• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Viral Topics

महाराष्ट्रातील अनोख्या परंपरा

Unique Traditions

टोमॅटो फेस्टीव्हल तुम्हाला माहीती आहे का?

स्पेन मधील टोमॅटो फेस्टीव्हल फार फेमस आहे. पुर्ण स्पेन उत्सवाच्या दिवशी रस्त्यावर उतरतं आणि एकमेकांना टोमॅटो मारून लाल करतं.

पुर्ण शहर तेव्हा लालेलाल झालं असतं.

असे विविध उत्सव आणि परंपरा यामुळे देखील ती ठिकाणं ओळखली जात असतात.

महाराष्ट्रातील अनोख्या परंपरा – Unique Festivals of Maharashtra in Marathi

festivals of maharashtra

अश्याच महाराष्ट्रातल्या काही परंपरांबद्दल या लेखात आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया,

नागपुर येथील मारबत परंपरा – Marbat Tradition In Nagpur

नागपुर शहर महाराष्ट्राची उपराजधानी तर आहेच शिवाय संत्र्याकरता सुध्दा खुप प्रसिध्द आहे.

हे शहर एका पुर्वापार चालत आलेल्या परंपरेकरता पण ओळखलं जातं… मारबत परंपरा. हा उत्सव साजरा करण्याकरता लाखो लोक उत्साहाने रस्त्यावर येतात.

मारबत उत्सव संपुर्ण भारतात फक्त नागपुर येथेच साजरा केल्या जातो.

भगवान श्रीकृष्णाने गोकुळात कंसाने पाठवलेल्या पुतना ला ठार मारल्यानंतर गावातील नागरिकांनी तिला गावाबाहेर नेउन जाळले होते त्यामुळे त्या गावावरील अरिष्ट टळले. आज नागपुरात साजऱ्या होणाऱ्या या मारबत परंपरेला त्या आख्यायिकेशी जोडुन पाहिल्या जाते.

काळी आणि पिवळी मारबत संपुर्ण शहरात फिरवल्यानंतर गावाबाहेर नेउन तिला जाळण्यात येते असे केल्याने गावावरचे अरिष्ट टळते अशी शहरवासियांची धारणा आहे.

या मारबतीची मिरवणुक शहरातुन निघत असतांना जोरजोरात अरिष्ट आणि नको असलेल्या गोष्टींचा नामोल्लेख करून घेउन जा ओ मारबत असे ओरडतात. या काळया आणि पिवळया मारबत सोबत एक बडग्या देखील असतो,

त्याला एखाद्या राजकारण्यासारखे रूप दिले जाते आणि त्यावर भ्रष्टाचार, महागाई, रोगराई, असे नाव लावलेले आपल्याला पहायला मिळतात.

मारबत ही परंपरा स्वातंत्र्यपुर्व काळापासुन सुरू आहे जवळजवळ १३० वर्षांपासुन ही परंपरा या नागपुर शहरात साजरी केली जाते

पुर्वी इंग्रजांना चिडवण्याकरता आणि डिवचण्याकरता मारबत या उत्सवाचा उपयोग करून घेण्यात येत असे.

अकोल्याची कावडयात्रा – Akola’s Special Kavadyatra

भक्ती श्रध्दा आणि शक्तीचा अनुपम असा संगम अनुभवायचा असल्यास अकोला येथील कावडयात्रा पाहायला हवी,

श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी अकोट तालुक्यातील धारगड येथील महादेवाची यात्रा आटोपल्यानंतर अकोल्याचे आराध्यदैवत श्री राजराजेश्वराला शेवटच्या सोमवारी जलाभिषेक करण्याची परंपरा पुर्वापार चालत आलेली आहे.

दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी साजरा होणारा हा कावड महोत्सव एकीचे उत्तम उदाहरण आहे.

१५ कि.मी. दुर जाउन पुर्णा नदीवरून पाणी आणुन अकोल्याचे आराध्यदैवत श्री राजराजेश्वरला त्या पाण्याने स्नान घालण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासुन चालत आलेली आहे.

कावड मंडळातील सदस्यांची संख्या १००० सदस्यांपर्यंत देखील पहायला मिळते.

प्रत्येक मंडळातील सदस्यांचा गणवेश एक सारखाच असतो. रात्रभर अनवाणी पायी जाऊन कावडधारी पहाटे अकोला नगरीत प्रवेश करतात आणि वाजत गाजत राजेश्वराला जलाभिषेक करतात.

असंख्य पाण्याच्या घागरी खांदयावर आणणे अतिशय अवघड काम परंतु श्रध्दा आणि भक्तीच्या बळावर कावडधारी महादेवाचे नाव घेत घेत वर्षानुवर्षे ही परंपरा पार पाडतायेत. अकोल्यातील डाबकी रोड भागातील कावडधारी युवक तर ५०० घागरी एवढया दुरून पाण्याने भरून आणतात आणि महादेवाला जलाभिषेक करतात.

अकोल्यातील ही कावडयात्रा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असुन ती पाहाण्याकरता हजारो लोक या ठिकाणी एकत्र येतात.

नाशिकची रंगपंचमी – Rang Panchami Of Nashik

होळी नंतर दुसऱ्या दिवशी धुळवड हा सण सर्वदुर अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावुन सर्व राग लोभ विसरण्याची ही परंपरा हिंदु संस्कृतीत पुर्वीपासुन चालत आलेली आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या काळात होळी पासुन सुरू झालेला हा उत्सव पुर्ण पाच दिवस साजरा होत असे. पण जेव्हां हा धुळवडीचा उत्सव साजरा झाल्यानंतर सर्वत्र शांतता पसरते त्या नंतर रंगपंचमी चा जोश चढतो तो नाशिक शहराला!

हो हे खरे आहे! जेव्हां संपुर्ण भारत धुळवड साजरी करतो तेव्हां या शहरात सणाची हालचाल देखील पहायला मिळत नाही. पण होळी नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी होते ती नाशिक शहरात चौकाचौकात मोठ-मोठे पाण्याचे हौद ठेवण्यात येतात (काही ठिकाणी तर कायम स्वरूपाचे हौद बनवण्यात आले आहेत).

या हौदात रंग टाकण्यात येतात आणि दिसेल त्याला त्या हौदात बुडवुन रंगवण्यात येते.

नाशिक शहराची ही परंपरा फार पुर्वीपासुन चालत आलेली असुन ही परंपरा या शहराची ओळख बनली आहे.

सिध्देश्वराच्या यात्रेतील अनोखी परंपरा आणि अनोखा नवस – Unique Traditions Of Siddhaswara

सोलापुर जिल्हयातील शेटफळ या गावी चैत्र महिन्यात सिध्देश्वराची यात्रा भरते. पाच दिवस हा उत्सव मोठया थाटामाटात गावकरी साजरा करतात.

या उत्सवाकरता चाकरमानी माणसं दरवर्षी न चुकता आपल्या गावी या उत्सवाकरता एकत्र येतात. या उत्सवादरम्यान एक अनोखी परंपरा आज देखील मोठया भक्तीभावाने पाळली जाते.

ज्या जोडप्याला मुलबाळ होत नाही ते या सिध्देश्वराला नवस बोलतात आणि बाळ झालं की हा नवस पुर्ण करावा लागतो. हा अनोखा नवस वाचुन तुम्ही देखील अचंबीत व्हाल.

मुल झालेल्या जोडप्यानं आपलं मुल तेथील सेवाकाजवळ दयायचे, तो ते मुल घेउन मंदीराच्या वर कळसाजवळ जाणार आणि तिथुन ते मुल फेकणार आणि खाली उभ्या असलेल्या जोडप्याने ते मुल आपल्या झोळीत झेलायचे.

ही अनोखी परंपरा कित्येक वर्षांपासुन या ठिकाणी चालत आलेली आहे. हा नवस पुर्ण करतांना योग्य ती खबरदारी घेतली जाते. पण खरच आहे नां हा अनोखा नवस!

धुळे जिल्हयातील पिंपळनेरची ही अनोखी परंपरा ऐकलीये तुम्ही? – Unique Traditions Of Pimpalner

दरवर्षी पोळा साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील युवक ही अनोखी परंपरा साजरी करतात.

सुमारे १९० वर्षांपासुन ही अनोखी परंपरा आजतागायत सुरू आहे.

चेहऱ्यावर चढवायचे हे मुखवटे भाडयाने भेटतात हे मुखवटे घरी आणुन पाटावर मांडले जातात अंडे आणि लिंबु वाहुन त्याची पुजा केली जाते आणि त्यानंतर ते चेहऱ्यावर चढवले जातात.

वेगवेगळे सोंग घेउन चेहयावर मुखवटे चढवायचे,मेकअप करून वाजत गाजत हे सोंग येथील विठ्ठल मंदिरात आणले जाते तेथे किर्तन सुरू असते पण त्या किर्तनाला मधात ब्रेक देऊन ५ ते ७ मिनीटे हे सोंग दाखविले जाते.

उदा. खंडेराव हे सोंग घेउयात यामध्ये खंडोबा,म्हाळसा,बानु आणि पोलीस अशाप्रकारे कलाकार असतात. कालिंका महादेव सोंग यामध्ये २ राक्षस १ देवी आणि १ नवरदेव अशाप्रकारे कलाकार असतात,

प्रत्येक मंडळात एक म्होरक्या, पाच सात कलाकार सोबतच चंदा गोळा करणे, गर्दी नियंत्रीत करणे अशी एकुण १५ ते २० युवकांची टिम असते.

यामधे सर्वच पुरूष कलाकार असतात, महिलांच्या वेशातील देखील पुरूष कलाकार असतात.

वाजत गाजत गर्दीच्या ठिकाणी हा कार्यक्रम केला जातो.

सोंगामध्ये सहभागी कलाकारांच्या प्रत्येक घरातील महिला या कलाकारांना ओवाळतात आणि सोंगाची सांगता होते.

Editorial team

Editorial team

Related Posts

Tortoise Information in Marathi
Aquatic Animal Information

कासवाची संपूर्ण माहिती

Kasav chi Mahiti मला वाटतं, असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने आपल्या बालपणात ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली नसेल, जर...

by Vaibhav Bharambe
April 10, 2022
TV cha Shodh Koni Lavla
Information

“टिव्ही” चा शोध कसा लागला आणि त्याचा निर्माता कोण?

आपण पाहातो की आज पर्यंत जगभरात नेहमीच नवनवीन शोध लागत आले आहेत सध्या सुध्दा ब.याच बाबींवर संशोधन सुरू आहे, नवनवीन...

by Editorial team
October 24, 2020
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved