Tuesday, August 26, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भीमा नदीची माहिती

Bhima Nadi

सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला. भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

भीमा नदीची माहिती – Bhima River Information in Marathi

Bhima River Information in Marathi
Bhima River Information in Marathi
नदीचे नावभीमा
उगमस्थानभीमाशंकर, जि. पुणे, (महाराष्ट्र)
उपनद्याइंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, माण, घोड, सीन
नदीची लांबी861 कि.मी.
नदीच्या खोऱ्याचा आकार70614 चौरस किमी.
नदीवरील प्रकल्प उजनी धरण (यशवंतसागर), ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम आहे. भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

भीमाशंकर येथे एक हजार मीटर उंचीवर उगम पावल्यावर ती वाहत-वाहत सपाट प्रदेशात येते. पूर्ववाहिनी असलेली भीमा नदी महाराष्ट्रात साडेचारशे किलोमीटर वाहून पुढे कर्नाटक राज्यातील रायचूर येथे कृष्णा नदीस मिळते.

दक्षिणेकडील महादेवाचे डोंगर व उत्तरेकडील बालाघाटचे डोंगर यांच्यामधील प्रदेशात भीमा नदीचे खोरे पसरलेले आहे.

मुळा-मुठा, भामा, इंद्रायणी, माण, घोड आणि सीना या नद्या येऊन मिळाल्याने भीमेचे पात्र रुंद होत गेले आहे. उगम पावल्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरापर्यंत भीमा अरुंद पात्रातून वाहते. प्रथम भीमा नदी मिळाल्यानंतर तुळापूरजवळ इंद्रायणी नदी भीमेस मिळते.

मुळा-मुठा रांजणगावाजवळ मिळतात; तर पुढे घोड नदीही भीमेच्या भेटीस येऊन तिच्यात विलीन होते. भीमेचा पुढील प्रवास पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून होतो.

नंतर तिला नीरा नदी नरसिंहपूर जवळ येऊन मिळते. अनेक नद्यांचे पाणी पोटात घेऊन भीमा सोलापूर जिल्ह्यातून वाहत-वाहत पंढरपूरला येते.

पंढरपुरात या नदीचा आकार चंद्रासारखा दिसतो त्यामुळे येथे तिला चंद्रभागा असे म्हणतात.

याच भीमेच्या (चंद्रभागेच्या) तीरी विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रभरातून लोक दर्शनासाठी येत असतात.

सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करताना भीमा नदीला सीना नदी येऊन मिळते.

इंदापूरजवळ भीमा नदीवर ‘उजनी’ नावाचे मोठे धरण बांधण्यात आले आहे.

या धरणामुळे सिंचन, पिण्याचे व उद्योगासाठी पाणीपुरवठा या सोबतच मत्स्यपालन आणि इ. लाभ या धरणाच्या माध्यमातून मिळतात. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना शेतीच्या सिंचनासाठी चांगलाच फायदा झालेला आहे.

या धरणाला सुमारे शंभरपेक्षा जास्त किलोमीटर लांबीचे डावा-उजवा कालवा दोन्ही तीरांवरून काढला आहे.

त्यामुळेच या परिसरात जणू समृद्धीची गंगाच भीमेच्या पाण्याच्या रूपाने येऊन शेतकऱ्यांची भाग्यदायिनी ठरली आहे.

भीमा नदी विषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Bhima River 

प्रश्न. भीमा नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: भीमाशंकर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

प्रश्न. भीमा नदीवरील धरण कोणते?

उत्तर: उजनी (यशवंतसागर), ता. माढा, जि. सोलापूर.

प्रश्न. उजनी धरणाचा कोणत्या तीन जिल्ह्यांना फायदा होतो?

उत्तर: पुणे, सोलापूर, अहमदनगर.

प्रश्न. पंढरपूर येथे भीमा नदी काय नावाने ओळखली जाते?

उत्तर: चंद्रभागा.

प्रश्न. भीमा नदी कोणाची उपनदी आहे?

उत्तर: कृष्णा नदी.

प्रश्न. भीमा नदी महाराष्ट्रातून कोणत्या दुसऱ्या राज्यात प्रवेश करते?

उत्तर: कर्नाटक.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved