Wednesday, August 27, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

कृष्णा नदीची माहिती

Krishna Nadi chi Mahiti Marathi

Krishna River Information in Marathi
Krishna River Information in Marathi

कृष्णा नदीची माहिती – Krishna River Information in Marathi

नदीचे नाव कृष्णा
उगमस्थानजोर, महाबळेश्वर, जि. सातारा (महाराष्ट्र).
राज्यक्षेत्रदूसरा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रप्रदेश.
नदीच्या खोऱ्याचा आकार 258,948 चौरस किलोमीटर.
उपनद्यावारणा, कोयना, पंचगंगा, भीमा या प्रमुख उपनद्या.
कृष्णा नदीवरील प्रकल्पधोम, ता. वाई, जि. सातारा (महाराष्ट्र), अलमट्टी (कर्नाटक), श्रीशैलम व नागार्जुन सागर (आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांच्या सीमेवर)
लांबी1400 कि.मी. (महाराष्ट्रातील 282कि.मी.)

कृष्णा ही महाराष्ट्रातील एक मोठी, महत्त्वाची आणि लोकांच्या आदरास पात्र असणारी लोकप्रिय नदी आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील निसर्गरम्य पर्वतराजीत कृष्णा नदी उगम पावली आहे.

कोयना, वारणा आणि पंचगंगा या मोठ्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत.

महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतून वाहत नदीचा प्रदेश सुपीक आणि समृद्ध करीत कर्नाटक, आंध्र राज्यातून प्रवास करीत पूर्वेकडील बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

कृष्णा नदीचे उगमाजवळचे पात्र अरुंद आहे. पुढे तीर्थक्षेत्र वाईजवळून वाहताना तिचे पात्र रुंद झालेले दिसते. येथे कृष्णा संथ गतीने वाहते.

कोयना ही कृष्णेची उपनदी क-हाड शहराजवळ कृष्णेस मिळून त्यांचा ‘प्रीतिसंगम’ झाला आहे.
‘प्रीतीसंगम’ हे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे.

पुढे कृष्णेचे पात्र रुंद होत सांगली शहराजवळून ती पुढे वाहते. पुढे तिला वारणा नदी येऊन मिळते.

दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरजवळून वाहणारी पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कुरुंदवाडजवळ नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे कृष्णेशी एकरूप होते.

वाई, कराड, सांगली ही कृष्णातीरावरची प्रसिद्ध अशी शहरे आहेत. कृष्णातीरावर अनेक गावांच्या ठिकाणी सुंदर घाट बांधलेले आहेत.

कराड, सांगली ही शिक्षण व व्यापार- क्षेत्रात प्रसिद्ध असलेली शहरे कृष्णाकाठीच वसली आहेत.

कृष्णा नदी विषयी वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Krishna River

प्रश्न. कृष्णा नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळील डोंगररांगा, जि. सातारा.

प्रश्न. कोयना-कृष्णा नदीचा ‘प्रीतीसंगम’ कोठे आहे ?

उत्तर: ता. कऱ्हाड, जि. सातारा.

प्रश्न. कृष्णा-पंचगंगा संगम कोठे आहे?

उत्तर: नृसिंहवाडी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

प्रश्न. कृष्णा नदी कोणत्या तीन राज्यातून वाहते?

उत्तर: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्यातून.

प्रश्न. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा कोणत्या ठिकाणी संगम आहे?

उत्तर: नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved