Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

  30 April Dinvishesh

मित्रानो, आजाची तारीख ही विश्वविख्यात जर्मन क्रूर शासक अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्या मृत्यूच्या रुपात जगाच्या नकाशावर नोंदली गेली आहे. ३० एप्रिल १९४५ साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोवियत राष्ट्रांच्या सैन्यांनी जर्मन शासक अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना बर्लिन येथे घेराव घातल्यानंतर त्यांनी जमिनीच्या खाली ५० फुट खोल असलेल्या बंकरमध्ये दडून असतांना स्वत:ला व आपल्या पत्नी ईवा ब्राऊन यांना गोळी मारून आत्महत्या केली. दुसऱ्या महायुद्धातील इतिहास काळात घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे.

याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवशी असलेल्या काही महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिन, निधन, त्यांचे शोधकार्य आदि घटनांची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 30 April Today Historical Events in Marathi

30 April History Information in Marathi
30 April History Information in Marathi

३० एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 April Historical Event

  • इ.स. १६६७ साली मुघलकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर स्वारी करून भरमसाठ लुट केली.
  • सन १७८९ साली वीर अमेरिकन सेनानी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या नेतृत्वात ब्रिटीश शासकाविरुद्ध विजय संपादन करून अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून दिल व ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.
  • इ.स. १९३६ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात वास्तव्यास असतांना त्यांनी वर्ध्याजवळील सेवाग्राम या गावी आपल्या निवास्थानाकरिता सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली.
  • सन १९७७ साली भारताच्या नऊ राज्यांमधील विधानसभा बरखास्त करण्यात आली. तसचं, जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कॉंग्रेस आणि भारतीय लोकदल पक्षांनी एकत्रित येऊन एक नवीन ‘जनता पक्ष’  स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • इ.स. १९९५ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बिल क्लिंटन हे उत्तर आयर्लंड देशाला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.
  • सन १९९६ साली पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी स्थित असलेल्या चिंतामणी गणपतीच्या मंदिराच्या परिसरातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन केले गेले.
  • इ.स. २००९ साली अमेरिकेतील “बिग थ्री” ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेल्या क्रिस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • सन २०१३ साली  नेदरलँड देशाच्या महाराणी बीट्रिक्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विल्यम अलेक्झांडर हे नेदरलँड्स देशाचे नवीन राजा बनले.
  • इ.स. २०१७ साली नेपाल देशातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

३० एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७० साली भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडाईज गोविंद फाळके यांचा जन्मदिन.
  • सन १८९६ साली आध्यात्मिक गुरु मां आनंदमयी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०९ साली माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन.
  • सन १९१० साली आंध्र क्रांतिकारक लेखक संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्री. श्री यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय संगीतकार व संगीत दिग्दर्शक श्रीनिवास विनायक खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली भारतीय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला व पहिल्या मुस्लीम न्यायाधीश एम. फतिमा बीवी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९४९ साली पोर्तुगीज देशाचे माजी पंतप्रधान व राजकारणी आणि मुत्सद्दी तसचं, संयुक्त राष्ट्राचे माजी (९ वे) महासचिव अँटोनियो मॅन्युएल डी ऑलिव्हिएरा गुटेरेस यांचा जन्मदिन.
  • सन १९८७ साली अर्जुन पुरस्कार व आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर आणि आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू व धडाकेबाज फलंदाज व भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे उप-कर्णधार रोहित शर्मा यांचा जन्मदिन.

३० एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 April Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १०३० साली अफगाणीस्तान मधील गजनवी वंशाचे संस्थापक व शासक सुलतान मेहमूद गजनवी यांचे निधन.
  • सन १९१३ साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन.
  • इ.स. १९४५ साली जर्मन देशाचे हुकुमशहा, राजकारणी आणि नाझी पक्षाचे नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे निधन झाले.
  • सन २००१ साली जमनालाल बजाज पुरस्कार सन्मानित श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन.
  • इ.स. २००३ साली महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मानित प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कथाकथनकार, आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत पोतदार यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय हिंदी अभिनेत्या अचला सचदेव यांचे निधन.
  • इ.स. २०१४ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रकार व रंगमंच आयोजक(डिझायनर) खालिद चौधरी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved