव्यातील दाभोली ही जवळची विमानतळं आहेत.

तिर्थस्थळं आणि पर्यटन स्थळं – Places to Visit in Sindhudurg District

एकंदरीतच कोकणाला विस्तिर्ण असा समुद्रकिनारा लाभला असल्याने पर्यटनाकरताच हा जिल्हा ओळखला जातो.  फिरण्याकरता तर असंख्य अशी ठिकाणं असुन जी मनाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करतात.

अनेक धार्मीक स्थळं देखील भाविकांकरता महत्वाची असुन येथे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतीच आहे.

  • सिंधुदुर्ग किल्ला – Sindhudurg Fort

ज्या प्राचीन ऐतिहासीक किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले असा सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात आजही भक्कम पणे उभा असलेला आपल्याला पहायला मिळतो

हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीची साक्ष पटवणारा आहे,

समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि समुद्र मार्गांची सुरक्षा करण्याकरता महाराजांनी या किल्ल्याची निर्मीती केली

हा किल्ला बांधण्याकरता साधारण 3 वर्षांचा कालावधी लागला 25 नोव्हेंबर 1664 ला मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 3 वर्षांत हा किल्ला पुर्ण झाला.

या किल्ल्यावर गोडया पाण्याच्या 3 विहीरी पहायला मिळतात (दुधबाव, दहिबाव, आणि साखरबाव अशी या विहीरींची नावे) किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि किल्ल्यात गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला हवा.

किल्ल्याचे निरीक्षण करतांना हा किल्ला आणि त्यावरील बांधकाम किती विचारपुर्वक केले असावे याची साक्ष पटते

ठिकठिकाणी तोफांसाठी नियोजीत जागा, दुरवर अवलोकन करण्याकरता खिडक्या, कपारी, सैनिकांच्या सुरक्षेकरता करण्यात आलेल्या उपाययोजना, समुद्रापर्यंत घेउन जाणारा भुयारी मार्ग हे पाहुन स्तिमीत व्हायला होतं.

किल्ला बांधण्याकरता ज्या मच्छिमारांनी ही जागा शोधली त्यांना गावे ईनाम म्हणुन देण्यात आली.

या किल्ल्यावर एकमेव असे शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापीत करण्यात आले आहे राजाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केली होती.

महाराजांजवळ एकुण 362 किल्ले होते डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांच्या बरोबरीने शत्रुची स्वारी परतवुन लावण्याकरता जलदुर्गांची निर्मीती देखील आवश्यक असल्याचे महाराजांनी हेरले आणि कितीतरी जलदुर्गांची निर्मीती त्यांच्या काळात त्यांनी समर्थपणे केली.

आजची युवा पिढी जेव्हां या किल्ल्यांचे अवलोकन करते तेव्हां त्याकाळातील वास्तुनिर्मीती, स्थापत्यकला, दुरदृष्टीकोन पाहुन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहातात.

या ठिकाणी राहाण्याची सोय गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे होउ शकते त्या ठिकाणी डज्क्ब् ने राहाण्याकरता निवासाची सोय केली आहे.

  • देवगड येथील कुणकेश्वर मंदिर – Kunkeshwar Mandir

शुभ्र वाळुचा समुद्र किनारा अनुभवायचा असेल तर कुणकेश्वर ला यायलाच हवे.

फार प्राचीन असे महादेवाचे मंदिर या ठिकाणी असुन या स्थळाला दक्षिण कोकणाची काशी म्हणुनही फार प्रसिध्दी मिळाली आहे.

येथील शुभ्र किनायावर पाण्यात खेळण्याचा आणि अंघोळ करण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो

येथील समुद्रात असलेल्या डाॅल्फीनचं देखील दर्शन घडण्याची शक्यता जास्त आहे.

येथील समुद्र किनायाची एक संपुर्ण बाजु नारळाच्या आणि आंब्यांच्या झाडांनी वेढलेली असल्याने निसर्गाचं दान या ठिकाणाला भरभरून मिळाल्याचे पदोपदी जाणवते.

येथील स्वच्छ किनारा आणि शुभ्र वाळु नजरेत भरते.

मुंबईपासुन 468 तर पुण्यापासुन कुणकेश्वर हे अंतर 368 कि.मी. असुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ने येथे सहज पोहोचता येते.

कोल्हापुर पासुन हे अंतर कमी आहे.

  • विजयदुर्ग –  Vijaydurg Fort

देवगड येथील विजयदुर्ग हा किल्ला जिल्हयाच्या किनारी असलेला सर्वात पुरातन असा किल्ला असुन 1205 साली शिलाहार घराण्याचे राजा भोज यांनी तो बांधलाय.

पुढे विजापुरच्या आदिलशहाकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली तो जिंकला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले.

1653 ते साधारण 1818 या किल्ल्यावर मराठयांची सत्ता होती पुढे हा किल्ल्यावर इंग्रजांनी ताबा मिळवला.

अजिंक्य अश्या या किल्ल्याला जिब्राल्टर असे देखील म्हंटले जायचे.

17 एकर असा विस्तिर्ण परिसर या किल्ल्याने व्यापला आहे.

किल्ल्याच्या तीनही बाजुने विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला आहे.

या किल्ल्यात आपल्याला दोन भुयारी मार्ग दिसुन येतात किल्ल्याच्या पुर्वेकडे एक आणि पश्चिमेकडे दुसरा भुयारी मार्ग आहे.

महाराष्ट्र राज्यातील संरक्षीत स्मारक म्हणुन 13 डिसेंबर 1916 रोजी हा किल्ला घोषीत करण्यात आला आहे.

विजयदुर्ग पहायचा असल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथुन जाणे सोयीचे होईल. किल्ला पाहाण्याकरता सागरी महामार्गाची सफर सोयीची आणि आल्हाददायक ठरू शकते.

  • तारकर्ली समुद्रकिनारा – Tarkarli Beach

तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचाय का? जर उत्तर हो असेल तर चला तारकर्लीला!

सिंधुदुर्ग ते तारकर्ली समुद्र किना.यापर्यंत साधारण दिड तास लागेल पण येथे आल्यानंतर स्वच्छ पारदर्शक समुद्रकिनारा पाहुन तुम्ही आनंदीत व्हाल.

हा समुद्र किनारा अरूंद किनारपट्टी असुन अरबी समुद्र आणि कर्ली नदी या संगमावर स्थित आहे.

नितांत पारदर्शक आणि स्वच्छ पाणी त्यामुळे हा समुद्र किनारा पर्यटकांमधे फार लोकप्रीय आहे.

तारकर्लीच्या किना.यावर आपण स्नोर्केलींग शिवाय स्कुबा डायव्हींगचा अविस्मरणीय असा अनुभव आपण घेउ शकतो.

येथील मालवणी पदार्थांची चव कायम तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील अशीच.

येथे पोहोचण्याकरता जवळचे बसस्थानक मालवण चे आहे.

आंबोली हिल स्टेशन – Amboli Hill Station

कोकणातले महाबळेश्वर म्हणुन प्रसिध्दी पावलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणुन देखील ओळख मिळवुन आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातले हे पर्यटनस्थळ सावंतवाडी या गावापासुन सुमारे 30 कि.मी. अंतरावर वसलेले आहे.

येथील निसर्ग आणि चांगले हवामान यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खुप आकर्षीत करते.

विस्तीर्ण पसरलेले दाट जंगल, मनाला हवेहवेसे वाटणारे सृष्टीसौंदर्य आणि खोल घाट डोंगरद.या, कोसळणारे धबधबे आणि 12 ही महिने येथील थंड हवामान ही या ठिकाणाची वैशिष्टय आपल्याला अधोरेखीत करता येतील.

जवळच सावंतवाडी येथील राजांचा राजवाडा देखील आहे शिवाय देवीचे मंदिर देखील पहावे असेच.

मनोहरगड, महादेवगड नागरतास धबधबा डोळयाचे पारणे फेडतात, आंबोलीच्या घनदाट जंगलात अनेक वन्यप्राणी मुक्त संचार करतांना दिसतात.

आणखी वाचा:

  • Akola District Information
  • Ahmednagar History Information
  • Amravati District Information

लक्ष्य दया: तुमच्या जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved