• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

अजित पवार बायोग्राफी मराठींमध्ये

Ajit Pawar Mahiti

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नाव आहे ज्या नावाची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये नेहमी होतच राहते, तसेच विरोधकांच्या टीका ह्या त्यांच्यावर नेहमी सुरूच असतात, तरीही ते त्या टिकांना सामारे जाऊन विकासकामांत अडथळा येऊ देत नाहीत, आणि विकास कामे सतत सुरु ठेवतात.

त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये विकास कामांना करून त्या शहराचा कायापालट केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे नेते असुन शरद पवार यांचे पुतणे आहेत.

अजित पवार बायोग्राफी मराठींमध्ये – Ajit Pawar Biography in Marathi

Ajit Pawar

अजित पवार यांचा अल्पपरिचय – Ajit Pawar Information in Marathi

नाव: अजित अनंतराव पवार
जन्म:22 जुलै 1959
जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर
शिक्षण: बी.कॉम.
व्यवसाय:राजकारण
उपमुख्यमंत्री म्हणुन कार्यकाळ : 2010 ते 2014
निवासस्थान: सहयोग, बारामती पुणे
वडिल: अनंतराव पवार
काका:शरद पवार
चुलत बहिण: सुप्रिया सुळे
पत्नी: सुनेत्रा पवार
अपत्य: पार्थ पवार, जय पवार

अजित पवार राजकारणातले एक महत्वाचे राजकीय नेते आहेत – Ajit Pawar Career

यांचा जन्म देवळाली प्रवरा (ता.राहुरी जि.अहमदनगर) या त्यांच्या गावी झाला, महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्यांनी मुंबई गाठली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरूवात केली.

अजित पवार यांना ’’दादा’’ अशी ओळख आहे. सर्वजण त्यांना याच नावाने ओळखतात. त्यांचे वडिल अनंतराव पवार यांनी सुरूवातीच्या काळात व्ही.शांताराम यांच्या ’’राजकमल स्टुडिओ’’ करिता काम केले होते.

अजित पवार यांचे आजोबा बारामती येथे सहकारी व्यापार करीत असत तर आजी शेती करायची. अजित पवारांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने शिक्षण सोडुन ते पुन्हा बारामतीला आले आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

१८८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर ज्यावेळी ते निवडुन आले तेव्हां त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील जवाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप आणि बेताल वक्तव्य – Ajit Pawar Controversy

उपमुख्यमंत्री पदावर असतांना अजित पवार यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. विजय पांडारे आणि अंजली दमाणी यांनी पवारांवर अनेक आरोप करता त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.

महाराष्ट्रात दुष्काळ पडला असतातांना दुष्काळग्रस्त ज्यावेळेस अजित पवारांजवळ कैफियत मांडायला गेले होते, त्यावेळी बेताल वक्तव्य करून त्यांनी जनतेचा रोष ओढवुन घेतला. राजकीय आणि प्रसारमाध्यमांचा दबाव वाढल्याने त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची वेळ आली.

ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक असल्याचे त्यांनी नंतर प्रसार माध्यमांसमोर कबुल देखील केले होते. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले परंतु अद्याप एकही आरोप सिध्द झालेला नाही. निंबाळकर पाटील या माजी मंत्र्यांच्या ’सुनेत्रा’ या कन्येशी ते विवाहबध्द झाले असुन या उभयतांना पार्थ आणि जय ही दोन मुलं आहेत.

अजित पवार हे आज अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक पदावर आहेत. या व्यतिरीक्त भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे येथील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक म्हणुन ते काम पहातात. पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदावर देखील ते कार्यरत आहेत.

या व्यतिरीक्त देखील अनेक उच्चपदांचा पदभार ते सांभाळत आहेत.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ अजित पवार बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved