Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

24 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा खेळ प्रेमिसाठी खूप महत्वाचा दिवस आहे.

आज क्रिकेटच्या विश्वातील देव म्हणून मानले जाणारे महान दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिन. तसचं, आज प्रख्यात मराठी गानसम्राट दिनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिन. शिवाय, आपण आज या लेखाच्या माध्यमातून काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती (24 April Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 24 April Today Historical Events in Marathi

24 April History Information in Marathi

२४ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 April Historical Event

  • इ.स. १६७४ साली भोर-वाई प्रांतातील केंजळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली व तो गड आपल्या ताब्यात घेतला.
  • सन १७१७ साली मराठा साम्राज्याचे सेनापती वीर खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे झालेल्या लढाईत मोघलांचा पराभव केला.
  • इ.स. १८०० साली अमेरिकेतील सर्वात जुनी फेडरल सांस्कृतिक संस्था लायब्ररी ऑफ कॉंग्रेस या संशोधन लायब्ररी(ग्रंथालय) ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६७ साली सोव्हिएट चाचणी पायलट, एरोस्पेस (अंतराळयान) अभियंता आणि अवकाशयात्री व्लादिमीर मिखायलोविच कोमेरोव्ह हे अवकाशातून खाली येत असतांना त्यांचे पॅराशूट न उघडल्यामुळे ते उल्काच्या गतीप्रमाणे पृथ्वीवर कोसळले व त्यांच निधन झालं.

२४ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८९ साली स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटीश सरकारने पाठविलेल्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्मदिन.
  • सन १८९६ साली महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक लेखक, कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१० साली प्रख्यार भारतीय चित्रपट अभेनेते राजा परांजपे यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली पद्मभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक, पत्रकार, वक्ते, चित्रपट-निर्माता, समीक्षक आणि कार्यकर्ते डी. जयकांत यांचा जन्मदिन
  • इ.स. १९४१ साली उर्दू अकादमीचे माजी अध्यक्ष अजीज कुरेशी यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारताच्या छत्तीसगड राज्यातील पहिल्या महिला कलाकार आणि गायिका तीजनबाई यांचा जन्मदिन
  • इ.स. १९५६ साली सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश तसचं, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठाचे कुलपती शरद अरविंद बोबडे यांचा जन्मदिन.
  • सन १९७३ साली भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न सन्मानित महान भारतीय क्रिकेटपटू तसचं, मास्टर ब्लास्टर म्हणून आपली ओळख निर्माण करणारे दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिन.

२४ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 April Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४२ साली प्रख्यात भारतीय महाराष्ट्रीयन मराठी रंगमंच अभिनेते, प्रसिद्ध नाट्यसंगीत संगीतकार तसचं, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतज्ञ व गायक शिवाय, प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खांडेकर, उषा मंगेशकर आणि संगीत सम्राट हृदयनाथ मंगेशकर यांचे वडिल मास्टर दिनानाथ मंगेशकर याचं निधन.
  • इ.स. १९४४ साली दूरदर्शी, परोपकारी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, ‘दैनिक आज’ या हिंदी वृत्तपत्राचे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचे निधन.
  • सन १९६० साली महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू सभेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण बळवंत भोपटकर उर्फ अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
  • इ.स. १९७२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रकार व रवींद्रनाथ टागोर यांच्या सर्वात प्रिय विद्यार्थ्यांपैकी एक जेमिनी रॉय यांचे निधन.
  • सन १९७४ साली ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी कवी, निबंधकार, देशभक्त आणि शैक्षणिक वर्णन रामधारी सिंह यांचे निधन.
  • इ.स. १९९४ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती तसचं, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन.
  • सन १९९९ साली प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर सुधेंदु रॉय यांचे निधन.
  • इ.स. २००९ साली प्रख्यात भारतीय लेखक, कवी व वक्ता तसचं, धार्मिक नेता महात्मा रामचंद्र वीर यांचे निधन.
  • सन २०११ साली आध्यात्मिक गुरु सत्यनारायण राजू उर्फ सत्य साईबाबा यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved