Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

नथुराम गोडसेंचा जीवन परिचय

Nathuram Godse

नथुराम गोडसे हे भारत देशाचे एक क्रांतिकारी, राजनेता, सामाजिक कार्यकर्ता, विचारक, पत्रकार, आणि तद्वतच हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य देखील होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे महानायक आणि राष्ट्रवादी नेता महात्मा गांधींची 30 जानेवारी 1948 ला नवी दिल्लीत गोळी मारून हत्या केली होती.

वास्तविक या गुन्ह्याकरता त्यांना मृत्युदंड भोगावा लागला. परंतु त्यांनी गांधीजींची हत्या का केली? नथुराम गोडसेंच्या जीवनाविषयी काही तथ्य मांडणारा हा लेख आपल्याकरता नक्कीच अभ्यासपूर्ण ठरेल.

नथुराम गोडसेंचा जीवन परिचय – Nathuram Godse in Marathi

Nathuram Godse in Marathi

गोडसेंविषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती – Nathuram Godse Biography

पूर्ण नाव (Name) नथुराम ( रामचंद्र ) विनायकराव गोडसे
जन्म (Birthday) 19 मे 1910 बारामती जिल्हा पुणे बॉम्बे प्रेसिडेंस  ब्रिटीश भारत
वडील (Father Name)   विनायक वामनराव गोडसे
आई (Mother Name)लक्ष्मी गोडसे
मृत्यू (Death)  15 नोव्हेंबर 1949 अंबाला जेल, पंजाब  ( गांधीजींच्या हत्येच्या आरोपात फाशी )

नथुराम गोडसेंचा जन्म, कुटुंब आणि सुरुवातीचा काळ –  Nathuram Godse History and Family

नथुराम गोडसेंचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामतीत एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता त्यांचे वडील पोस्ट ऑफिसात कार्यरत होते आणि आई गृहिणी होती. लहानपणी त्यांना रामचंद्र म्हणून हाक मारल्या जाई. नथुराम यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या तीन भावांचा मृत्यू झाला होता आणि बहिण वाचली होती त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी काळजीपोटी नथूरामचे पालन-पोषण एका मुलीप्रमाणे केले इतकेच नव्हे तर त्यांचे नाक देखील टोचले असल्याने त्यांचे नाव नथुराम असे झाले. नथुरामचा लहान भाऊ गोपाळ जेंव्हा जन्माला आला तेंव्हा त्यांच्या आई वडिलांनी सर्वांना नथुराम हा मुलगा असल्याचे सांगितले.

गोडसेचे शिक्षण आणि कारकीर्द – Nathuram Godse Education

नथुराम यांचे सुरुवातीचे शिक्षण बारामती येथेच झाले, पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे पुण्याला पाठवण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले.

आपल्या सुरुवातीच्या काळात गोडसे महात्मा गांधींच्या विचारांनी फार प्रभावित होते, शिवाय गोडसे त्यांना आपला आदर्श मानत. रत्नागिरी येथे जेंव्हा गोडसेंची स्वातंत्र्यवीर सावरकरांशी भेट झाली तेंव्हा त्यांनी राजकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

नथुराम गोडसेंचा राजकीय प्रवास – Nathuram Godse Political Career

  • नथुराम गोडसेंना सुरुवातीपासून सामाजिक कार्याची आवड होती. पुढे-पुढे  मोठ-मोठ्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःला पूर्णपणे समाजकार्यात समर्पित करून दिलं आणि ते हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी( RSS ) जोडले गेले.
  • या संघटनांशी संबंध आल्यावर नथुराम गोडसेंनी मुस्लिम लीग च्या विभाजनाच्या राजकारणाचा जोरदार विरोध केला, त्यांनी मराठी भाषेत ‘अग्रणी ‘ नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले. पुढे हे वृत्तपत्र “हिंदू राष्ट्र” या नावाने प्रसिद्ध झाले.
  • या दरम्यान महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकार विरोधात असहकार आंदोलन छेडले होते, या आंदोलनात गोडसे आणि हिंदू महासभेच्या इतर सदस्यांनी देखील गांधीजींचे समर्थन केले होते. परंतु पुढे गोडसेंनी गांधीजींवर हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचे आणि हिंदू-मुस्लिम लीग मधे भेदभाव करण्याचे गंभीर आरोप लावले आणि गांधीजींच्या विचारांचे प्रखर विरोधी झाले होते.

नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या का केली – Why Nathuram Godse Assassinated Gandhi

नथुराम गोडसे एक महान विचारक, सत्य आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या महात्मा गांधीजींच्या कट्टर अनुयायांपैकी एक होते, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेंव्हा गोडसेंनी गांधीजींच्या विचारधारेत काही असे परिवर्तन पाहीले कि त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले, आणि त्यांनी गांधीजींची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

गोडसेंद्वारा महात्मा गांधींची हत्या करण्यामागील काही प्रमुख कारण अशी आहेत :-

  • भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीकरता गोडसेंनी महात्मा गांधींना जवाबदार मानले, या फाळणीमुळे अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला, अनेक कुटुंब आपल्या माणसांपासून दुरावली…त्यामुळे गोडसेंनी गांधीजींची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
  • गांधीजीद्वारे भारतातील मुस्लिमांचे राजकीयस्वार्थ पूर्ण केल्या जात असल्याचे गोडसेंना वाटत होते आणि ते त्याच्या प्रखर विरोधात होते.
  • गांधीजी हिंदू+उर्दू भाषांना आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा बनविण्याच्या विचारात होते…त्यांच्या या विचाराचे प्रखर विरोधक होते नथुराम गोडसे.
  • गांधीजी मुस्लिमांना अधिकार मिळावेत यासाठी कित्येकदा उपोषणाला बसत असत, कट्टर हिंदुवादी विचारधारेच्या गोडसेंना ही गोष्ट कदापि रुचणारी नव्हती.

या सर्व कारणांमुळे गोडसेंनी 30 जानेवारी 1948 ला संध्याकाळी गांधीजी नेहमीप्रमाणे जेंव्हा सायंकालीन प्रार्थनेला जात होते त्यावेळी त्यांची गोळी घालून हत्या केली. हत्या केल्यानंतर इतर आरोपींप्रमाणे ते पळून न जातं त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. गांधीजींच्या हत्येवेळी नथुराम गोडसें सोबत त्यावेळी नारायण आपटे आणि अन्य 5 जण देखील होते.

गांधीजींच्या हत्येनंतर गोडसेंना मिळाला मृत्युदंड – Nathuram Godse Death

गांधीजींच्या मृत्यूपश्चात गोडसेंवर खटला भरला गेला…जागोजागी विरोध प्रदर्शनं झालीत, संपूर्ण देशात दंगे होऊ लागले, ब्राम्हण-मुस्लिमांमध्ये भयानक युद्ध सुरु झाले, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ब्राम्हणांची घरं जाळण्यात आली. संपूर्ण देशभरात पसरलेल्या गांधी समर्थकांनी या घटनेकरीता भारत सरकारला  दोषी ठरवलं आणि नथुराम गोडसेला फाशी देण्याची मागणी केली.

गोडसेंनी देखील आपला गुन्हा कबुल केला, त्यानंतर कोर्टाने 8 नोव्हेंबर 1949 ला त्यांना  फाशी देण्याची शिक्षा केली.

त्याप्रमाणे 15 नोव्हेंबर 1949 ला नथुराम गोडसेंना उत्तर पंजाब मधील अंबाला जेल मध्ये फासावर लटकविण्यात आलं.

गांधीजींच्या हत्येत सह-आरोपी म्हणून नारायण आपटेंना देखील मृत्युदंड ठोठावण्यात आला.

हिंदू महासभेचे सदस्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर देखील महात्मा गांधींच्या हत्येचे गंभीर आरोप लावण्यात आले होते,

परंतु पुढे त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.

गोडसेंनी गांधींची हत्या केल्यानंतर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अवैध घोषित करण्यात आले होते, परंतु जेंव्हा RSS चा गांधींच्या हत्येशी काहीही संबंध नाही हे सिद्ध झाले त्यावेळी भारताचे पहीले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1949 ला या दोन्ही संघटनांवरील निर्बंध हटवले

फाशीच्या वेळी नथुराम गोडसेंनी – Nathuram Godse Statement

ही इच्छा व्यक्त केली होती की जोवर भारत-पाकिस्तान एक होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थींचे विसर्जन केल्या जाऊ नये,

आणि नंतर त्या अस्थी सिंधू नदीत विसर्जित केल्या जाव्यात.

गोडसे लिखित पुस्तक – Nathuram Godse Book

नथुराम गोडसेंनी कारागृहात असतांना “व्हाय आई किल्ड गांधी” हे पुस्तक लिहिलं, या पुस्तकात त्यांनी गांधीजींना मारण्याच्या कारणांसंबंधी लिहिलंय. परंतु हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही.

नथुराम गोडसेंवरील चित्रपट – Nathuram Godse Movie

देशभक्त नथुराम गोडसेंवर एक डॉक्युमेंट्री बनविण्यात आली होती, या चित्रपटाला 2015 साली महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीला प्रदर्शित करण्यात आले.

कट्टर हिंदुवादी विचारधारेचे नथुराम गोडसे हे सुरुवातीला महात्मा गांधींचे समर्थक होते,

परंतु पुढे भारत-पाक फाळणी, मुस्लिमांना अधिकार देण्यासाठी गांधीजींचे उपोषण, आणि गांधीजींच्या विचारधारेतील अन्य बदल बघता त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली.

काही लोकांनी नथुराम गोडसेंच्या या निर्णयाचे समर्थन केले तर काही लोकांनी याचा प्रखर विरोध देखील केला…

त्यामुळे नथुराम गोडसेंची प्रतिमा सच्चा देशभक्त आणि आतंकवादी अशी दोन्ही स्वरुपाची निर्माण झाली…

वरील संपूर्ण माहितीचे लिखाण आम्ही, वाचलेल्या पुस्तकांच्या माहितीच्या आधारावर केले आहे.

जरी आपणास यात कोणतीही चूक आढळून आल्यास आम्हाला कळवा. तसचं, आपणाकडे आणखी काही माहिती असल्यास आम्हाला सांगा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved