Wednesday, July 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

16 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा ब्रिटीश कालीन भारतात घडलेल्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी सन १८५३ साली भारतात इंग्रज सरकारने सर्वप्रथम मुंबई येथील विटी (छत्रपती शिवाजी टर्मिनल)  ते ठाणे या दोन शहरा दरम्यान रेल्वे धावली.  तसचं, आजचा दिवस हा एका विशेष व्यक्तीचा जन्मदिन म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर सर्व जगाला खदखदून हसवणारे विनोदी कलाकार चार्ली चाप्लीन यांचा जन्मदिवस.

या व्यतिरिक्त आपण या लेखात काही विशेष व्यक्तीचे जन्मदिवस, निधन तसचं काही महत्पूर्ण घटना आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 16 April Today Historical Events in Marathi

16 April History Information in Marathi

१६ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –16 April Historical Event

  • इ.स. १८५३ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिली रेल्वेगाडी तत्कालीन बोरीबंदर (छत्रपती शिवाजी टर्मिनल)  ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यात आली.
  • सन १९१९ साली पंजाब मधील अमृतसर येथे झालेल्या जालीयनवाला बाग हत्याकांड प्रकरणी निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशी उपवास करण्याची घोषणा केली होती.
  • इ.स. १९२२ साली मुळशी सत्याग्रह सुरु झाला.
  • सन १९४८ साली राष्ट्रीय छात्र संघाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९९५ साली देशातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • सन १९९९ साली भारताच्या ओडिसा राज्यातील चांदीपूर या ठिकाणी चालकरहित ‘निशांत’ विमान व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • इ.स. २०१३ साली इराण या देशांत झालेल्या भूकंपामुळे ३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

१६ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८४८ साली ब्रिटीश कालीन भारतातील मद्रास येथील समाजसुधारक राव बहादुर कंदुकुरी वीरेसलिंगम पंतुलू यांचा जन्मदिन.
  • सन १८६७ साली ऑरविल राईट यांच्या सोबत विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८९ साली इंग्रजी पुस्तक अभिनेता, चित्रपट निर्माता व संगीतकार सर चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन यांचा जन्मदिन.
  • सन १८९६ साली मद्रास विद्यापीठातील पुरातत्व शास्त्राचे माजी प्राध्यापक विष्णमपेट आर. रामचंद्र दीक्षित यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२५ साली भारतीय मुत्सद्दी, चित्रकार, छायाचित्रकार आणि लेखक मदनजीत सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली भारतातील उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल व राजकारणी तसचं, बीजेपी पक्षाचे सदस्य राम नाईक यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९७८ साली भारतातील माजी विश्व सुंदरी व चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्मदिन.

१६ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 April  Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८५० साली ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन.
  • सन १९५१ साली प्रसिद्ध बंगाली भाषिक लेखक अद्वैत मल्लाबरमन यांचे निधन.
  • इ.स. १९६१ साली गुरुद्वारा सुधार चळवळ तसचं, अखंड किर्थनी जथाची स्थापना करणारे प्रसिद्ध शीख नेते रणधीर सिंह यांचे निधन.
  • सन १९६६ साली “इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट” चे मुख्य कलाकार अबनिंद्रनाथ टागोर यांचे शिष्य नंदलाल बोस यांचे निधन.
  • इ.स. २००० साली ग्रामीण कृषितज्ज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार, तसचं राजकारणी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वडील दिनकर गोविंद उर्फ अप्पासाहेब पवार यांचा जन्मदिन.
  • सन २००७ साली भारतीय वंशाचे अमेरिकन प्राध्यापक गोबीचेट्टीपालम वासुदेवन “जी. व्ही.” लोगानाथन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved