मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे

Makarand Anaspure

आपल्या वेगळया अभिनयामुळे आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीमुळे मकरंद अनासपुरे मराठी रसिकांच्या गळयातील ताईत बनलाय. आकाशाला गवसणी घातलेल्या या कलाकाराची नाळ मात्र जमिनीशी घट्ट जोडलेली आहे.

सहसा आपल्याला पहायला मिळतं की गॉडफादर असल्याशिवाय हिंदी असो वा मराठी, या चित्रपट सृष्टीत पाय रोवणं तसं सहजसोपं मुळीच नाही आणि अश्या या चित्रपट सृष्टीत मराठवाडयातल्या एका सर्वसामान्य कुटूंबातुन येत या मायानगरीत आपली ओळख निर्माण करणा.या या कलावंताचे कौतुक व्हायलाच हवे.

Makarand Anaspure

मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे – Makarand Anaspure

नाव: मकरंद मधुकर अनासपुरे
जन्म: 22 जुन 1973
जन्मस्थळ: औरंगाबाद, महाराष्ट्र
व्यवसाय: चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक
पुरस्कार: बाल गंधर्व, स्टार स्क्रीन, झी गौरव,
ग.दि. माडगुळकर कलागौरव पुरस्कार आणि इतर

अभिनयाची सुरूवात – Makarand Anaspure Information

मकरंद अनासपुरे हा अभिनेता मराठवाडयातील असुन औरंगाबाद येथे स.भु महाविद्यालयात त्यांनी नाटयशास्त्र विभागात अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्याने कॉलेज जिवनात अनेक नाटकांमधे त्यांनी आपली ही आवड पुर्ण केली.

खरंतर त्यावेळेस त्यांच्या मनात देखील आले नाही की आपण एक दिवस मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावंत होऊ.

चित्रपट सृष्टीत प्रवेश – Makarand Anaspure Career

सुरूवातीला चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मिळतील त्या भुमिका वठविल्या पण त्या भुमिकांचे देखील कौतुक झाले.

प्रत्येक चित्रपट आपल्याला केंद्रस्थानी ठेवुन तयार व्हावा अशी ईच्छा न बाळगता हातात येईल त्या भुमिकेचे प्रामाणिकपणे सोने करण्याचे त्यांनी ठरविले आणि तसे वागत गेले.

खरंतर त्यांच्यासारखी बोलण्याची शैली त्यासुमारास चित्रपटसृष्टीत कुणाचीच नसल्याने देखील त्यांचे वैशिष्टय कायम राहीले. प्रेक्षकांना त्यांच्या तोंडचे संवाद विशेष आवडत असत आणि अभिनय तर चांगला होताच त्यामुळे ’सोने पे सुहागा’ अशी बात बनली आणि हा कलावंत सगळयांच्या गळयातील ताईत ठरला.

मकरंद अनासपुरे यांचे मराठी चित्रपटसृष्टीत अश्यावेळी पदार्पण झाले ज्यावेळी या फिल्म इंडस्ट्रीला अश्या कलावंताची खरी गरज होती त्याचे कारण पाहिल्यास त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अकाली निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत हुकुमाचा एक्का असा विनोदी कलावंत उरला नव्हतां.

नाही म्हणायला अशोक सराफ, सचिन पिळगांवरकर यांचे चित्रपट अधुन मधुन येत होते परंतु मराठी इंडस्ट्रीला तेव्हां उतरती कळा लागली होती असे नाईलाजाने म्हणावेच लागते. त्या सुमारास नव्या विनोदाची आणि नव्या कलावंताची मराठी चित्रपटसृष्टीला फार गरज होती.

आज मकरंद अनासपुरे नावाचं हे खणखणीत नाणं चांगलच वाजलयं, गाजलयं, कोणत्याही भुमिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडण्याचं अंगभुत कौशल्य त्यांच्यात आहे.

मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट – Makarand Anaspure Movies

कायद्याचं बोला, जाउ तिथे खाउ, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, तुक्या तुकविला नाग्या नागविला, गाढवाचं लग्नं, नाथा पुरे आता, नागपुर अधिवेशन, पारध, असा मी तसा मी, डॅंबीस, नाना मामा, सगळे करून भागले, अगडबम, बापरे बाप डोक्याला ताप, फुल 3 धमाल, दे धक्का, अंगारकी, सरकारनामा, सातच्या आत घरात, सावरखेड: एक गाव, नऊ महिने नऊ दिवस, खबरदार, शुभमंगल सावधान, तुला शिकवीन चांगलाच धडा, साडे माडे तिन, जबरदस्त, फुल 3 धमाल, आॅक्सिजन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, निशाणी डावा अंगठा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, उलाढाल, अरे देवा, हापुस, डावपेच, गुलदस्ता.

नाम फाउंडेशन – Naam Foundation

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नावातील आद्याक्षराने (नाम फाउंडेशन) या दोघांनी सोबतीने एका सामाजिक संस्थेची पायाभरणी केली. आत्महत्या केलेल्या शेतक.यांच्या विधवांकरीता, कुटंुबाकरीता आणि एकुणच शेतक.यांकरीता कार्य करणारी महाराष्ट्रातील ही एक संस्था आहे.

हे पण नक्की वाचा: 

लक्ष्य दया : तुमच्या जवळ मकरंद अनासपुरे बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा मकरंद अनासपुरे यांचे जीवन Makarand Anaspure in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.

नोट : Makarand Anaspure Biography – मकरंद अनासपुरे यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here